मुंबईतील पालिका, शासकीय लसीकरण केंद्रावरील लसीकरण बंद, लस उपलब्ध नसल्यामुळे निर्णय

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शासकीय आणि महानगरपालिका लसीकरण केंद्रांवर उद्या, गुरुवार दिनांक 19 ऑगस्ट 2021 रोजी तसेच शुक्रवार दिनांक 20 ऑगस्ट 2021 रोजी लसीकरण बंद राहणार आहे.

मुंबईतील पालिका, शासकीय लसीकरण केंद्रावरील लसीकरण बंद, लस उपलब्ध नसल्यामुळे निर्णय
कोरोना लसीकरण

मुंबई : कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेंतर्गत पुरेसा लससाठा उपलब्ध नसल्यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शासकीय आणि महानगरपालिका लसीकरण केंद्रांवर उद्या, गुरुवार दिनांक 19 ऑगस्ट 2021 रोजी तसेच शुक्रवार दिनांक 20 ऑगस्ट 2021 रोजी लसीकरण बंद राहणार आहे. (vaccination will not take place on 19 and 20 august in Mumbai government vaccination centre due to lack of Corona vaccine)

21 ऑगस्ट 2021 रोजी लसीकरण पुन्हा सुरु

मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 19 ऑगस्ट 2021 रोजी रात्री उशिरापर्यंत प्रशासनाला लससाठा प्राप्त होणार आहे. दिनांक 20 ऑगस्ट 2021 रोजी दिवसभरात लसीकरण केंद्रांना लसीचे वितरण केल जाईल. त्यांतर शुक्रवारी मिळालेल्या लसींच्या मदतीने 21 ऑगस्ट 2021 रोजी लसीकरण पुन्हा सुरु होईल.

लससाठा नसल्यामुळे 19 आणि 20 ऑगस्ट रोजी लसीकरण नाही 

मुंबईत कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम युद्धपातळीवर राबवली जात आहे. मात्र, केंद्र सरकारकडून लसीचा साठा योग्य वेळेवर उपलब्ध होत नाही. याच कारणामुळे लशींचा साठा ज्या प्रमाणात प्राप्त होईल, त्या अनुरूप योग्य निर्णय घेऊन मुंबईकरांना लसीच्या उपलब्धतेबाबत अवगत केले जाते. सध्या लससाठा उपलब्ध नसल्यामुळे 19 आणि 20 ऑगस्ट 2021 रोजी मुंबईतील शासकीय आणि महानगरपालिका केंद्रांवर लसीकरण बंद असणार आहे.

मुंबईत दिवसभरात 283 नवे कोरोना रुग्ण आढळले 

दरम्यान, मिळालेल्या ताज्या माहितीनुसार मुंबईत 24 तासांत 283 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर दिवसभरात 297 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. मुंबईमध्ये आतापर्यंत एकूण 718955 रुग्ण बरे झाले आहेत. मुंबई महापालिका क्षेत्रात रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 97 टक्क्यांवर आहे. मुंबईमध्ये एकूण 2886 रुग्ण सक्रिय आहेत. येथे रुग्णदुपटीचा काळ 2057 दिवसांवर पोहोचला आहे.

इतर बातम्या :

‘बिंदू नामावलीनुसार धनगर समाजातील विद्यार्थ्यांना जागा द्या, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करु’, पडळकरांचा इशारा

भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेत कोरोना नियमांचे उल्लंघन, कल्याण डोंबिवलीत 4 गुन्हे दाखल

मराठा आरक्षणाची जबाबदारी केंद्रावर ढकलण्याचा ‘टाईमपास’ आता बंद करा, उदयनराजेंचा घणाघात

(vaccination will not take place on 19 and 20 august in Mumbai government vaccination centre due to lack of Corona vaccine)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI