मुंबईत पावसाळ्यापूर्वी नवीन रस्ते नाही, पालिकेत रस्ते आणि पर्जन्य जलवाहिन्या खात्यांची कामे रखडली

मुंबई महानगर पालिकेत रस्ते आणि पर्जन्य जलवाहिन्या अशा महत्त्वाच्या खात्यांची सुमारे दोन हजार कोटींची कामे रखडली असल्याची धक्कादायक बाब स्थायी समितीमध्ये समोर आली (BMC roads and rainwater department work pending) आहे.

मुंबईत पावसाळ्यापूर्वी नवीन रस्ते नाही, पालिकेत रस्ते आणि पर्जन्य जलवाहिन्या खात्यांची कामे रखडली
Follow us
| Updated on: Jan 04, 2020 | 10:10 PM

मुंबई : मुंबई महानगर पालिकेत रस्ते आणि पर्जन्य जलवाहिन्या अशा महत्त्वाच्या खात्यांची सुमारे दोन हजार कोटींची कामे रखडली असल्याची धक्कादायक बाब स्थायी समितीमध्ये समोर आली (BMC roads and rainwater department work pending) आहे. पावसाळ्यापूर्वी काम करण्यासाठी जेमतेम तीन ते चार महिने शिल्लक आहेत. मात्र अद्याप या कामांचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे मंजुरीसाठी आलेला नाही. त्यामुळे यावर्षी मुंबईकरांना नवीन रस्ते मिळणार नाहीत, अशी नाराजी सर्वपक्षीय सदस्यांनी व्यक्त केली. आयुक्तांनी तात्काळ निर्णय न घेतल्यामुळेच या कामांचा खेळखंडोबा झाला असल्याची टीकाही सदस्यांनी केली (BMC roads and rainwater department work pending) आहे.

मुंबई शहरात विकास कामे करताना कंत्राट देऊन कामे केली जातात. कंत्राटदारांना काम देण्याअगोदर स्थायी समितीत त्या कामासाठी खर्च करण्याची मंजुरी घ्यावी लागते. प्रशासन त्यासाठी कामांचे प्रस्ताव तयार करून स्थायी समितीत मंजूर करून घेते. काही रस्त्यांचे प्रस्ताव स्थायी समितीत मंजूर करण्यात आले. ट्रेंडर प्रक्रियेत पालिका आयुक्तांनी नवीन धोरण आणल्यामुळे सर्व कामे रखडली आहेत. मुंबईत पावसाळ्यापूर्वी होणारे रस्तेसुद्धा होणं शक्य नाही. कारण आता टेंडर प्रक्रिया सुरू झाली तर तीन महिन्यांच्या कालावधी लागणार आहे.

पालिका आयुक्तांनी नवीन 60-40 चे नवे धोरण आणले आहे. या धोरणानुसार कंत्राटदाराना 40 टक्के रक्कम पालिका पुढील दहा वर्षात टप्प्याटप्याने देणार आहे. पालिकेच्या या धोरणामुळे रस्त्यांच्या कामासाठी कंत्राटदारांनी 40 ते 50 टक्के जास्त किमतीने निविदा भरल्या (BMC roads and rainwater department work pending) आहेत.

यामुळे रस्त्यांच्या कामाचे 800 कोटींचे प्रस्ताव रखडले आहेत. तर घन कचरा व्यवस्थापन विभागाचे 500 कोटींचे प्रस्ताव रखडले आहेत. तर पर्जन्य जलवाहिनी विभागाचे 400 कोटींचे प्रस्ताव रखडले आहेत. तसेच इतर विभागाचे 500 कोटींचे प्रकल्प रखडले आहेत.

पालिका आयुक्तांच्या तसेच अधिकाऱ्यांच्या कार्यालयात निर्णय घेतले जात नसल्याने त्यांच्या हजारो फाईली धूळ खात पडल्या आहेत. पालिका आयुक्तांच्या अकार्यक्षमत्यामुळेही कामे रखडली आहेत. फक्त ठेकेदाराचा विचार आयुक्त करत आहेत. या फाईलींवर एका आठवड्यात निर्णय घ्यावा अशी मागणी रहीस शेख यांनी केली.

रस्त्यांच्या प्रस्तावाला उशीर होत असल्याचे अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांनी सांगितले. प्रशासनाने नियमात बदल करताना स्थायी समितीला सांगणे गरजेचे होते. नवीन नियमांमुळे उशीर होत आहे. हा उशीर का झाला याचे आयुक्तांनी स्पष्टीकरण केले आहे. यामुळे लवकरच रस्त्यांची कामे होतील असे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी (BMC roads and rainwater department work pending) सांगितले.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.