कोरोना संकटानंतर शाळेची पहिली घंटा, काय काय घडतंय?

आजपासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरु होत आहेत. शाळा पुन्हा सुरु होणार असल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये आनंदाचं आणि उत्सुकतेचं वातावरण आहे.

कोरोना संकटानंतर शाळेची पहिली घंटा, काय काय घडतंय?
Follow us
| Updated on: Jan 27, 2021 | 10:03 AM

मुंबई : कोरोनामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून बंद असलेल्या शाळा आजपासून अनलॉक होणार आहेत (Schools Reopening In Maharashtra). आजपासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरु होत आहेत. शाळा पुन्हा सुरु होणार असल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये आनंदाचं आणि उत्सुकतेचं वातावरण आहे. गेल्या 9 ते 10 महिन्यांपासून या शाळा बंद होत्या. राज्यातील महत्त्वाच्या शहरांत आता शाळेची घंटा वाजणार आहे. तर, इतक्या दिवसांनी वर्गात पुन्हा एकदा मित्र-मैत्रिणींसोबत एकाच बेंचवर बसून धम्माल करता येणार असल्याने विद्यार्थी मात्र कमालीचे खुश आहेत (Schools Reopening In Maharashtra).

पालकांचं संमतीपत्र घेऊनच विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देण्यात येणार आहे. तशा सूचना पालकांना देण्यात आल्या आहेत. तसेच, शिक्षकांना आरटीपीसीआर चाचणीचे बंधन करण्यात आलं आहे. दुसरीकडे शाळेच्या निर्जंतुकीकरणासह कोव्हिडचे नियम पाळणंही बंधनकारक करण्यात आलं आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्रे, तालुकास्तारावर ग्रामीण आणि उपजिल्हा रुग्णालये तसेच, सांगली-मिरजेतील शासकीय रुग्णालयात चाचण्या सुरु करण्यात आल्या आहेत. महिपालिकेनेही आरोग्य केंद्रांमध्ये सोय केली आहे. मोठ्या संख्येने शिक्षक असलेल्या शाळांमध्ये आरोग्य कर्मचारी स्वत: भेट देत आहेत.

आतापर्यंत काय-काय घडलं?

>> 15 मार्च 2020 पासून विद्यार्थी शाळेत गेलेले नाहीत, त्यामुळे नवीन सुरुवातीसाठी ते उत्सुक आहेत

>> मित्र-मैत्रिणींना पुन्हा भेटण्याची उत्सुकता

>> गेल्या तीन-चार महिन्यांपासून ऑनलाईन शिक्षण सुरु

>> ऑनलाईन शिक्षणात तांत्रिक अडचणींचा सामना विद्यार्थ्यांना करावा लागला, मोबाईल उपलब्ध नसणे, नेटसाठी पैसे नसणे, नेटवर्क नसणे इत्यादी सर्व समस्या विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना सोसाव्या लागल्या.

>> मार्च महिन्यापासून मुलं घरीच असल्याने पालकंही चिंतेत होते

>> घरात जर दोन-तीन मुलं असतील तर त्यांना एकच मोबाईल कसा पुरणार, ही मोठी समस्या पालकांपुढे होती

>> परिक्षा तोंडावर असल्याने विद्यार्थ्यांना वर्ग सुरु होण्याची प्रतिक्षा

कुठल्या जिल्ह्यात काय तयारी?

कोल्हापूर – तब्बल दहा महिन्याच्या कालावधी नंतर शाळांचा परिसर गजबजला आहे. कोरोना सुरक्षेचे नियम पाळत कोल्हापूरमधील शाळा सुरु झाल्या. थर्मल चेकिंग, सॅनिटाझेशन करूनच विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश दिला जातोय. पालकांचे संमतीपत्र ही आवश्यक.

पुणे – शहरातील शाळा येत्या 1 फेब्रुवारीपासून उघडण्यात येणार आहेत. शासनाने घालून दिलेल्या अटी आणि नियमांनुसार कोरोनाच्या उपाययोजना करुन शाळा उघडल्या जाणार आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या काळजीस्तव शाळांचं रोजच्या रोज सॅनिटायझिंग तसंच फिजिकल डिस्टन्सिंग इ. नियमांचं पालन केलं जाणार आहे, अशा प्रकारचा निर्णय पुणे महापालिकेने घेतलाय (Schools Reopening In Maharashtra).

नागपूर – कोव्हिड काळात बंद असलेल्या शाळा आजपासून सुरु होणार आहे. नागपूर ग्रामीणमध्ये 5 वी ते 8 वी पर्यंतचे वर्ग सुरु करण्यात येणार आहे. तब्बल 10 महिन्यानंतर 1668 शाळांमध्ये वर्ग सुरु होणार आहेत. नागपूर ग्रामीणमध्ये 5 वी ते ८ पर्यंतचे 1 लाख 48 हजार विद्यार्थी आहेत. पालकांचं संमतीपत्र घेऊनंच शाळा सुरु होणार आहेत. तसंच शिक्षकांना आरटीपीसीआर चाचणीचे बंधन करण्यात आलं आहे. दुसरीकडे शाळेच्या निर्जंतुकीकरणासह कोव्हिडचे नियम पाळणंही बंधनकारक करण्यात आलं आहे.

रत्नागिरी – जिल्ह्यातील पाचवी ते आठवी पर्यंतच्या शाळांचा आजपासून श्रीगणेशा होणार आहे. गेल्या 10 महिन्यांपासून कोरोना काळात तथा लॉकडाऊनमुळे शाळा बंद होत्या. आता कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने आजपासून रत्नागिरीतील शाळा सुरु होत आहेत. जिल्ह्यातील सर्व माध्यमातील 3202 शाळा आज उघडणार आहेत. पाचवी ते आठवीपर्यंत शिकणाऱ्या मुलांची संख्या 80 हजारांवर आहे. शाळा सुरु होण्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील 3 हजार 695 शिक्षकांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. शाळेच्या निर्जंतुकीकरणासह कोव्हिडचे नियम पाळणंही बंधनकारक करण्यात आलं आहे.

Schools Reopening In Maharashtra

संबंधित बातम्या :

मुंबईपाठोपाठ ठाण्यातील शाळा आणि महाविद्यालय 15 जानेवारीपर्यंत बंद, जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

Pimpri Chinchwad | पिंपरी चिंचवडमध्ये नववी ते बारावी शाळा सुरू, विद्यार्थ्यांची जेमतेम हजेरी

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.