Azad maidan Farmers Protest | आम्ही शेतकऱ्यांची लेकरं, फॅशन स्ट्रीट बंद ठेवून व्यापाऱ्यांचा आंदोलनाला पाठिंबा

फॅशन स्ट्रीटवरील दुकानदारांनी एक प्रकारे शेतकरी आंदोलनाला पाठिंबा असून, सर्वच स्तरांत हा चर्चेचा विषय ठरत आहे.

  • गिरीश गायकवाड, टीव्ही 9 मराठी, मुंबई
  • Published On - 13:15 PM, 25 Jan 2021
Azad maidan Farmers Protest | आम्ही शेतकऱ्यांची लेकरं, फॅशन स्ट्रीट बंद ठेवून व्यापाऱ्यांचा आंदोलनाला पाठिंबा
आझाद मैदान शेतकरी आंदोलन

मुंबईः दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी मुंबईतल्या आझाद मैदानात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू केलंय. राज्याच्या वेगवेगळ्या भागातून या आंदोलनात मोठ्या प्रमाणात शेतकरी सहभागी झालेत. विशेष म्हणजे शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ मुंबईच्या एमजी रोडवरील फॅशन स्ट्रीटवरील सर्व दुकानं बंद करण्यात आलीत. फॅशन स्ट्रीटवरील दुकानदारांनी एक प्रकारे शेतकरी आंदोलनाला पाठिंबा असून, सर्वच स्तरांत हा चर्चेचा विषय ठरत आहे. (Shopkeepers On Fashion Street Support The Farmers Movement)

शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या आझाद मैदानापासून मंत्रालयाकडे जाणारा रस्ता पोलिसांनी बंद केलाय. मंत्रालयाकडून इस्टर्न एक्सप्रेस हायवे, काळबादेवी रोड, मरीन लाईन्स स्टेशनकडे जाणारा रस्ता बंद करण्यात आलाय. दोन्ही रस्त्यावर पोलिसांची बॅरिकेटिंग आणि मोठा पोलीस फौजफाटा तैनात केलाय. शेतकरी राजभवनावर मोर्चा काढण्यावर ठाम असल्याने पोलिसांपुढे नियोजनाचं मोठ्ठं आव्हान आहे. दोन्ही रस्ते झिरो ट्रॅफिक घोषित करण्यात आलेत.

फॅशन स्ट्रीटवरील दुकानदारांचा ऐतिहासिक निर्णय

दीड किलोमीटरपर्यंत रस्त्याला लागून असलेल्या दुकानदारांना शेतकऱ्यांनी जाहीर पाठिंबा दिला असून, दुकानदारांचा हा निर्णय ऐतिहासिक समजला जातोय. तिन्ही कायदे मोदी सरकारने परत घ्यावेत, आम्हीही शेतकऱ्यांचीच लेकरं आहोत हे कायदे रद्द झालेच पाहिजेत, असा पवित्राही फॅशन स्ट्रीटवरील सर्व दुकानदारांनी घेतलाय.

एमजी रोड झिरो ट्रॅफिक रोड म्हणून घोषित

तसेच या आंदोलनाला काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेने जाहीर पाठिंबा दिलाय. शेतकरी आंदोलनात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) सहभागी होणार आहेत. त्यामुळे व्हीआयपी मूव्हमेंट लक्षात घेत एमजी रोडला झिरो ट्रॅफिक रोड म्हणून घोषित करण्यात आलंय. दोन्ही बाजूंना वाहन पार्किंगला सक्त मनाई करण्यात आलीय.

आमचे जाहीर समर्थन, मोठ्या संख्येने सहभागी होऊ

केंद्र सरकारने लागून केलेल्या कृषी कायद्यांना काँग्रेसने सुरुवातीपासून प्रखर विरोध केला आहे. या कायद्यांविरोधात काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंजाबमध्ये ट्रॅक्टर रॅलीसुद्धा काढली होती. महाराष्ट्रातही प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली हजारोच्या संख्येने जिल्हावार मोर्चे काढण्यात आले होते. त्यानंतर आता प्रजासत्ताक दिनाच्या एक दिवस आधी मुंबईतील आझाद मैदानावरील मोर्चाला प्रदेश काँग्रेसने जाहीर समर्थन केले आहे. “सरकारने शेतकऱ्यांच्या विरोधात कृषी कायदे बनवले आहेत. या कायद्यांविरोधात दिल्लीत आंदोलन सुरु आहे. मात्र, सरकारला त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी वेळ नाही. दिल्लीतील या आंदोलनाला आमचे समर्थन आहे. आम्ही नेते आणि काँग्रेसचे सर्यकर्ते मुंबईच्या मोर्चात सहभागी होणार आहोत,” असे बाळासाहेब थोरात म्हणाले.

संबंधित बातम्या :

Farmer Protest : मुंबईत ‘लाल वादळ’ घोंघावणार!, कसा असेल पोलीस बंदोबस्त?

मुख्यमंत्र्यांनी शेतकरी आंदोलनत सहभागी होऊ नये; पवारांनी दिलं ‘हे’ कारण!

Shopkeepers On Fashion Street Support The Farmers Movement