VIDEO: पत्रकारांवर राग का? राणे म्हणतात, माझ्या मैत्रीचा गैरफायदा घेतला, आणखी काय म्हणाले माध्यमांवर?

केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी पुन्हा एकदा पत्रकारांवर नाराजी व्यक्त केली आहे. काही लोकांनी माझ्या चांगुलपणाचा आणि मैत्रीचा गैरफायदा घेतला आहे. (Narayan Rane)

VIDEO: पत्रकारांवर राग का? राणे म्हणतात, माझ्या मैत्रीचा गैरफायदा घेतला, आणखी काय म्हणाले माध्यमांवर?
नारायण राणे, केंद्रीय मंत्री


मुंबई: केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी पुन्हा एकदा पत्रकारांवर नाराजी व्यक्त केली आहे. काही लोकांनी माझ्या चांगुलपणाचा आणि मैत्रीचा गैरफायदा घेतला आहे, अशा शब्दात नारायण राणे यांनी मीडियांबद्दलची जाहीर नाराजी बोलून दाखवली. (Union minister Narayan Rane slams media over coverage)

नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेण्यामागची पार्श्वभूमी विशद केली. रत्नागिरीवरून सकाळी साडेपाच वाजता मी मुंबईत पोहोचलो. दोन्ही निकाल माझ्या बाजूने लागले आहेत. याचा अर्थ देशात किंवा देश कायद्याने चालतो हे सिद्ध झालं आहे. 17 सप्टेंबरपर्यंत कोर्टाची केस असल्याने मी काही गोष्टीवर भाष्य करणार नाही. पण एवढा दौरा केल्यानंतर पत्रकारांना न भेटणं योग्य वाटलं नाही. म्हणून पत्रकारांना दौऱ्याची माहिती देण्यासाठी पीसी घेतली आहे, असं राणेंनी सांगितलं.

घडामोडींवर लक्ष ठेवून होतो

माझ्या त्या पत्रकार परिषदेनंतर या काळात मी सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून होतो. माझ्या चांगुलपणाचा आणि मैत्रीचा माझा गैरफायदा घेत आहेत हे सुद्धा माझ्या लक्षात आलं आहे, असं राणे यांनी सांगितलं. तुमच्या चांगुलपणाचा कुणी गैरफायदा घेतला? असा सवाल राणेंना करण्यात आला. त्यावेळी त्यांनी पत्रकारांनी माझा गैरफायदा घेतला, असं स्पष्ट केलं. यावेळी राणेंना कोणते पत्रकार आहे त्यांचं नाव सांगा असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा मात्र राणे केवळ हसले. त्यांनी त्यावर भाष्य करण्यास नकार दिला.

सोबत रेकॉर्डर ठेवणार

कोर्टाने आपल्याला बोलण्यावर काही निर्बंध लादले आहेत. 17 तारखेला पुढील सुनावणी होणार आहे. त्यामुळे इथून पुढे बोलताना मी पत्रकार परिषदेत एक रेकॉर्डरच घेऊन येणार आहे. पत्रकार परिषदेतील माझं संभाषण रेकॉर्ड करणार आहे. कारण वाक्य तोडूनमोडून दाखवली जातात, असंही त्यांनी सांगितलं.

काय पत्रकारिकात आहे?

या सर्व लढ्यात आमच्या विरोधी मित्राने लढा सुरु केला. त्यामध्ये माझा पक्ष माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहीला. त्यामुळे मी जे पी नड्डा, चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस तसेच सर्व कार्यकर्त्यांचा आभारी आहे. मी असं काय बोललो होतो त्याचा राग आला? ते वाक्य मी परत बोलणार नाही. भूतकाळात एखादी घटना घडली तर क्राईम कसा होतो? काय पत्रकारिता आहे? वाह वाह वा… पत्रकारिता आम्ही पाहिलीच नाही का? माझा तुमच्यावर आक्षेप नाही. पण शिवसेनेच्या नेत्यांनी असे शब्द उच्चारले नाहीत का?, असा सवालही त्यांनी केला. (Union minister Narayan Rane slams media over coverage)

संबंधित बातम्या:

उद्धव ठाकरेंच्या भाषेवर राणेंचे तीन प्रश्न, राणे म्हणतात, योगी, शहांबद्दल ही काय भाषाय?

सिंधुदुर्गात जमावबंदी; राणे म्हणतात, सिंधुदुर्गापासूनच जन आशीर्वाद यात्रा सुरू करणार, त्यात व्यत्यय येणार नाही

फडणवीस म्हणाले, राणेंच्या वक्तव्याला समर्थन नाही, आता राणेंचं थेट उत्तर

(Union minister Narayan Rane slams media over coverage)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI