पुणे, नागपूर, रत्नागिरीत शाळा सुरु झाल्या? वाचा सविस्तर

कोरोनाचा संसर्ग जसजसा कमी व्हायला सुरुवात झाली आहे तसतश्या गेल्या अनेक महिन्यांपासून सुरु असलेल्या शाळा आता अनलॉक व्हायला सुरुवात झाली आहे. | After Corona School reopen

पुणे, नागपूर, रत्नागिरीत शाळा सुरु झाल्या? वाचा सविस्तर
school

मुंबई :  कोरोनाचा संसर्ग जसजसा कमी व्हायला सुरुवात झाली आहे तसतश्या गेल्या अनेक महिन्यांपासून  बंदअसलेल्या शाळा आता अनलॉक व्हायला सुरुवात झाली आहे. पुणे, नागपूर आणि रत्नागिरीतील शाळा आता सुरु होणार आहे. गेल्या 9 ते 10 महिन्यांपासून या शाळा बंद होत्या. राज्यातील महत्त्वाच्या शहरांत आता शाळेची शंटा वाजणार आहे. (Pune nagpur Ratnagiri School Opening Date)

पुण्याच्या शाळांची परिस्थिती काय, कधी सुरु होणार?

पुणे शहरातील शाळा येत्या 1 फेब्रुवारीपासून उघडण्यात येणार आहेत. शासनाने घालून दिलेल्या अटी आणि नियमांनुसार कोरोनाच्या उपाययोजना करुन शाळा उघडल्या जाणार आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या काळजीस्तव शाळांचं रोजच्या रोज सॅनिटायझिंग तसंच फिजिकल डिस्टन्सिंग इ. नियमांचं पालन केलं जाणार आहे, अशा प्रकारचा निर्णय पुणे महापालिकेने घेतलाय.

दुसरीकडे पुणे जिल्ह्यात (पुणे ग्रामीण) देखील येत्या 1 फेब्रुवारीपासून शाळा सुरु होणार आहेत. सध्या शाळा सुरु होणार होत्या. पण प्रशासनाच्या पातळीवर त्यासंबंधी तयारी झाली नव्हती. अखेर येत्या 1 तारखेपासून पुणे ग्रामीण आणि शहर दोन्ही विभागात येत्या 1 तारखेपासून शाळा सुरु होणार आहे.

नागपुरमधील शाळा आजपासून सुरु होणार

नागपुरात कोव्हिड काळात बंद असलेल्या शाळा आजपासून सुरु होणार आहे. नागपूर ग्रामीणमध्ये 5 वी ते 8 वी पर्यंतचे वर्ग सुरु करण्यात येणार आहे. तब्बल 10 महिन्यानंतर 1668 शाळांमध्ये वर्ग सुरु होणार आहेत. नागपूर ग्रामीणमध्ये 5 वी ते ८ पर्यंतचे 1 लाख 48 हजार विद्यार्थी आहेत. पालकांचं संमतीपत्र घेऊनंच शाळा सुरु होणार आहेत. तसंच शिक्षकांना आरटीपीसीआर चाचणीचे बंधन करण्यात आलं आहे. दुसरीकडे शाळेच्या निर्जंतुकीकरणासह कोव्हिडचे नियम पाळणंही बंधनकारक करण्यात आलं आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील शाळांचा श्रीगणेशा…

रत्नागिरी जिल्ह्यातील पाचवी ते आठवी पर्यंतच्या शाळांचा आजपासून श्रीगणेशा होणार आहे. गेल्या 10 महिन्यांपासून कोरोना काळात तथा लॉकडाऊनमुळे शाळा बंद होत्या. आता कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने आजपासून रत्नागिरीतील शाळा सुरु होत आहेत. जिल्ह्यातील सर्व माध्यमातील 3202 शाळा आज उघडणार आहेत. पाचवी ते आठवीपर्यंत शिकणाऱ्या मुलांची संख्या 80 हजारांवर आहे. शाळा सुरु होण्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील 3 हजार 695 शिक्षकांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. शाळेच्या निर्जंतुकीकरणासह कोव्हिडचे नियम पाळणंही बंधनकारक करण्यात आलं आहे.

कोरोना संसर्गाची परिस्थिती जरी सुधारत असली तरी शैक्षणिक क्षेत्राचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले आहे. हातावर पोट असलेल्या लोकांची मुले शिक्षणापासून वंचित राहिली आहेत. ज्यां मुलांना ऑनलाईन शिक्षणाचा कोणताही स्त्रोत नव्हता त्या मुलांना कोरोनाच्या काळात जवळपास 8 ते 9 महिने शिक्षणापासून दूर रहावं लागलं आहे.

हे ही वाचा

मुंबईपाठोपाठ ठाण्यातील शाळा आणि महाविद्यालय 15 जानेवारीपर्यंत बंद, जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

Pimpri Chinchwad | पिंपरी चिंचवडमध्ये नववी ते बारावी शाळा सुरू, विद्यार्थ्यांची जेमतेम हजेरी

Published On - 8:14 am, Wed, 27 January 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI