प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाची खास व्यवस्था, पश्चिम रेल्वे मार्गावर सौरउर्जेवर चालणारे 15 चार्जिंग पॉइंट

पश्चिम रेल्वे प्रशासनाद्वारे पर्यावरणस्नेही स्थानके उभारण्याचा संकल्प करण्यात आला आहे. त्यानुसार पश्चिम रेल्वेमार्गावर पर्यावरणपूरक यंत्रणा (solar energy mobile charging service on western railway) आणण्यावर भर दिला जात आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 18:30 PM, 29 Dec 2019
प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाची खास व्यवस्था, पश्चिम रेल्वे मार्गावर सौरउर्जेवर चालणारे 15 चार्जिंग पॉइंट

मुंबई : पश्चिम रेल्वे प्रशासनाद्वारे पर्यावरणस्नेही स्थानके उभारण्याचा संकल्प करण्यात आला आहे. त्यानुसार पश्चिम रेल्वेमार्गावर पर्यावरणपूरक यंत्रणा (solar energy mobile charging service on western railway) आणण्यावर भर दिला जात आहे. पश्चिम रेल्वेमार्गावरील 15 स्थानकांवर सौरऊर्जेवर चालणारे मोबाइल चार्जिंग पॉइंट उभारण्यात आले आहेत. त्यामुळे आता लोकांना आवश्यक स्थितीमध्ये मोबाइल चार्जिंग (solar energy mobile charging service on western railway) करता येणार आहे.

प्रवाशांच्या सुविधेसाठी पश्चिम रेल्वेमार्गावरील 15 स्थानकांत 24 तास विनामूल्य चार्जिंग सेवा उपलब्ध होणार आहे. सौरऊर्जेवर चालणाऱ्या मोबाइल चार्जिंग पॉइंटमध्ये एका वेळी 8 फोन चार्जिंग करता येणार आहे. तर, एका दिवसात 100 पेक्षा जास्त फोन चार्ज होऊ शकतात.

पश्चिम रेल्वेमार्गावरील चर्चगेट, ग्रॅण्ट रोड, मुंबई सेंट्रल, लोअर परळ, दादर, सांताक्रुझ, अंधेरी, कांदिवली, वसई रोड, नालासोपारा, विरार, बोईसर, पालघर येथे प्रत्येकी एक मशीन बसविण्यात आली आहे. तर बोरीवली येथे दोन मशीन बसवण्यात आल्या आहेत.

याशिवाय आणखी पाच स्थानकांवर सौरऊर्जेवर चालणारे मोबाइल चार्जिंग पॉइंट बसवण्यात येणार आहेत. सौरऊर्जेवर चालणारे मोबाइल चार्जिंग पॉइंट हे 100 टक्के सौरऊर्जेवर चालणारे आहेत.