मुंबई : मुंबई-अहमदाबाद ( mumbai-ahmedbad ) या दोन शहरांचे सुमारे सहा तासांचे अंतर तीन तासांवर आणणाऱ्या 508.17 किमी लांबीच्या ( Bullettrain) बुलेट ट्रेनच्या कॉरिडॉरवरील पहिला नदी पूल वेगाने तयार होत आहे. गुजरातच्या वलसाड जिल्ह्यातील पार नदीवर हा पूल बांधला जात आहे. या नदीवर 320 मीटर लांबीचा हा पूल बांधतानाचा ‘रिअल टाईम प्रोग्रेस रिपोर्ट’ दाखविणारा व्हीडीओ रेल्वे मंत्रालयाने ट्वीटरवर शेअर केला आहे. गुजरातमध्ये बुलेट ट्रेनचे काम वेगाने होत आहे. परंतू महाराष्ट्रातील काम रखडल्याने बुलेट ट्रेनचा पहिला टप्पा डिसेंबरमध्ये तयार होणार आहे.
मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनचे महाराष्ट्रातील जमिन संपादनाचे काम 98.76 टक्के पूर्ण झाले आहे. बीकेसीतील सुरूवातीचे अंडरग्राऊंड स्थानक बांधण्यासाठीचे टेंडर 28 डीसेंबरला उघडले आहे. तर बीकेसी ते शिळफाटा दुहेरी मार्गासाठी २१ किमीचा बोगदा खणण्याचे टेंडर येत्या 9 फेब्रुवारीला ओपन होणार आहे. दरम्यान, बुलेट ट्रेनचे साबरमती ते वापीपर्यंतचे कामाने वेग पकडला आहे. गुजरातच्या पार नदीवर 320 मीटरच्या पुलाचे काम पूर्ण केल्याचा व्हीडीओ रेल्वेने जारी केला आहे. गुजरातमध्ये बुलेट ट्रेनचे काम वेगाने होत आहे. परंतू महाराष्ट्रातील काम रखडल्याने बुलेट ट्रेनचा पहिला टप्पा डिसेंबरमध्ये तयार होणार आहे.
गुजरात आणि दादरा नगर हवेली येथील आठ जिल्ह्यातून जाणाऱ्या 352 किमीच्या बुलेट ट्रेनच्या मार्गासाठी ट्र्रॅक उभारण्यासाठी सीव्हील, वायडक्ट, स्थानके आणि ब्रिज उभारण्यासाठीचे दोन वर्षांकरीताचे कंत्राट वाटप शंभर टक्के पूर्ण झाले आहे. गुजरात आणि दादरा नगर हवेलीमधील आठ जिल्ह्यांमधून जाणार्या मार्गाचे बांधकामाचे काम वेगाने सुरू आहे.
Catch a glimpse of the real-time progress on the first River Bridge (320 m) at MAHSR Corridor. pic.twitter.com/1UChboKX41
— Ministry of Railways (@RailMinIndia) January 24, 2023
वापी ते साबरमती या बुलेट ट्रेनच्या आठ स्थानकांची कामे विविध टप्प्यात आहेत. वडोदराजवळील 6.28 किमी सलग व्हायाडक्ट सह एकूण 27.6 किमीचे व्हायाडक्टचे काम पूर्ण झाले आहे, तर विविध ठिकाणी 21.32 किमीचा विखुरलेले व्हायाडक्टचे पूर्ण झाले आहे. नर्मदा, तापी, माही आणि साबरमती या महत्त्वाच्या नद्यांवर पुलांचे काम सुरू असल्याची माहिती नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडच्या अधिकाऱ्यांनी दिली. नर्मदा, तापी, माही आणि साबरमती या महत्त्वाच्या नद्यांवर पुलाचे काम सुरू आहे. देशातील पहिली बुलेट ट्रेन दर ताशी 350 कि.मी.च्या वेगाने धावणार असून मुंबई ते अहमदाबाद मार्गावर एकूण 12 स्थानके असणार आहेत.
बुलेट ट्रेन कॉरीडॉरचा पहिला नदी पूल गुजरातच्या पार नदीवर बांधला जात आहे.
– हा पूल पार नदीवर गुजरातच्या वलसाड जिल्ह्यात बांधला जात आहे. यात 8 फुल स्पॅन गर्डर आहेत ( प्रत्येकी 40 मीटर)
– पिलरची उंची – 14.9 ते 20.9 मीटर
– गोलाकार पिलरचा व्यास 4-5 मीटर आहे