Raj Thackeray: धार्मिक तेढ निर्माण होण्याची शक्यता; राज ठाकरेंना होऊ शकते कधीही अटक; असीम सरोदे

अ‍ॅड. असीम सरोदे यांनी सांगितले की, राज ठाकरे यांच्यावर 153 अंतर्गत जो गुन्हा दाखल केला गेला आहे, त्याप्रकरणी त्यांना केव्हाही अटक होऊ शकते असेही त्यांनी सांगितले. हा गुन्हा अजामीन पात्र गुन्हा असून त्यांच्यावर याप्रकरणीच गुन्हा नोंद केला गेला आहे.

Raj Thackeray: धार्मिक तेढ निर्माण होण्याची शक्यता; राज ठाकरेंना होऊ शकते कधीही अटक; असीम सरोदे
अॅड. असिम सरोदेImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 03, 2022 | 4:13 PM

मुंबईः मनसचे पक्षप्रमुख राज ठाकरे (Raj Thackrey) यांच्यावर औरंगाबादमधील (Aurangabad) सभा झाल्यानंतर आज त्यांच्यावर औरंगाबादमधील सिटी चौक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज ठाकरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल (case register) झाल्यानंतर अ‍ॅड. असीम सरोदे यांनी टीव्ही नाईनशी बोलताना त्यांनी सांगितले की, कलम 153 अंतर्गत त्यांच्या गुन्हा दाखल झाला असेल तर त्यांना अटक होऊ शकते असं मत अ‍ॅड. असीम सरोदे यांनी यावेळी सांगितले.

औरंगाबादमधील सिटी चौक पोलीस स्टेशनमध्ये राज ठाकरे यांच्यासह राजीव जेवळीकर व इतर आयोजक यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी तपासी अधिकारी म्हणू न अशोक गिरी यांची नेमणूक केली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

हा गुन्हा अजामीन पात्र

यावेळी अ‍ॅड. असीम सरोदे यांनी सांगितले की, राज ठाकरे यांच्यावर 153 अंतर्गत जो गुन्हा दाखल केला गेला आहे, त्याप्रकरणी त्यांना केव्हाही अटक होऊ शकते असेही त्यांनी सांगितले. हा गुन्हा अजामीन पात्र गुन्हा असून त्यांच्यावर याप्रकरणीच गुन्हा नोंद केला गेला आहे. दंगा भडकावण्याच्या हेतूने चिथावणीखोर वक्तव्यप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून त्यांनी सभेआधी दिलेल्या अटी भंग केल्याचेही सांगण्यात येत आहे.

12 अटींचे उल्लंघन

या सभेप्रसंगी 12 अटींचे उल्लंघन केले असल्याचेही म्हणण्यात आले असून अॅड. असीम सरोद यांनी सांगितले की, जी कलमं राज ठाकरे यांच्यावर लावण्यात आली आहेत ती त्यामुळे धार्मिक तेढ निर्माण होण्याची शक्यता असल्यानेच त्यांच्यावर ११६, ११७, १३५ आणि १५३ अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे त्यांना कधीही अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

राजकीय वर्तुळात खळबळ

राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. याविषयी बोलताना विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल चढविला. महाविकास आघाडीकडून नेत्यांवर अघोषीत आणीबाणी लावण्यासारखी परिस्थिती महाराष्ट्रात झाली आहे असेही त्यांनी सांगितले.

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.