चलो मुंबई… हेच का अच्छे दिन?; शिंदे सरकारच्या विरोधात संभाजीराजे मोर्चा काढणार

Sambhajiraje Morcha Agaist Shinde Government : चलो मुंबई... हेच का अच्छे दिन? संभाजीराजे छत्रपती यांनी भाजप- शिवसेना सरकारला सवाल विचारला आहे. शिंदे सरकारच्या विरोधात संभाजीराजे मोर्चा काढणार आहेत. त्यांनी फेसबुकच्या माध्यमातून त्यांनी याची घोषणा केली आहे. वाचा...

चलो मुंबई... हेच का अच्छे दिन?; शिंदे सरकारच्या विरोधात संभाजीराजे मोर्चा काढणार
संभाजीराजे छत्रपतीImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Oct 02, 2024 | 10:43 AM

स्वराज्य पक्षाचे प्रमुख संभाजीराजे छत्रपती हे शिंदे सरकारच्या विरोधात मोर्चा काढणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांचं अरबी समुद्रात भव्य स्मारक उभारण्याची घोषणा करण्यात आली. मात्र ते अद्यापपर्यंत पूर्ण झालेलं नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिवस्मारकाचं जलपूजन झालं. मात्र आता आठ वर्षे उलटून गेली असताना अद्याप शिवस्मारकाचं काम झालेलं नाही. यावरून छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज संभाजीराजे यांनी सरकारला घेरलं आहे. येत्या सहा ऑक्टोबरला संभाजीराजे यांच्या नेतृत्वात मोर्चा काढला जाणार आहे. मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया परिसरात आंदोलन केलं जाणार आहे.

संभाजीराजे यांनी शिंदे सरकारला इशारा दिला आहे. अरबी समुद्रातील हे शिवस्मारक अद्यापही कुठे दिसत नाही. चला तर मग, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जलपूजन केलेले अरबी समुद्रातील शिवस्मारक शोधायला, असं म्हणत संभाजीराजे यांनी मोर्चाची हाक दिली आहे. चलो मुंबई… हेच का अच्छे दिन? असा सवालही संभाजी राजे यांनी केला आहे.

संभाजीराजे यांची पोस्ट

#चलो_मुंबई

मुंबईच्या अरबी समुद्रात जगातील सर्वात उंच असे जागतिक दर्जाचे भव्य शिवस्मारक साकारू, अशी स्वप्ने शिवप्रेमी जनतेला दाखवत मागील तीन दशकांत राज्यात अनेक सरकारे आली आणि गेली. २४ डिसेंबर २०१६ रोजी भाजप – शिवसेना प्रणित महायुती सरकारने अत्यंत भव्यदिव्य कार्यक्रमाचे आयोजन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अरबी समुद्रात शिवस्मारकाचे जलपूजन केले. स्मारकाच्या कामांस सुरुवात झाल्याच्या अनेक बातम्या आल्या. शासनाच्या रेकॉर्डवर या स्मारकासाठी कोट्यवधी रुपये खर्च देखील झाले आहेत. येत्या काही दिवसांत या जलपूजन कार्यक्रमास आठ वर्षे पूर्ण होतील, मात्र अरबी समुद्रातील हे शिवस्मारक अद्यापही कुठे दिसत नाही… चला तर मग, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जलपूजन केलेले अरबी समुद्रातील शिवस्मारक शोधायला… रविवार, दि. ०६ ऑक्टोबर २०२४ रोजी, सकाळी ठीक ११ वाजता स्थळ : गेट वे ऑफ इंडिया, मुंबई.

विधानसभा निवडणुकीआधी संभाजीराजे छत्रपती हे अॅक्टिव्ह मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळत आहे. स्वराज्य या त्यांच्या पक्षाला ‘सप्तकिरणांसह पेनाची निब’ हे चिन्हही निवडणूक आयोगाने दिलं आहे. अशातच आता ते सरकारच्या विरोधात आंदोलन करणार आहेत. शिवस्मारकावरून त्यांनी काही सवाल उपस्थित केले आहेत.

'फुकट कसले पैसे देताय?', 'लाडकी बहीण'वरून राज ठाकरेंचे सरकारवर ताशेरे
'फुकट कसले पैसे देताय?', 'लाडकी बहीण'वरून राज ठाकरेंचे सरकारवर ताशेरे.
...म्हणून बाबा सिद्दीकींची हत्या केली, बिश्नोई गँगचा मोठा खुलासा उघड
...म्हणून बाबा सिद्दीकींची हत्या केली, बिश्नोई गँगचा मोठा खुलासा उघड.
भुजबळांचा सरकारला घरचा आहेर; हत्येची जबाबदारी गृहमंत्र्यांची नाही तर…
भुजबळांचा सरकारला घरचा आहेर; हत्येची जबाबदारी गृहमंत्र्यांची नाही तर….
'तुम्ही सिंघम ना, आता राष्ट्रपतींनी तुम्हाला परमवीर चक्र द्यायचं का?'
'तुम्ही सिंघम ना, आता राष्ट्रपतींनी तुम्हाला परमवीर चक्र द्यायचं का?'.
'गृहमंत्र्यांना हकला; रात्री हुडी घालून..', राऊतांचा फडणवीसांवर निशाणा
'गृहमंत्र्यांना हकला; रात्री हुडी घालून..', राऊतांचा फडणवीसांवर निशाणा.
सिद्दिकींची हत्या; कुठे होणार अंत्यसंस्कार? कूपरमध्ये शवविच्छेदन सुरु
सिद्दिकींची हत्या; कुठे होणार अंत्यसंस्कार? कूपरमध्ये शवविच्छेदन सुरु.
सिद्दिकींची हत्या करणारे बिश्नोई गँगशी सबंधित, तपासातून काय आलं समोर?
सिद्दिकींची हत्या करणारे बिश्नोई गँगशी सबंधित, तपासातून काय आलं समोर?.
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणी 2 आरोपी अटकेत, तिसऱ्याची ओळख पटली
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणी 2 आरोपी अटकेत, तिसऱ्याची ओळख पटली.
झिशान सिद्दीकी थोडक्यात बचावले, गोळीबाराच्या आधी एक फोन आला अन्...
झिशान सिद्दीकी थोडक्यात बचावले, गोळीबाराच्या आधी एक फोन आला अन्....
अजितदादा गटाचे नेते बाबा सिद्दीकींचा गोळीबारात मृत्यू, नेमक काय घडल?
अजितदादा गटाचे नेते बाबा सिद्दीकींचा गोळीबारात मृत्यू, नेमक काय घडल?.