बाळाला वाचवताना गंभीर दुखापत, 14 वर्षांच्या साक्षीला नवा पाय मिळणार, उपचाराची संपूर्ण जबाबदारी केईएम घेणार

'केईएम' रुग्णालयामध्ये साक्षी दाभेकरच्या डाव्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली. यावेळी तिचा पाय गुडघ्यापासून खाली कापावा लागला. तालुका स्तरावरील धावपटू विद्यार्थिनीचा पाय कापावा लागल्याने तिच्या भवितव्याविषयी कुटुंबाला चिंता वाटत होती

बाळाला वाचवताना गंभीर दुखापत, 14 वर्षांच्या साक्षीला नवा पाय मिळणार, उपचाराची संपूर्ण जबाबदारी केईएम घेणार
बाळाला वाचवताना झालेल्या अपघातानंतर पाय गमवावा लागलेल्या साक्षी दाभेकरची किशोरी पेडणेकरांकडून भेट
Follow us
| Updated on: Aug 02, 2021 | 3:33 PM

मुंबई : पोलादपूरमध्ये दरड कोसळताना दोन महिन्यांच्या बाळाला वाचवण्याच्या प्रयत्नात अंगावर भिंत कोसळल्याने गंभीर जखमी झालेल्या 14 वर्षांच्या साक्षी दाभेकरला लवकरच कृत्रिम पाय मिळणार आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केईएम रुग्णालयात जाऊन साक्षीची भेट घेतली. रायगडची रहिवासी असलेल्या साक्षीचा पाय शस्त्रक्रियेनंतर गुडघ्यापासून खाली कापण्याची वेळ आली होती. त्यामुळे कुटुंबासमोर मोठं आर्थिक संकट उभं राहिलं होतं. मात्र साक्षीच्या पुढील उपचाराची संपूर्ण जबाबदारी महापालिकेच्या केईएम हॉस्पिटलद्वारे स्वीकारली जाणार आहे.

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केईएम रुग्णालयात जाऊन साक्षीची भेट घेतली. शिवसेनेकडून साक्षी दाभेकरच्या कुटुंबियांना तातडीची मदत म्हणून आजच एक लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. साक्षी दाभेकरला लवकरच कृत्रिम पाय मिळणार आहे. सरकारने आपल्या मुलीच्या शौर्याची दखल घ्यावी आणि तिला पुढील उपचारासाठी मदत करावी अशी मागणी कुटुंबियांनी केली होती.

नेमकं काय घडलं?

रायगड जिल्ह्यात दोन आठवड्यांपूर्वी गंभीर पूरस्थिती निर्माण झाली होती. अनेक ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटनाही समोर आल्या. यावेळी पोलादपूर तालुक्यातील केवनाळे गावात 14 वर्षांच्या साक्षी दाभेकर हिने धिटाईने दोन महिन्यांच्या मुलाचे प्राण वाचवले. मात्र भिंत अंगावर कोसळल्यामुळे साक्षी जबर जखमी झाली.

पाय गुडघ्यापासून खाली कापला

साक्षीला तातडीने रायगडहून मुंबईत हलवण्यात आले. ‘केईएम’ रुग्णालयामध्ये तिच्या डाव्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली. यावेळी दुर्दैवाने तिचा पाय गुडघ्यापासून खाली कापावा लागला. तालुका स्तरावरील धावपटू विद्यार्थिनीचा पाय कापावा लागल्याने तिच्या भवितव्याविषयी कुटुंबीयांच्या मनात चितेंचं वातावरण होतं.

कृत्रिम पाय बसवण्यासाठी मदतीचं आवाहन

14 वर्षांची साक्षी दाभेकर धावपटू आहे. कबड्डी आणि खो खो हे क्रीडा प्रकार ती तालुका स्तरावर खेळते. पण आता तिला पाय गमवावा लागला. लेकीची परिस्थिती बघून त्यांना अश्रू अनावर होतात. त्यामुळे साक्षीला कृत्रिम पाय बसवण्यासाठी आणि साक्षीच्या भवितव्यासाठी दाभेकर कुटुंबाला ज्यांना आर्थिक मदत करायची असेल, त्यांच्यासाठी बँक खात्याचे तपशील जारी करण्यात आले आहेत.

साक्षी दाभेकरला मदत करण्यासाठी बँक तपशील :

नाव – Pratiksha Narayan Dabhekar

Bank of India, Poladpur branch

A/c – 120310510002839

IFSC code – BKID 0001203

MICR – 402013520

संबंधित बातम्या :

दरडीतून बाळाला वाचवताना भिंत कोसळली, 14 वर्षांच्या धावपटूचा पाय कापण्याची वेळ, आर्थिक मदतीचं आवाहन

Video : रायगडमध्ये दरड कोसळून तब्बल 32 जणांचा मृत्यू, 80 ते 90 जण मातीच्या ढिगाऱ्याखाली, नेमकं काय घडलं?

(Raigad Landslide Poladpur 14 years old runner Sakshi Dabhekar Leg cut after operation KEM Hospital to take responsibility)

Non Stop LIVE Update
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.