Mumbai | मुंबईमध्ये डेंग्यू आणि मलेरियाचा धोका वाढला, पालिकेच्या कीटकनाशक विभागाने 47 लाख ठिकाणांची केली पाहणी!

एक मादी डास जवळपास 150 अंडी एका वेळी घालते. विशेष म्हणजे मादी डास अंडी पाण्यामध्ये घालते. यामुळे महापालिकेकडून आवाहन केले जाते आहे की, साचवलेले पाणी आठ दिवसांमधून दोनदा काढा. यामुळे डासांची अंडी राहणार नाहीत. मलेरिया रोखण्यासाठी आपला परिसर स्वच्छ ठेवणे देखील खूप महत्वाचे आहे. पावसाळ्यामध्ये अनेक ठिकाणी पाणी साचत असल्यामुळे मलेरिया आणि डेंग्यूच्या डासांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढते.

Mumbai | मुंबईमध्ये डेंग्यू आणि मलेरियाचा धोका वाढला, पालिकेच्या कीटकनाशक विभागाने 47 लाख ठिकाणांची केली पाहणी!
Image Credit source: www.jnj.com
Follow us
| Updated on: Jun 08, 2022 | 8:40 AM

मुंबई : राज्यामध्ये सध्या कोरोनाच्या (Corona) रूग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसते आहे. त्यामध्येही मुंबईमध्ये सर्वाधिक कोरोना पाॅझिटिव्ह रूग्ण आहेत. आता धोक्याची घंटा म्हणजे मुंबईमध्ये डेंग्यू आणि मलेरिया या रोगांनी देखील पाय पसरवण्यास सुरूवात केलीये. पालिकेच्या (Municipal Corporation) कीटकनाशक विभागाने 47 लाख ठिकाणांची पाहणी केली आहे. डेंग्यू आणि मलेरिया रोखण्यासाठी पालिका प्रशासनाकडून महत्वाची पाऊले देखील उचलली जातायेत. तपासणी दरम्यान 10 हजार ठिकाणी डेंग्यूचा एडीस डास सापडला. तर मलेरियाचा प्रसार करणारा एनोफिलीस डास देखील 2214 ठिकाणी आढळून आला आहे. डेंग्यूच्या डासावर पांढऱ्या रंगाचे डाग असतात आणि हा सकाळच्या वेळीच चावतो. त्यानंतर व्यक्तीला डेंग्यूची (Dengue) लागण होते. डेंग्यूमध्ये प्रामुख्याने ताप जास्त असतो आणि झपाट्याने शरीरामधील पेशी कमी होण्यास सुरूवात होते.

एक मादी डास 150 अंडी एका वेळी घालते

एक मादी डास जवळपास 150 अंडी एका वेळी घालते. विशेष म्हणजे मादी डास अंडी पाण्यामध्ये घालते. यामुळे महापालिकेकडून आवाहन केले जाते आहे की, साचवलेले पाणी आठ दिवसांमधून दोनदा काढा. यामुळे डासांची अंडी राहणार नाहीत. मलेरिया रोखण्यासाठी आपला परिसर स्वच्छ ठेवणे देखील खूप महत्वाचे आहे. पावसाळ्यामध्ये अनेक ठिकाणी पाणी साचत असल्यामुळे मलेरिया आणि डेंग्यूच्या डासांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढते. सध्या महापालिकेकडून डेंग्यू आणि मलेरियाची डास सापडलेली ठिकाणे नष्ट करण्यात येत आहेत. ज्या भांड्यामध्ये आपण पाण्याची साठवणूक करतो, त्यातील पाणी काढून स्वच्छ धुवून एक दिवस ते उन्हामध्ये ठेवणे देखील आवश्यक आहे. यामुळे डेंग्यू आणि मलेरियाचा प्रसार रोखण्यास मदत होते.

हे सुद्धा वाचा

महापालिका आकारणार दंड

डेंग्यू होण्यापासून आपल्या सुरक्षित राहिचे असेल तर परिसरामध्ये किंवा घरामध्ये कुठेही पाणी साचू देऊ नका. कारण साचलेल्या पाण्यामध्ये डेंग्यूच्या डासांची उत्पती होण्यास सुरूवात होते. इतकेच नाहीतर आपल्या घराच्या परिसरामध्ये घाण केल्यास किंवा पाणी साचेल अशा वस्तू ठेवल्यातर पालिका कायदेशीर कारवाई करणार आहे. यामध्ये 10 हजार रूपयांपर्यत दंड आणि नोटीसही संबंध व्यक्तीला पालिकेकडून दिली जाईल. टाक्या, तलाव आदी ठिकाणी तपासणी केली जात आहे. बऱ्याच ठिकाणी डेंग्यू आणि मलेरिया पसरवणाऱ्या डासांची ठिकाणेही सापडली आहेत. यामुळे महापालिकेने नागरिकांना काळजी घेण्याची आणि आपला परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन केल आहे.

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.