Mumbai Power Cut : मुंबईतील लालबाग, परळ भागात गेलेली वीज तासाभरानं परतली; अखेर नागरिकांकडून सुटकेचा निःश्वास

मुंबईतील लालबाग, परळ परिसरात जवळपास तासाभरापासून वीज गायब होती. मुंबईत विजेचा लपंडाव थांबेना, मुंबईकर त्रस्त.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 21:12 PM, 12 Oct 2020
Mumbai Power Cut : मुंबईतील लालबाग, परळ भागात गेलेली वीज तासाभरानं परतली; अखेर नागरिकांकडून सुटकेचा निःश्वास

मुंबई : मुंबईतील लालबाग, परळ परिसरात पुन्हा एकदा जवळपास तासाभरापासून वीज गायब झाल्यानं (Power outage in Lalbagh, Parel area for about half an hour) एकच खळबळ उडाली.  मुंबईत विजेचा लपंडाव थांबत नसल्यानं मुंबईकरांनीही नाराजी व्यक्त केली आहे. तर आज सकाळच्या सुमारास काही तासांसाठी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पनवेलसह उपनगरातील बत्ती गुल झाली होती. पॉवर ग्रीड फेल्युअरमुळे सकाळी दहापासून जवळपास अडीच तास वीज गायब झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा जवळपास तासाभरापेक्षा जास्त काळ मुंबईकर अंधारात होते. (Power outage in Lalbagh, Parel area for about half an hour)

आज रात्रीभरासाठी मुंबईतील कोव्हिड हॉस्पिटल, कोव्हिड सेंटर्स आणि इतर रुग्णालयांना महापालिकेने अलर्ट जारी केला आहे. 12 तासांचा बॅकअप तयार ठेवण्याच्या सूचना महापालिकेने रुग्णालयांना दिल्या आहेत. मुंबई महापालिकेचा डिझास्टर कंट्रोल विभाग सातत्यानं रुग्णालयांच्या संपर्कात आहे.

LIVE UPDATES

[svt-event title=”रात्रीभरासाठी मुंबईतील कोव्हिड हॉस्पिटल, सेंटर्स, इतर रुग्णालयांना बीएमसीचा अलर्ट” date=”12/10/2020,10:09PM” class=”svt-cd-green” ] आज रात्रीकरता मुंबईतील कोव्हिड हॉस्पिटल, सेंटर्स आणि इतर रुग्णालयांना महापालिकेचा अलर्ट, 12 तासांचा बॅकअप तयार ठेवण्याच्या सूचना, मुंबई महापालिकेचा डिझास्टर कंट्रोल विभाग सातत्यानं रुग्णालयांच्या संपर्कात [/svt-event]

[svt-event title=”मुंबईत तासाभरानंतर लाईट आली ” date=”12/10/2020,9:53PM” class=”svt-cd-green” ] मुंबईत तासाभरानंतर लाईट आली, गेल्या एक तासापासून मुंबई अंधारात, तासाभरानंतर मुंबईकरांना दिलासा [/svt-event]

[svt-event title=”संपूर्ण मुंबई ठप्प करण्यासाठी जबाबदार कोण? – देवेंद्र फडणवीस” date=”12/10/2020,9:46PM” class=”svt-cd-green” ] मुंबईतल्या दादर, लालबाग भागात पुन्हा एकदा बत्ती गुल, नागरिकांमध्ये संताप सर्वसामान्यांच्या जीवनात खंड पाडणार्‍या आणि यामुळे जवळजवळ संपूर्ण मुंबई ठप्प करण्यासाठी जबाबदार कोण?, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचा सवाल [/svt-event]

[svt-event title=”नवी मुंबईत पुन्हा एकदा काही भागात विद्युत पुरवठा खंडित” date=”12/10/2020,9:45PM” class=”svt-cd-green” ] नवी मुंबईत पुन्हा एकदा काही भागात विद्युत पुरवठा खंडित, गेला एक तास नवी मुंबईतील काही विभागात वीज पुरवठा खंडित, नेरुळ आणि सानपाडात बत्ती गूल [/svt-event]

[svt-event title=”मुंबईत पुन्हा एकदा बत्ती गुल” date=”12/10/2020,9:45PM” class=”svt-cd-green” ] काळाचौकी, परळ आणि शिवडीचा काही भाग अंधारात, अनेक ठिकाणी बत्ती गुल [/svt-event]

वीज गेल्याने मुंबईतील अनेक रुग्णालयांनाही फटका बसला आहे. अनेक व्हेंटिलेटर्स जनरेटरच्या माध्यमातून सुरू ठेवण्याची वेळ आली होती. कळवा पडघा केंद्रात सर्किट 1 देखभाल-दुरुस्ती दरम्यान सर्व भार सर्किट 2 वर आला. मात्र, त्याचवेळी सर्किट 2 मध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने मुंबई-ठाण्यातील बत्ती गुल झाली असल्याची माहिती ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिली होती.

विशेष म्हणजे मुंबई महानगर क्षेत्रातील वीज खंडित झाल्याच्या घटनेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली होती. या घटनेची तातडीने चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच याप्रकरणी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याशी देखील त्यांनी चर्चा केली. मुंबई तसेच मुंबई महानगर क्षेत्रातील वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने सर्वतोपरी प्रयत्न करावेत, अशा सूचना दिल्या होत्या. भविष्यात परत अशी घटना घडू नये यासाठी सतर्कता बाळगावी, असेही त्यांनी सांगितले.

Power outage in Lalbagh, Parel area for about half an hour

संबंधित बातम्या : 

Mumbai Power Cut LIVE : मुंबईतील बत्ती गुल, वीजेअभावी रुग्णालयातील शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या

Power grid failure | पॉवर ग्रीड फेल्युअर म्हणजे काय? भारतात किती पॉवर ग्रीड? वाचा सर्व काही