Eknath Shinde: शिवसेनेच्या सर्वच्या सर्व 18 खासदारांना भावना गवळींचाच व्हीप लागणार; एकनाथ शिंदेंचं थेट उत्तर

  नवी दिल्लीः राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रातील राजकारण आणखीन ढवळून काढले. आम्हीच खरी शिवसेना, आम्ही फक्त गटनेता बदलला, त्यामुळे सर्व 18 खासदारांना भावना गवळींचा (Shivsena MP Bhavna Gawali) व्हीप (Whip) लागू होईल असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. एकनाथ शिंदे गटावर जोरदारपणे टीका होत […]

Eknath Shinde: शिवसेनेच्या सर्वच्या सर्व 18 खासदारांना भावना गवळींचाच व्हीप लागणार; एकनाथ शिंदेंचं थेट उत्तर
महादेव कांबळे

|

Jul 19, 2022 | 7:18 PM

 

नवी दिल्लीः राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रातील राजकारण आणखीन ढवळून काढले. आम्हीच खरी शिवसेना, आम्ही फक्त गटनेता बदलला, त्यामुळे सर्व 18 खासदारांना भावना गवळींचा (Shivsena MP Bhavna Gawali) व्हीप (Whip) लागू होईल असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. एकनाथ शिंदे गटावर जोरदारपणे टीका होत असली तरी यावेळी त्यांनी सांगितले की, आम्ही कुठलंही नियमबाह्य काम केलं नाही असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. बंडखोर आमदारांप्रमाणेच शिवसेनेचे खासदार शिंदे गटात सामील झाल्याने शिवसेनेला आणखी एक जबर धक्का बसला.

त्यांची कशाला दखल घ्यायची

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, आजच्या पत्रकार परिषदेला उपस्थित शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते, मुख्यप्रतोद भावना गवळी, कृपाल तुमाने, सदाशिव लोखंडे, हेमंत गोडसे, प्रतापराव जाधव, खासदार संजय मंडलिक, धैर्यशील माने, हेमंत पाटील, अप्पा बारणे, राजेंद्र गावीत, श्रीकांत शिंदे उपस्थित असल्याचे सांगत त्यांना कोणताही दबाव वगैरे नाही आणि दबाव आहे असं म्हणणाऱ्या संजय राऊतांचे नाव न घेता त्यांना त्यांची कशाला दखल घ्यायची असा टोलाही त्यांनी लगावला.

लोकसभा अध्यक्षांकडे 12 खासदारांनी पत्र दिले

एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले की, शिवसेनेचे सर्व बारा खासदार येथे उपस्थित आहेत. त्यामुळे त्यांनी आज लोकसभा अध्यक्षांकडे शिवसेना लोकसभा गट तयार करून त्यांनी पत्र दिल्याचेही त्यांनी सांगितले. लोकसभा अध्यक्षांकडे 12 खासदारांनी पत्र दिले असून त्या बारा खासदारांनी खासदार भावना गवळींनाच पक्ष प्रतोद बनवा अशी मागणीही खासदारांनी केली आहे.

दिल्लीत येण्याचं कारण…

तसेच यावेळी एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत येण्याचं कारण सांगताना ते म्हणाले की, ओबीसी आरक्षणावर उद्या सुनावणी आहे, त्यामुळे बेळगावात आलो असल्याच त्यांनी सांगितले. तसेच ओबीसी आरक्षणाबाबत वकिलांची भेट घेतली आहे. एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, सर्वात आधी 12 खासदारांचं मनापासून स्वागत करl असल्याचे सांगत आम्ही महाराष्ट्रात बाळासाहेबांच्या विचाराची भूमिका, आनंद दिघे यांचे विचार घेऊन आम्ही महाराष्ट्रात युतीचं सरकार स्थापन केलं असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केले.


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें