नवाब मलिकांच्या जावयाची न्यायालयात धाव; ‘एनसीबी’ने दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याची मागणी

केंद्रीय अमलीपदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याची मागणी मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांनी न्यायालयाकडे केली आहे. अमलीपदार्थांच्या तस्करी प्रकरणात समीर खान यांच्या विरोधात एनसीबीकडून गुन्हा दाखल करण्यात आला होता.

नवाब मलिकांच्या जावयाची न्यायालयात धाव; 'एनसीबी'ने दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याची मागणी
Follow us
| Updated on: Nov 21, 2021 | 8:17 AM

मुंबई : केंद्रीय अमलीपदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याची मागणी मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांनी न्यायालयाकडे केली आहे. अमलीपदार्थांच्या तस्करी प्रकरणात समीर खान यांच्या विरोधात एनसीबीकडून गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा रद्द करण्यासाठी आता खान यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. केंद्रीय अमलीपदार्थ नियंत्रण विभागाकडून दाखल करण्यात आलेला गुन्हा हा बनावट असून, तो रद्द करावा अशी मागणी त्यांनी न्यायालयात केली आहे.

काय म्हटले आहे याचिकेत?

समीर खान यांच्यावर अमलीपदार्थांच्या तस्करीचा ठपका ठेवून, अमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र विशेष न्यायालयाने खान यांची जामिनावर सुटका केली. खान यांच्याविरोधात कोणताही पुरावा नसल्याने त्यांना जामीन देण्यात येत असल्याचे न्यायालयाने म्हटले होते. आता यानंतर गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी खान यांच्यावतीने उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. खान यांनी गुन्हा रद्द करण्याची मागणी करताना न्यायवैद्यक अहवालाचा दाखला दिला आहे. न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या रासायनिक विश्लेषण अहवालानुसार आपल्याकडे सापडलेला  पदार्थ अमलीपदार्थ नव्हता. त्यामुळे अमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत कोणताही गुन्हा दाखल होऊ शकत नाही, म्हणून न्यायालयाने आपल्यावरील गुन्हा रद्द करावा अशी मागणी त्यांनी याचिकेमध्ये केली आहे.

काय आहे प्रकरण?

समीर खान हे नवाब मलिक यांची कन्या निलोफर यांचे पती आहेत. समीर खान यांना नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) समन्स बजावले होते. ड्रग्ज प्रकरणातील संशयित करण सजनानी यांच्यासोबत समीर खान यांचा गुगल पे द्वारे 20 हजार रुपयांचा व्यवहार झाला होता. सजनानी याने ड्रग्ज पुरवल्यामुळे समीर यांनी त्यांना 20 हजार रुपये गुगल पे द्वारे पैसे पाठवल्याचा आरोप आहे. मुच्छड पानवाला ड्रग्ज प्रकरणाची चौकशी सुरु असताना हा व्यवहार समोर आला. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एनसीबीने समीर यांना बोलावलं होतं. या प्रकरणी त्यांची चौकशी झाली. त्यानंतर 14 जानेवारी रोजी समीर खान यांना एनसीबीने अटक केली होती. त्यानंतर विशेष न्यायलयाने त्यांची जामीनावर सुटका केली.

संबंधित बातम्या 

VIDEO: ‘बिरोबाच्या नावानं चांगभलं…’ आझाद मैदान दुमदुमले, कोणत्याही परिस्थितीत परबांच्या बंगल्यावर धडक देणारच; एसटी कामगार इरेला पेटले

एसटी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सरकार अस्थिर करण्याचा भाजपाचा डाव; हरिभाऊ राठोड यांचा गंभीर आरोप

आर्यनप्रकरणातही फर्जीवाडा उघड, वानखेडेंना निलंबित करा; नवाब मलिक यांची मागणी

Non Stop LIVE Update
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर....
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर.....
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा...
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा....
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.
भाजपचे शेकडो कार्यकर्ते अन् पदाधिकारी देणार भाजपचा देणार राजीनामा
भाजपचे शेकडो कार्यकर्ते अन् पदाधिकारी देणार भाजपचा देणार राजीनामा.
शिवसेना पक्ष-चिन्हाच्या याचिकेवर 6 मेला सुनावणी, कोर्ट काय देणार निकाल
शिवसेना पक्ष-चिन्हाच्या याचिकेवर 6 मेला सुनावणी, कोर्ट काय देणार निकाल.
अखेर उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर, साताऱ्यातून लढणार लोकसभा
अखेर उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर, साताऱ्यातून लढणार लोकसभा.
मनोज जरांगे पाटलांच्या समर्थकावर प्राणघातक हल्ला, 4 अज्ञात इसम आले अन
मनोज जरांगे पाटलांच्या समर्थकावर प्राणघातक हल्ला, 4 अज्ञात इसम आले अन.
'मोदीची गॅरंटी संकल्प' पत्र जाहीर, भाजपच्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय?
'मोदीची गॅरंटी संकल्प' पत्र जाहीर, भाजपच्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय?.