सर्व कुटुंब ईडी कार्यालयाकडे, मात्र राज ठाकरेंची ‘थिंक टँक’ आणि ‘उजवा हात’ कृष्णकुंजवर

राज ठाकरे (Raj Thackeray) सकाळी 10.30 वाजता घरातून ईडी कार्यालयाकडे निघाले. त्यांच्यासोबत पत्नी शर्मिला ठाकरे, मुलगी उर्वशी, मुलगा अमित ठाकरे आणि सून मिताली उपस्थित होते.

सर्व कुटुंब ईडी कार्यालयाकडे, मात्र राज ठाकरेंची 'थिंक टँक' आणि 'उजवा हात' कृष्णकुंजवर
Follow us
| Updated on: Aug 22, 2019 | 12:50 PM

मुंबई : कोहिनूर मिल खरेदी (Kohinoor Square)  प्रकरणाच्या चौकशीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) सकाळी साडे अकरा वाजता ईडी कार्यालयात दाखल झाले. ईडीकडून त्यांची आज चौकशी होत आहे. त्याआधी याच प्रकरणात  शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचा मुलगा उन्मेश जोशी  आणि राजन शिरोडकर यांचीही ईडीने चौकशी केली.

राज ठाकरे (Raj Thackeray) सकाळी 10.30 वाजता घरातून ईडी कार्यालयाकडे निघाले. त्यांच्यासोबत पत्नी शर्मिला ठाकरे, मुलगी उर्वशी, मुलगा अमित ठाकरे आणि सून मिताली उपस्थित होते. राज ठाकरे गाडीपर्यंत गेले त्यावेळी त्यांच्या आईने त्यांचा हात पकडला होता. त्यावेळी आईच्या डोळ्यात अश्रू होते.

दोन बडे नेते कृष्णकुंजवर

राज ठाकरे यांना ईडीने पाठवलेल्या समन्सविरोधात मनसे कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. मनसेच्या पदाधिकाऱ्यांनीही आज ईडी कार्यालयावर शांततेत हजेरी लावण्याचा निर्णय घेतला होता. राज्यभरातील कार्यकर्ते मुंबईतील ईडी कार्यालयात येणार होते. मात्र स्वत: राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना आवाहन करत, कोणीही ईडी कार्यालयाकडे न येण्यास बजावलं.

राज ठाकरे आपल्या कुटुंबासह ईडी कार्यालयाकडे गेले. त्यावेळी राज ठाकरे यांची आई घरी होती. त्यांना धीर देण्यासाठी मनसेचे दोन बडे नेते कृष्णकुंजवर दाखल झाले. मनसे नेते बाळा नांदगावकर आणि अनिल शिदोरे हे दोन्ही नेते कृष्णकुंजवर तळ ठोकून आहेत. दोघेही सकाळी साडेनऊच्या सुमारास राज ठाकरेंच्या घरी पोहोचले. राज ठाकरेंनी घराबाहेर पडण्यापूर्वी या दोघांसोबत चर्चा केली असावी.

राज ठाकरेंप्रमाणे बाळा नांदगावकर यांनीही कार्यकर्त्यांना ईडी कार्यालयाकडे न जाता पक्षादेश पाळण्याच्या सूचना दिल्या.

कोण आहेत बाळा नांदगावकर?

  • बाळा नांदगावकर यांना राज ठाकरे यांचा उजवा हात किंवा त्यांची सावली म्हणून ओळखलं जातं
  • मनसेच्या स्थापनेपासून बाळा नांदगावकर राज ठाकरेंसोबत आहेत
  • बाळासाहेब ठाकरेंचा सच्चा शिवसैनिक ते राज ठाकरेंचा कट्टर मनसैनिक म्हणूनही त्यांना ओळखलं जातं
  • राज ठाकरेंच्या प्रत्येक मोर्चा, आंदोलन, सभास्थळी बाळा नांदगावकर त्यांच्यासोबत असतात.
  • राज ठाकरेंनंतर पक्षातील महत्त्वाचा नेता म्हणून बाळा नांदगावकरांकडे पाहिलं जातं.

कोण आहेत अनिल शिदोरे?

  • मनसेची थिंक टँक म्हणून अनिल शिदोरे यांची ओळख आहे.
  • मनसे नेते आणि प्रवक्ते म्हणून ते काम पाहतात.
  • मनसेची ध्येय धोरणं ठरवण्यापासून ते राज ठाकरेंच्या भाषणांच्या तयारीपर्यंत अनिल शिदोरेंकडे महत्त्वाची जबाबदारी असते
  • राज ठाकरेंच्या कोलकाता दौऱ्यात अनिल शिदोरे आणि बाळा नांदगावकर सोबत होते.
  • अनिल शिदोरे यांचे सोशल मीडियावर अनेक फॉलोअर्स आहेत
  • सरकारच्या निर्णय, भूमिकांचं समाजमनावर होणाऱ्या परिणामांचं विश्लेषण ते करत असतात

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.