आदित्य ठाकरेंसाठी मैदान मोकळं, वरळीतून विधानसभा लढण्याची चिन्हं, सचिन अहिर विधानपरिषदेवर?

सचिन अहिर (Sachin Ahir) यांचा शिवसेनेत प्रवेश करुन वरळी विधानसभा एक हाती कशी जिंकता येईल यावर शिवसेनेचा भर आहे. अशा परिस्थितीत आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) हे वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.

  • Updated On - 6:26 pm, Thu, 25 July 19
आदित्य ठाकरेंसाठी मैदान मोकळं, वरळीतून विधानसभा लढण्याची चिन्हं, सचिन अहिर विधानपरिषदेवर?


मुंबई :  राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) भगदाड पडलं आहे. कारण राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर (Sachin Ahir) यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ‘मातोश्री’वर सचिन अहिर यांनी शिवबंधन बांधलं.

आदित्य ठाकरे वरळीतून लढणार?

दरम्यान, सचिन अहिर हे वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवतात. मात्र 2014 च्या विधानसभा निवडणुकीत अहिर यांचा शिवसेनेचे विद्यमान आमदार सुनिल शिंदे यांनी पराभव केला. आता युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे सुद्धा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. इतकंच नाही तर आदित्य ठाकरेंना शिवसेनेकडून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून प्रमोट केलं जात आहे.

अशा परिस्थितीत आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) हे वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. वरळी विधानसभेतून आदित्य ठाकरे यांना निवडणूक लढता यावं यासाठी शिवसेना वरळी विधानसभेतील विरोधक संपवत असल्याची चर्चा आहे.

राष्ट्रवादीला मोठे खिंडार, मुंबई अध्यक्ष सचिन अहिर शिवसेनेत प्रवेश करणार : सूत्र

सचिन अहिर (Sachin Ahir) यांचा शिवसेनेत प्रवेश करुन वरळी विधानसभा एक हाती कशी जिंकता येईल यावर शिवसेनेचा भर आहे, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.

त्याबदल्यात सचिन अहिर यांना विधानपरिषद दिली जाऊ शकते अशीही शक्यता आहे. मात्र असं असलं तरी विद्यमान आमदार सुनिल शिंदे यांचं पुनर्वसन कसं आणि कुठे करणार हा प्रश्न अनुत्तरीत आहे.

आदित्य ठाकरेंसाठी तदारसंघांची चाचपणी

गेल्या वर्षभरापासून आदित्य ठाकरे यांच्यासाठी सुरक्षित मतदारसंघाची चाचपणी सुरु आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जोगेश्वरी, ते स्वतः राहात असलेला वांद्रे पूर्व येथील खेरवाडी, माहीम, वरळी आणि शिवडी या मतदारसंघाचा प्रामुख्याने विचार झाला. लोकसभा निवडणुकीच्या निकालांच्या आकडेवारीनंतर वरळी आणि माहीम या दोन मतदारसंघाची सर्वाधिक चर्चा आहे. वरळीत सुनील शिंदे आणि माहिममध्ये सदा सरवणकर हे पक्षाचे आमदार आहेत.

संबंधित बातम्या 

राष्ट्रवादीला मोठे खिंडार, मुंबई अध्यक्ष सचिन अहिर शिवसेनेत प्रवेश करणार : सूत्र

स्पेशल रिपोर्ट : वांद्रे ते वरळी, आदित्य ठाकरेंसाठी मतदारसंघ कोण सोडणार?  

आदित्य ठाकरेंकडून विधानसभेसाठी या दोन मतदारसंघांची चाचपणी?    

दोन मतदारसंघांची चाचपणी, मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्याने आदित्य विधानसभेच्या रिंगणात?   

आदित्य ठाकरे शिवसेनेकडून उपमुख्यमंत्रीपदाचा चेहरा?