दिव्यांग सहाय्यक उपकरणामुळे अपंगत्वावर मात; रामदास आठवलेंच्या उपस्थितीत 3,260 गरजूंना सहाय्यक उपकरणांचे वाटप

दिव्यांग जणांना सक्षम करण्यासाठी समाजाने पुढे आले पाहिजे, असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी केले.

दिव्यांग सहाय्यक उपकरणामुळे अपंगत्वावर मात; रामदास आठवलेंच्या उपस्थितीत 3,260 गरजूंना सहाय्यक उपकरणांचे वाटप

मुंबई : कृत्रिम अवयव आणि सहाय्यक उपकरणांमुळे अपंगत्वावर मात करण्याची क्षमता दिव्यांग जणांना लाभते. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात केंद्र सरकारने दिव्यांगजणांना सक्षम करण्यासाठी आतापर्यंत लाखो दिव्यांगजणांना कृत्रिम अवयव तसेच सहाय्यक उपकरणांचे मोफत वाटप केले आहे. दिव्यांग जणांना सक्षम करण्यासाठी समाजाने पुढे आले पाहिजे, असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी केले. आज हिंगोलीतील सामाजिक सक्षमीकरण शिबिराच्या दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या उद्घाटन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून रामदास आठवले बोलत होते. मुंबईत वांद्रे येथील अलियावर जंग इन्स्टिट्यूटच्या हॉलमध्ये दूरदृश्य प्रणालीद्वारे कार्यक्रमास रामदास आठवले यांनी संबोधित केले. (Overcome disability by support equipment; Distribution of assistive devices to 3,260 needy people in presence of Ramdas Athawale)

मराठी है हमारी माय बोली इसलीये महाराष्ट्र मे है हिंगोली नरेंद्र मोदी भर देंगे दिव्यांग जनोकी झोली दिव्यांग जनोको न्याय देगी संसद हेमंत पाटील की बोली! अशी शीघ्रकविता रामदास आठवले यांनी यावेळी सादर केली.

या कार्यक्रमात हिंगोलीतील 3 हजार 260 ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगजणांना 2 कोटी 75 लाख रुपयांच्या विविध सहाय्यक उपकरणांचे वाटप आज करण्यात आले. यावेळी खासदार हेमंत पाटील, जिल्हा अधिकारी जितेंद्र पापालकर आदी उपस्थित होते.

कृत्रिम अवयव लावल्यानंतर अनेक दिव्यांग जण आपल्या असहाय्यतेवर मात करतो. दिव्यांगजन आणि ज्येष्ठ नागरिकांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी तसेच दिव्यांगजनांच्या कल्याणासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे असा विश्वास रामदास आठवले यांनी यावेळी व्यक्त केला.

इतर बातम्या

गायकवाड-राज समर्थकांमध्ये ‘इतिहासा’वरून शाब्दिक राडा; गुद्द्याला गुद्द्याने उत्तर देण्याचा इशारा

ठाण्याच्या कोविड रुग्णालयाने 500 कर्मचाऱ्यांना अचानक काढलं; दरेकरांचा रुग्णालय चालू न देण्याचा इशारा

औरंगाबादमध्ये उद्योजकांवरील हल्ले गंभीर, फास्ट ट्रॅक कोर्टात खटले चालवा; फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना पत्रं

(Overcome disability by support equipment; Distribution of assistive devices to 3,260 needy people in presence of Ramdas Athawale)

Published On - 9:42 pm, Thu, 19 August 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI