CM Eknath Shinde: सावंतवाडीतील मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या उभारणीला गती द्या; मुख्यमंत्र्यांनी सिंधुदुर्गसह नांदेडमधील विकास कामांचा घेतला आढावा

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथे प्रस्तावित मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमुळे जनतेची सोय होणार असून तातडीने वैद्यकीय सेवा उपलब्ध होऊ शकणार आहे. हे हॉस्पिटल लवकरात लवकर उभे रहावे यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने प्रयत्न करावेत, असे निर्देशही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले आहेत.

CM Eknath Shinde: सावंतवाडीतील मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या उभारणीला गती द्या; मुख्यमंत्र्यांनी सिंधुदुर्गसह नांदेडमधील विकास कामांचा घेतला आढावा
Follow us
| Updated on: Jul 16, 2022 | 6:33 PM

मुंबईः सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी (Sawantwadi) येथे प्रस्तावित मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमुळे (Proposed Multispecialty Hospital)  जनतेची सोय होणार असून तातडीने वैद्यकीय सेवा उपलब्ध होऊ शकणार आहे. हे हॉस्पिटल लवकरात लवकर उभे रहावे यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने प्रयत्न करावेत, असे निर्देशही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी आज दिले आहेत. सिंधुदुर्ग आणि नांदेड जिल्ह्यातील विविध प्रश्नांसदर्भात आज सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीला आमदार दीपक केसरकर, राज्याचे मुख्य सचिव मनू कुमार श्रीवास्तव, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सुहास पेडणेकर, अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक जयश्री भोज यासह इतर वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 आंबोली-गेळे जमीन वाटपाची चर्चा

या बैठकीत आंबोली (चौकुळ) व गेळे येथील कबुलायतदार गावकर सदरातील जमिनीच्या वाटपाबाबत, मुंबई विद्यापीठाच्या सिंधुदुर्ग उपकेंद्रासाठी आंबोली, (ता. सावंतवाडी) येथील जागा देण्याबाबत, आंबोली येथील एमटीडीसीच्या ताब्यातील पायाभूत सुविधा असलेली इमारत हॉस्पिस्टॅलिटी मॅनेजमेंट कोर्सेस चालविण्याकरिता मुंबई विद्यापीठाला मिळणेबाबत तसेच वेंगुर्ला येथे सिंधू स्वाध्यायसाठी मुंबई विद्यापीठाला जागा मिळणेबाबत चर्चा करण्यात आली.

नांदेड शहरातील विकासकामांचा आढावा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नांदेड शहर आणि परिसरातील रस्ते व पूल, नवीन इमारती, रस्त्यांची दुरुस्ती याबाबत आढावा आज घेतला. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे आज झालेल्या या बैठकीला आमदार बालाजी कल्याणकर, राज्याचे मुख्य सचिव मनू कुमार श्रीवास्तव, अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

 शहरातील रस्त्यांची कामे महत्वाची

यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले की, सध्या पावसाळ्याच्या दृष्टीने शहरातील रस्त्यांची कामे महत्वाची आहेत. परिसरातील विकासकामांचा प्राधान्यक्रम ठरवा त्यानुसार कामं करा. या कामांसाठी निधी उपलब्ध करुन देण्याचे निर्देशही त्यांनी संबधित विभागांना देण्यात आले आहेत.

Non Stop LIVE Update
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा.
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?.
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?.
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा.