Vidhan Parishad Election Results 2022: अडीच वर्षानंतर विचार करण्याची गरज, काँग्रेस उमेदवाराच्या पराभवावर बाळासाहेब थोरातांची सुचक प्रतिक्रिया

काँग्रेसच्या बाळासाहेब थोरात यांनी या धक्कादायक निकालविषयी मत व्यक्त करताना म्हणाले की, आमच्याच पक्षाच्याी मतं फुटल्यामुळे मित्र पक्षांना दोष देऊन काही अर्थ नाही त्यामुळे सरकार म्हणून एकत्र बसून आता विचार करण्याची वेळ आली आहे अशी प्रतिक्रियाही यावेळी व्यक्त करण्यात आली.

Vidhan Parishad Election Results 2022: अडीच वर्षानंतर विचार करण्याची गरज, काँग्रेस उमेदवाराच्या पराभवावर बाळासाहेब थोरातांची सुचक प्रतिक्रिया
Follow us
| Updated on: Jun 20, 2022 | 11:15 PM

मुंबईः विधान परिषदेच्या निवडणुका (Vidhan PArishad Election) जाहीर झाल्यापासून उमेदवारांबरोबरच महाविकास आघाडी (Mahavokas Aghadi) आणि भाजप मधील कलिगीतुऱ्यामुळे ही निवडणूक चर्चेत राहिली होती. मतदान होऊन निकाल हातात येईपर्यंत सर्वच पक्षांनी आपले उमेदवार निवडून येणार असल्याचा विश्वास दाखवत प्रत्येकांनी आपल्या विजयाचीच गुडी निकालाआधीच उभारली होती. मात्र धक्कादायक निकाल लागल्यानंतर महाविकास आघाडीतील अंतर्गत राजकारणाचं चित्र पुन्हा एकदा समोर आलं.

या निकालानंतर महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Revenue Minister Balasaheb Thorat)यांनी प्रतिक्रिया व्यक्त करत असताना आता सरकार म्हणून एकत्र बसून विचार करण्याची वेळ आली आहे असं सूचक विधान त्यांनी केले आहे.

धक्कादायक निकाल

विधान परिषदेच्या शर्थीच्या लढाईत अखेरपर्यंत भाजपचे प्रसाद लाड पराभूत होतील आणि भाई जगताप जिंकतील असे वाटत होते. मात्र अखेरच्या क्षणापर्यंत काँग्रेसचे चंद्रकांत हांडोरे आणि भाई जगताप या दोघांनाही समाधानकारक मते नव्हती. अखेर भाई जगताप यांचा विजय झाला आणि चंद्रकांत हांडोरे यांना केवळ 22 मते मिळाल्याने त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळेच काँग्रेसच्या बाळासाहेब थोरात यांनी या धक्कादायक निकालविषयी मत व्यक्त करताना म्हणाले की, आमच्याच पक्षाच्याी मतं फुटल्यामुळे मित्र पक्षांना दोष देऊन काही अर्थ नाही त्यामुळे सरकार म्हणून एकत्र बसून आता विचार करण्याची वेळ आली आहे अशी प्रतिक्रियाही यावेळी व्यक्त करण्यात आली.

मतं फुटली कोणती

यावेळी त्यांनी हे सांगितले की, या निवडणुकीत मतं कोणती फुटली आहेत, त्याचा शोध घेतला जाईल आणि आणि योग्य तो अहवाल वरिष्ठांना पाठवला जाईल असंही त्यांनी यावेळी सांगितले.

थोरातांना पराभव जिव्हारी

विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसचा एक उमेदवार पराभूत झाल्यांमुळे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना हा पराभव जिव्हारी लागल्याचेच त्यांच्या प्रतिक्रियेवरून दिसून आले.

निवडणूक काटे की टक्कर

यावेळी विधान परिषदेच्या 10 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली, यावेळी 10 जागांसाठी 11 उमेदवार मैदानात होते, त्यामुळे ही निवडणूक काटे की टक्कर होणार असेच चित्र पूर्वीपासून होते. त्यातच गुप्त मतदान असल्यामुळे कोणत्या पक्षाचा उमेदवार निवडून येणार याची उत्सुकता शिगेला पोहचली होती.

ज्येष्ठ नेत्यांना या निकालाचा धक्का

राज्यसभा निवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या राजकारणाच्या जोरावर भाजपचे तिन्ही उमेदवार विजयी केले होते. त्यांच्या या राजकारणामुळेच शिवसेनेचे उमेदवार संजय पवार पराभूत झाले होते. त्यामुळे विधान परिषदेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीरपणे विचार करून महाविकास आघाडीचे निर्णय घेतले होते. यावेळी महाविकास आघाडीतील सर्वपक्षांनी मतदानाविषयी आणि आपल्या आमदारांची काळजी घेतली असूनही तीनही पक्षांचे मतदान फुटल्याने बाळासाहेब थोरांतासह अनेक ज्येष्ठ नेत्यांना या निकालाचा धक्का बसला आहे.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.