फक्त कोरोनायोद्धा म्हणण्यापेक्षा आमच्या मागण्या मान्य करा, परिचारिकांचं आज-उद्या कामबंद आंदोलन

फक्त कागदोपत्री कोरोनायोद्धा म्हणण्यापेक्षा आमच्या मागण्या मान्य करा, असं म्हणत महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेकडून आज आणि उद्या दिवसभर कामबंद आंदोलन पुकारलं आहे. (nurses Agitation for various Demand)

फक्त कोरोनायोद्धा म्हणण्यापेक्षा आमच्या मागण्या मान्य करा, परिचारिकांचं आज-उद्या कामबंद आंदोलन
परिचारिका संघटनांचं आंदोलन
Follow us
| Updated on: Jun 23, 2021 | 8:55 AM

मुंबई : फक्त कागदोपत्री कोरोनायोद्धा म्हणण्यापेक्षा आमच्या मागण्या मान्य करा, असं म्हणत महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेकडून आज आणि उद्या (बुधवार-गुरुवार) दिवसभर कामबंद आंदोलन पुकारलं आहे. आमच्या मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत आंदोलनाचा इशारा देखील परिचारिका संघटनांच्या वतीने देण्यात आला आहे. (nurses Agitation for various Demand)

परिचारिकांचा राज्य सरकारला इशारा

महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेकडून आज आणि उद्या दिवसभर कामबंद आंदोलनाची हाक देण्यात आलं आहे. पाठीमागचे 2 दिवस परिचारिकांनी सकाळी 2 तास काम बंद आंदोलन केलं पण कोणत्याही मागण्या न झाल्याने आता दोन दिवस कामबंद आंदोलन असणार आहे.

सरकारने जर आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर पुढे 25 तारखेपासून बेमुदत आंदोलन सुरु करु, असा इशारा परिचारिका संघटनांनी दिला आहे. बेमुदत संपावर जाण्याआधी सरकारने आमच्या मागण्यांचा विचार करावा, असंही परिचारिका संघटनांनी म्हटलं आहे.

परिचारिका संघटनांच्या मागण्या काय?

  • कायमस्वरूपी पदभरती करा
  • केंद्राप्रमाणे आम्हाला देखील जोखीम भत्ता द्या
  • कोविड काळात 7 दिवस कर्तव्यकाळ आणि 3 दिवस अलगीकरण रजा कायम ठेवावी,
  • कोरोना काळात बंद करण्यात आलेली साप्ताहिक सुट्टी सुरू करावी… यासह आणखी काही मागण्या आहेत.

कोरोनाच्या काळात आम्ही कुठे कामात थांबलो नाही , काम केलं आता सरकार मात्र आमच्या मागण्याकडे लक्ष देत नाही ही खेदाची बाब असल्याची खंत परिचारिका संघटना व्यक्त करत आहेत.

मुंबईत जे जे रुग्णालयात आंदोलन

राज्यातील सरकारी रुग्णालयातील नर्सकडून 21 जूनपासून आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. केंद्राप्रमाणे आम्हालाही जोखीम भत्ता द्या, या प्रमुख मागणीसाठी मुंबईतील जेजे रुग्णालयातील नर्सने  कामबंद आंदोलन केले. यात जे.जे. रुग्णालयातील 375, सेंट जॉर्ज रुग्णालयातील 175 आणि जीटी रुग्णालयातील 100 परिचारिका सहभागी झाल्या होत्या. त्याचसोबत राज्यभरातील सर्व शासकीय रुग्णालयांतील परिचारिकांनी सहभाग नोंदवला.  या आंदोलनानंतर मागण्या मान्य झाल्या नाही तर बेमुदत आंदोलनाला सामोरे जावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.

(nurses Agitation for various Demand)

हे ही वाचा :

Breaking | केंद्राप्रमाणे आम्हालाही जोखीम भत्ता द्या, मुंबईत जेजे रुग्णालयात नर्सचं आंदोलन

Non Stop LIVE Update
भाजप-मनसे युतीवर दिल्लीत शिक्कामोर्तब? राज दिल्लीला, महायुतीत येणार?
भाजप-मनसे युतीवर दिल्लीत शिक्कामोर्तब? राज दिल्लीला, महायुतीत येणार?.
महायुतीत मढ्यातील तिढा काही सुटेना, धैर्यशील मोहिते पाटील अपक्ष लढणार?
महायुतीत मढ्यातील तिढा काही सुटेना, धैर्यशील मोहिते पाटील अपक्ष लढणार?.
महायुतीचा फॉर्म्युला निश्चित! शिंदेंच्या 10 उमेदवारांची यादी तयार
महायुतीचा फॉर्म्युला निश्चित! शिंदेंच्या 10 उमेदवारांची यादी तयार.
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात.
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल.
चिंता करु नका...महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठ वक्तव्य
चिंता करु नका...महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठ वक्तव्य.
इंडिया आघाडीची सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग अन्... शिंदेंचा घणाघात
इंडिया आघाडीची सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग अन्... शिंदेंचा घणाघात.
मग घाबरता कशाला? अजितदादांच्या 2019 च्या वक्तव्यावर शिवतारेंचं उत्तर
मग घाबरता कशाला? अजितदादांच्या 2019 च्या वक्तव्यावर शिवतारेंचं उत्तर.
लोकसभा लढवणार की नाही? शिवतारेंनी शिंदेंच्या भेटीनंतर केलं स्पष्ट
लोकसभा लढवणार की नाही? शिवतारेंनी शिंदेंच्या भेटीनंतर केलं स्पष्ट.
एवढी मोठी हस्ती, जीवाला धोका;कडूंनी उडवली राणांच्या वक्तव्याची खिल्ली
एवढी मोठी हस्ती, जीवाला धोका;कडूंनी उडवली राणांच्या वक्तव्याची खिल्ली.