मीरा-भाईंदरमध्ये 8 आणि 15 वर्षीय मुलींवर बलात्कार, परिसरात खळबळ

मीरा-भाईंदरमध्ये अल्पवयीन मुलींवर बलात्कार झाल्याच्या दोन घटना समोर आल्या आहेत. या दोन्ही घटनेतील आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

मीरा-भाईंदरमध्ये 8 आणि 15 वर्षीय मुलींवर बलात्कार, परिसरात खळबळ

मुंबई : मीरा-भाईंदरमध्ये अल्पवयीन मुलींवर बलात्कार झाल्याच्या दोन घटना समोर आल्या आहेत. या दोन्ही घटनेतील आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे (Minor Girl Rape). या घटनांमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दोन्ही आरोपींवर बलात्कार आणि पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे (Minor Girl Rape).

मीरारोड परिसरात एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाला. यावेळी मुलगी घरी एकटी असताना 51 वर्षीय अनिल जेटली नावाच्या व्यक्तीने तिच्यावर अत्याचार केला. आरोपी अनिल जेटली हा पीडितेच्या ओळखिचा असल्याची माहिती आहे. घडलेला प्रकार लक्षात येताच पीडितेच्या घरच्यांनी पोलिसांत धाव घेतली आणि अनिल जेटलीला अटक करण्यात आली.

दुसरी घटना भाईंदर पश्चिममध्ये घडली. येथे 8 वर्षीय मुलीवर बलात्कार झाला आहे. पीडित मुलगी खेळत असताना उमाशंकर गुप्ता (वय 43) नावाच्या भाजी विक्रेत्याने चॉकलेटचं आमिष देऊन तिला बोलावले आणि तिच्यावर बलात्कार केला. जखमी मुलीला नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी नराधम उमाशंकर गुप्ताला अटक करण्यात आली आहे.

या दोन्ही प्रकरणात आरोपींवर पोस्को, तसेच बलात्कारचा गुन्हा दाखल करुन दोन्ही घटनेतील आरोपींना अटक केली आहे, अशी माहिती मीरारोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक संदीप कदम यांनी दिली.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI