EXCLUSIVE : मुंबईत ठाकरे गटाच्या संभाव्य 22 उमेदवारांची नावं समोर, नेमका प्लॅन काय? आदित्य ठाकरे कुठून लढणार?

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गट चांगलाच कामाला लागला आहे. ठाकरे गटाकडून मुंबईत 22 जागांवर चाचपणी सुरु आहे. विशेष म्हणजे या 22 जागांवर उमेदवारांची नावे देखील निश्चित झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

EXCLUSIVE : मुंबईत ठाकरे गटाच्या संभाव्य 22 उमेदवारांची नावं समोर, नेमका प्लॅन काय? आदित्य ठाकरे कुठून लढणार?
Follow us
| Updated on: Sep 05, 2024 | 4:19 PM

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पुढच्या दोन महिन्यांत विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या गोटात जोरदार घडामोडी सुरु आहेत. गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीच्या नेत्यांची मुंबईतील फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये बैठकांचं सत्र सुरु आहे. या बैठकीत सुरुवातीला मुंबईतील जागांबाबत निर्णय घेतला जात होता. या बैठकीत प्रत्येक पक्षाकडून वेगवेगळा दावा केला जात होता. मुंबईत विधानसभेच्या एकूण 36 जागा आहेत. या जागांपैकी ठाकरे गट 20 ते 22 जागांवर निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे. विशेष म्हणजे ठाकरे गटाच्या संभाव्य 22 उमेदवारांची यादी टीव्ही 9 मराठीच्या हाती लागली आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ठाकरे गटाची मुंबईत 22 नावांवर प्राथमिक चर्चा सुरु आहे. टीव्ही 9 मराठीकडे ठाकरे गटाच्या संभाव्य उमेदवारांची यादीच हाती लागली आहे. तसेच ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनीदेखील याबाबत महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. संबंधित यादी संभाव्य आहे. या यादीत विद्यमान आमदारांना संधी देण्यात आली आहे. तसेच नवीन तरुणांनादेखील या यादीत संधी दिली जाताना दिसत आहे. तरुणांना संधी दिलीच पाहिजे आणि जुने जाणते लोकं त्यामध्ये असणं जरुरीचं आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जो निर्णय घेतील तो आम्हा सर्वांना मान्य असेल, अशी प्रतिक्रिया किशोरी पेडणेकर यांनी दिली.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेनेने गेल्या विधानसभा निवडणुकीत 14 जागांवर विजय मिळवला होता. मुंबई हा ठाकरेंचा बालेकिल्ला आहे. लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे तीन जागा जिंकल्या होत्या. तर चौथ्या जागेवर निसटता पराभव झाला होता. त्यामुळे ठाकरेंचं वर्चस्व सिद्ध करण्यासाठी आगामी विधानसभा निवडणूक ही ठाकरे गटासाठी जास्त महत्त्वाची आहे.

संभाव्य उमेदवारांची यादी

  1. वरळी मतदारसंघ – आदित्य ठाकरे
  2. दहिसर – तेजस्विनी घोसाळकर
  3. वांद्रे पूर्व – वरुण सरदेसाई
  4. दिंडोशी – सुनील प्रभू
  5. विक्रोळी – सुनील राऊत
  6. अंधेरी पूर्व – ऋतुजा लटके
  7. कलिना – संजय पोतनीस
  8. कुर्ला – प्रविणा मोरजकर
  9. वडाळा – श्रद्धा जाधव
  10. जोगेश्वरी- अमोल कीर्तिकर
  11. चारकोप – नीरव बारोट
  12. गोरेगाव – समीर देसाई
  13. भांडूप – रमेश कोरगांवकर
  14. चांदिवली – ईश्वर तायडे
  15. दादर-माहिम – सचिन अहिर, विशाखा राऊत
  16. वर्सोवा – राजू पेडणेकर/ राजूल पटेल
  17. शिवडी – अजय चौधरी/ सुधीर सालवी
  18. भायखळा – किशोरी पेडणेकर/ जामसुतकर/ रहाटे
  19. चेंबूर – अनिल पाटणकर/ प्रकाश फार्तेपेकर
  20. अणुशक्तीनगर – विठ्ठल लोकरे / प्रमोद शिंदे
  21. घाटकोपर – सुरेश पाटील
  22. मागाठाणे – विलास पोतनीस / सुदेश पाटेकर/ संजना घाडी ⁠
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार.
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर.
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा.
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट.
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली.
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी.
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?.
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?.
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?.
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा.