‘आरे’ची काळजी रे म्हणत पर्यावरणप्रेमींचा रात्रीचा जागर; मेट्रो कारशेड प्रकल्पाच्या निषेधार्थ मुंबईकर रस्त्यावर

मुंबईकरांसाठी आरे वाचले पाहिजे अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे असं आंदोलनकर्ते तरुण आपली भावना व्यक्त करत आहेत. रात्र झाली तरी आरेसाठी हे तरुण रस्त्यावर बसून आंदोलन करत आहेत.

'आरे'ची काळजी रे म्हणत पर्यावरणप्रेमींचा रात्रीचा जागर; मेट्रो कारशेड प्रकल्पाच्या निषेधार्थ मुंबईकर रस्त्यावर
Follow us
| Updated on: Jul 29, 2022 | 12:30 AM

मुंबईः महाविकास आघाडीचे सरकार (Mahavikas Aghadi) गेल्यानंतर शिंदे-फडणवीस (Shinde Fadnavis Government) हे नवे सरकार आल्यानंतर पहिल्या प्रथम त्यांनी आरेमधील मेट्रो-3 च्या कामाचे आदेश दिले, त्यानंतर लगेच पर्यावरणप्रेमींकडू आरेमधील कारशेडला (Aarey metro car shed) विरोध करत आंदोलनाला सुरूवात केली. जे आरे जंगल अठराशे एकरमध्ये पसरले आहे, ज्याला मुंबईचे फुफ्फुस समजले जाते त्या आरेमधील होणाऱ्या कारशेड पर्यावरणप्रेमींकडून तीव्र विरोध करण्यात येत असून आजही रात्री पर्यावरण प्रेमींनी आरेचे जंगल वाचवण्यासाठी मुंबईतील आरे मेट्रो कारशेड प्रकल्पाच्या विरोधात मध्यरात्रीच्या सुमारास लोकांनी रस्त्यावर उतरुन शांततेच्या मार्गाने आंदोलन पुकारले आहे.

या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात युवावर्ग आणि पर्यावरणप्रेमी असून त्यांनी सर्व मुंबईकरांना आरेमधील कारशेडला विरोध करत जंगल वाचवण्याचा आवाहन केले आहे.

आरे ची काळजी रे

आरेचे जंगल वाचवण्यासाठी दिवसासह आता रात्रीच्यावेळीही पर्यावरणप्रेमींकडून शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्यात येत आहे. हातात आरे वाचवणारे फलक घेऊन मुंबईसह पर्यावरणप्रेमी आता रस्त्यावर उतरले आहेत. मुंबईकरांसाठी आरे वाचले पाहिजे अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे असं आंदोलनकर्ते तरुण आपली भावना व्यक्त करत आहेत. रात्र झाली तरी आरेसाठी हे तरुण रस्त्यावर बसून आंदोलन करत आहेत.

वृक्षतोडीवर बंदी तरीही…

आरे जंगल वाचवण्यासाठी मुंबईतील पर्यावरणप्रेमी फक्त रस्त्यावर उतरला नाही तर या पर्यावरणप्रेमींनी आता दिवसरात्र एक करत रात्रीच्यावेळी आरे वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत. यावेळी तरुणांनी हातात आरे वाचवण्यासाठी फलक घेऊन सरकारला विरोध दर्शवला आहे. सर्वोच्च न्यायालयाने वृक्षतोडीवर बंदी घातली असतानाही आरेमधील वृक्षतोड होत असेल तर आमचा त्याला विरोध कायम असणार असल्याचे पर्यावरणप्रेमींकडू सांगण्यात येत आहे.

Non Stop LIVE Update
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.