मुंबईत आता फक्त दिसणार इलेक्ट्रिक बसेस, पुढच्या वर्षभरात एकूण 3675 कोटींच्या 2100 बसेस

मुंबईत आता फक्त दिसणार इलेक्ट्रिक बसेस, पुढच्या वर्षभरात एकूण 3675 कोटींच्या 2100 बसेस
2100 electric bus in Mumbai
Image Credit source: social media

या 2100 बसेसचे एकूण मूल्य हे 3675 कोटी रुपयांचे आहे. यामुळे येत्या वर्षभरात 2100 इलेक्ट्रिक बसेस बेस्टच्या ताफ्यात दाखल होणार असून, यातकून मुंबईकरांचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे. पर्यटन आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी यासाठी पुढाकार घेतल्याची माहिती आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: संदिप साखरे

May 23, 2022 | 5:53 PM

मुंबई – मुबंई शहरातील (Mumbai)प्रदूषण येत्या काळात आणखी कमी होण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिकेच्या (Mumbai muncipal corporation) बेस्ट बसेसच्या (BEST bus)उपक्रमात आता इलेक्ट्रिक बस दाखल होणार आहेत. बेस्टच्या ताफ्यात येत्या वर्षभरात एकूण 2100 नव्या इलेक्ट्रीक बसेस दाखल होणार आहेत. बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (BEST) कडून 2100 इलेक्ट्रिक बसेससाठी ऑलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेड या कंपनीला हे कंत्राट देण्यात आले आहे. या 2100 बसेसचे एकूण मूल्य हे 3675 कोटी रुपयांचे आहे. यामुळे येत्या वर्षभरात 2100 इलेक्ट्रिक बसेस बेस्टच्या ताफ्यात दाखल होणार असून, यातकून मुंबईकरांचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे. पर्यटन आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी यासाठी पुढाकार घेतल्याची माहिती आहे. जानेवारीत त्यांनी याबाबत ट्विट करुन याची माहितीही दिली होती. मुंबई महापालिका निवडणुकांची तयारी शिवसेनेने सुरु केली आहे. त्यात मुंबईसाठी काही नव्या घोषणाही करण्यात येत आहेत. नुकतेच मुंबईत शिव योगा केंद्र सुरु करण्यात य़ेणार असल्याची घोषणाही मुंबई महापालिकेच्या वतीने करण्यात आली.  

काय आहे प्रक्रिया

याबाबत बेस्टकडून इव्हे ट्रान्स प्रायव्हेट लिमिटेडला रितसर पत्रही देण्यात आले आहे. या आदेशानुसार १२ वर्षांच्या कालावधीसाठी ग्रॉस कॉस्ट कॉन्ट्रॅक्ट मॉडेलवर २१०० इलेक्ट्रिक बसेसचा पुरवठा करण्यात येणार आहे. १२ महिन्यांच्या कालावधीत या इलेक्ट्रिक बसेस वितरित केल्या जातील. ऑलेक्ट्रा कंपनीमार्फत या बसेसची देखभालही या कराराच्या कालावधीत करणार आहे.

कशा असतील या बस

अलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेड ही कंपनी या करारानुसार १२ मीटर एसी बसेस पुरवणार आहे. मुंबईत सध्या या कंपनीच्या ४० बसेस बेस्टच्या ताफ्यात धावत आहेत. इव्हे आणि ऑलेक्ट्रा या कंपन्या देशातील विविध राज्यातील परिवहन उपक्रमांत इलेक्ट्रिक बसेस चालवत आहेत. यात पुणे, हैदराबाद, गोवा, डेहराडून, सुरत, अहमदाबाद, सिल्वासा आणि नागपूर ह्या शहरातील वाहतूक व्यवस्थेत या बसेस सेवा बजावत आहेत.

हे सुद्धा वाचा

आदित्य ठाकरेंनीही दिली होती माहिती

जानेवारी महिन्यात याबाबत ट्विट करत पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनीही माहिती दिली होती. मुंबईत ९०० इलेक्टिक डबलडेकर बसेस लवकरच धावतील अशी माहिती त्यांनी दिली होती. येत्या काळात या इलेक्ट्रिक बसेसची संख्या १० हजारांपर्यंत नेण्याचा मानसही त्यांनी यात व्यक्त केला होता. त्याचबरोबर मुंबईसह राज्यातील इतर शहरांतही या इलेक्ट्रिक बसेस धावतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला होता.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें