Sharad Pawar : “बारामतीच्या गांधीसाठी नथुराम तयार करण्याची वेळ” पवारांना उद्देशून पोस्ट, जितेंद्र आव्हाडांची कारवाईची मागणी

Sharad Pawar : बारामतीच्या गांधीसाठी नथुराम तयार करण्याची वेळ पवारांना उद्देशून पोस्ट, जितेंद्र आव्हाडांची कारवाईची मागणी
"बारामतीच्या गांधीसाठी नथुराम तयार करण्याची वेळ" पवारांना उद्देशून पोस्ट, जितेंद्र आव्हाडांची कारवाईची मागणी
Image Credit source: tv9

आत तुम्ही म्हणाल की या पोस्टमध्ये असं काय आहे. की ज्याची एवढी चर्चा सुरू आहे. तर या पोस्टमध्ये चक्क शरद पवारांना (Sharad Pawar) उद्देशून धमकीवजा इशाराच देण्यात आलाय. त्यामुळेच जितेंद्र आव्हाडांनी याला शोधून याच्यावर कारवाई करा अशी मागणी (Police) केली आहे.

दादासाहेब कारंडे

|

May 13, 2022 | 5:16 PM

मुंबई : राज्याच्या राजकारणात सध्या एकामागोमाग एक खळबळ करणारी प्रकरण घडत आहेत. राज ठाकरेंना धमकी आल्याचं आणि त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आल्याचं प्रकरण ताजं असताना आता मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी एक पोस्ट केली आहे. जी सध्या सोशल मीडियासहीत सगळीकडे व्हायरल होत आहे. आत तुम्ही म्हणाल की या पोस्टमध्ये असं काय आहे. की ज्याची एवढी चर्चा सुरू आहे. तर या पोस्टमध्ये चक्क शरद पवारांना (Sharad Pawar) उद्देशून धमकीवजा इशाराच देण्यात आलाय. त्यामुळेच जितेंद्र आव्हाडांनी याला शोधून याच्यावर कारवाई करा अशी मागणी (Police) केली आहे. “वेळ आली आहे बारामतीच्या “गाधी”साठी….बारामतीचा नथुराम गोडसे तयार करायची ….#बाराचा-काका-माफी-माग” अशा आशयाच्या या पोस्टने सध्या खळबळ उडवून दिली आहे. त्यामुळे आता यावर जोरदार प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

जितेंद्र आव्हाडांची मागणी काय?

या पोस्टचा स्क्रीनशॉट मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केला आहे. तसेच “काय पातळी वर हे सगळे होते आहे … ह्या विकृत इसमा विरुद्ध कडक कारवाई करा ” अशी मागणी करत त्यांनी पोलिसांना टॅग केले आहे.

जितेंद्र आव्हाडांचं ट्विट

हे ट्विट कोणत्या अकाऊंटवरून

हे ट्विट ज्या अकाऊंटवरून ट्विट करण्यात आलंय. त्या अकाऊंटचं नाव आहे Nikhil bhamre. आणि ते ट्विट रिट्विट केलंय. मनोज बागलाणकर या नावाच्या अकाऊंटवरून त्यामुळे पोलीस आता या दोन्ही अकाऊंटवर आणि या पोस्ट करणाऱ्यावर कारवाई करण्याची शक्यता आहे.

अनेक नेत्यांना धमक्या

आजकाल सोशल मीडियाचा जमाना आहे. कुठल्या नेत्याला धमकी येणे किंवा त्यांच्याबाबत अशा पोस्ट फिरण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही अनेक बड्या नेत्यांना जीवे मारण्याच्या धमक्या येईपर्यंत घडामोडी घडल्या आहेत. पोलिसांनी अशा प्रकरणात वेळोवेळी अनेकांना अटकही केली आहे. आता जितेंद्र आव्हांच्या या ट्विटनंतर पोलिसांच्या हाती काय लागतंय? हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मात्र राज्यातलं सध्याचं राजकीय वातावरण हे हिंदूत्व आणि इतर मुद्द्यांवरून तापलं असताना महाविकास आघाडीचे प्रमुख नेते शरद पवार यांच्याबाबतच अशी पोस्ट व्हायरल झाल्याने खळबळ माजली आहे. त्यावरून पुन्हा राजकारण तापलं आहे.

हे सुद्धा वाचा


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें