मुंबईतल्या सहाच्या सहा जागा युतीकडे, पाहा कुठल्या जागेवर कोण विजयी?

मुंबई : लोकसभा निवडणुकीचे निकाल हाती आले आहेत. मुंबई जिल्ह्यात एकूण सहा लोकसभा मतदारसंघ येतात. उत्तर मुंबई, उत्तर मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, उत्तर पूर्व मुंबई, दक्षिण मुंबई या सहा मतदारसंघाचा यात समावेश होतो. विविध जाती-धर्म-भाषेचे लोक मुंबईत राहतात. त्यामुळे कुठलेही नेमके अंदाज बांधता येत नसलेल्या मुंबईत यंदाही प्रत्येक मतदारसंघात ‘काँटे की […]

मुंबईतल्या सहाच्या सहा जागा युतीकडे, पाहा कुठल्या जागेवर कोण विजयी?
Follow us
| Updated on: May 23, 2019 | 4:23 PM

मुंबई : लोकसभा निवडणुकीचे निकाल हाती आले आहेत. मुंबई जिल्ह्यात एकूण सहा लोकसभा मतदारसंघ येतात. उत्तर मुंबई, उत्तर मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, उत्तर पूर्व मुंबई, दक्षिण मुंबई या सहा मतदारसंघाचा यात समावेश होतो. विविध जाती-धर्म-भाषेचे लोक मुंबईत राहतात. त्यामुळे कुठलेही नेमके अंदाज बांधता येत नसलेल्या मुंबईत यंदाही प्रत्येक मतदारसंघात ‘काँटे की टक्कर’ पाहायला मिळाली. आता मुंबईतल्या सहाही जागांचे निकाल हाती आले आहेत.

उत्तर मुंबई : उत्तर मुंबईतून गोपाळ शेट्टींनी विजय मिळवला आहे. भाजपचे गोपाळ शेट्टी आणि काँग्रेसच्या उर्मिला मातोंडकर यांच्यात प्रामुख्याने उत्तर मुंबईत लढत झाली. गोपाळ शेट्टी यांनी गेल्यावेळी मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांना पराभूत करत विक्रमी फरकाने विजय मिळवला होता.

उत्तर पश्चिम मुंबई : उत्तर पश्चिम मुंबईतून यंदा गजानन कीर्तीकर बाजी मारली आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गजानन किर्तीकर आणि मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांच्यात लढत झाली. संजय निरुपम गेल्यावेळी उत्तर मुंबईतून रिंगणात होते. तिथे भाजपच्या गोपाळ शेट्टींनी पराभव केल्यानंतर निरुपम यंदा उत्तर पश्चिममधून रिंगणात उतरले होते.

उत्तर मध्य मुंबई : अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या उत्तर मध्य मुंबईतून अखेर प्रिया दत्त यांनी विजय मिळवला आहे. विद्यमान खासदार पूनम महाजन विरुद्ध माजी खासदार प्रिया दत्त यांच्यात झालेल्या या लढतीकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. मराठी मतांसह परप्रांतीय आणि मुस्लीम मतांची लक्षणीय संख्या असलेल्या या मतदारसंघावर पहिल्यापासूनच काँग्रेसचा वरचष्मा राहिला होता. मात्र, 2014 साली मोदीलाटेत पूनम महाजन यांनी काँग्रेसच्या प्रिया दत्त यांचा पराभव केला होता.

दक्षिण मध्य मुंबई : शिवसेनेचे विद्यमान खासदार राहुल शेवाळे विरुद्ध काँग्रेसचे माजी खासदार एकनाथ गायकवाड यांच्यात झालेल्या लढतीत अखेर राहुल शेवाळे यांनी बाजी मारली आहे. धारावीसारखा झोपडपट्टी भाग या मतदारसंघात येत असल्याने, तेथील मतांचा प्रभाव विजयावर नेहमीच जाणवतो. गरीब आणि मध्यमवर्गीयांचे मुद्दे घेऊन या मतदारसंघातील निवडणूक झाली.    

उत्तर पूर्व मुंबई : भाजपचे मनोज कोटक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय दीना पाटील यांच्यात झालेल्या या अत्यंत चुरशीच्या लढतीत अखेर मनोज कोटक यांनी विजय मिळवला. विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांचं शिवसेनेच्या दबावानंतर भाजपने तिकीट कापलं. त्यामुळे या मतदारसंघाकडे सगळ्यांचंच लक्ष वेधलं गेलं होतं.

दक्षिण मुंबई : मुंबईतील उच्चभ्रू आणि तेवढ्याच प्रमाणात सर्वसामान्य मुंबईकरांचा मतदारसंघ अशी असलेल्या दक्षिण मुंबई मतदारसंघाची यंदाची निवडणूक चुरशीची ठरली होती. शिवसेनेचे विद्यमान खासदार अरविंद सावंत यांना काँग्रेसचे माजी खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांनी टक्कर दिली. अखेर अरविंद सावंत यांचा विजय झाला.

मतदारसंघभाजप/शिवसेनाकाँग्रेस/ राष्ट्रवादीवंचित बहुजन आघाडीविजयी उमेदवार
नंदुरबारहिना गावित (भाजप) के. सी. पाडवी (काँग्रेस)दाजमल गजमल मोरे (VBA)हिना गावित (भाजप)
धुळे सुभाष भामरे (भाजप) कुणाल पाटील (काँग्रेस) सुभाष भामरे
जळगावउन्मेष पाटील (भाजप)गुलाबराव देवकर (राष्ट्रवादी)अंजली रत्नाकर बाविस्कर (VBA)उन्मेष पाटील (भाजप)
रावेररक्षा खडसे (भाजप) उल्हास पाटील (काँग्रेस)नितीन कांडेलकर (VBA)रक्षा खडसे (भाजप)
बुलडाणाप्रतापराव जाधव (शिवसेना)राजेंद्र शिंगणे (राष्ट्रवादी)बळीराम सिरस्कार (VBA)प्रतापराव जाधव (शिवसेना) आघाडी
अकोलासंजय धोत्रे (भाजप) हिदायत पटेल (काँग्रेस)प्रकाश आंबेडकरसंजय धोत्रे (भाजप)
अमरावतीआनंदराव अडसूळ (शिवसेना)नवनीत कौर राणा गुणवंत देवपारे (VBA)नवनीत कौर राणा
वर्धा रामदास तडस (भाजप) चारुलता टोकस (काँग्रेस)धनराज वंजारी (VBA) रामदास तडस (भाजप)
रामटेककृपाल तुमाणे (शिवसेना)किशोर उत्तमराव गजभिये (काँग्रेस) किरण रोडगे-पाटनकर (VBA)कृपाल तुमाणे (शिवसेना)
नागपूरनितीन गडकरी (भाजप)नाना पटोले (काँग्रेस)नितीन गडकरी (भाजप)
भंडारा-गोंदियासुनील मेंढे (भाजप)नाना पंचबुद्धे (राष्ट्रवादी)एन. के. नान्हे (VBA)सुनील मेंढे (भाजप)
गडचिरोली-चिमूरअशोक नेते (भाजप) नामदेव उसेंडी (काँग्रेस)डॉ. रमेश गजबे (VBA)अशोक नेते (भाजप)
चंद्रपूर हंसराज अहीर (भाजप) सुरेश धानोरकर उर्फ बाळू धानोरकर (काँग्रेस)अ‍ॅड. राजेंद्र महाडोळे (VBA)बाळू धानोरकर (काँग्रेस)
यवतमाळ - वाशिमभावना गवळी (शिवसेना)माणिकराव ठाकरे (काँग्रेस)प्रो. प्रवीण पवार (VBA)भावना गवळी (शिवसेना)
हिंगोली हेमंत पाटील (शिवसेना)सुभाष वानखेडे (काँग्रेस)मोहन राठोड (VBA) हेमंत पाटील (शिवसेना)
नांदेडप्रताप पाटील चिखलीकर (भाजप)अशोक चव्हाण (काँग्रेस) प्रा. यशपाल भिंगे (VBA)प्रताप पाटील चिखलीकर (भाजप)
परभणीसंजय जाधव (शिवसेना)राजेश विटेकर (राष्ट्रवादी)आलमगीर खान अखिल मोहम्मद खान (VBA)संजय जाधव (शिवसेना)
जालनारावसाहेब दानवे (भाजप) विलास औताडे (काँग्रेस)डॉ. शरदचंद्र वानखेडे (VBA)रावसाहेब दानवे (भाजप)
औरंगाबादचंद्रकांत खैरे (शिवसेना)सुभाष झांबड (काँग्रेस)इम्तियाज जलील (VBA)इम्तियाज जलील (VBA)
दिंडोरीडॉ. भारती पवार (भाजप)धनराज महाले (राष्ट्रवादी)बापू केळू बर्डे (VBA)डॉ. भारती पवार (भाजप)
नाशिकहेमंत गोडसे (शिवसेना)समीर भुजबळ (राष्ट्रवादी)पवन पवार (VBA)हेमंत गोडसे (शिवसेना)
पालघरराजेंद्र गावित (शिवसेना)बळीराम जाधव - बहुजन विकास आघाडीसुरेश अर्जुन पाडवी (VBA)राजेंद्र गावित (शिवसेना)
भिवंडीकपिल पाटील (भाजप) सुरेश टावरे (काँग्रेस)डॉ. ए. डी. सावंत (VBA)कपिल पाटील (भाजप)
कल्याणश्रीकांत शिंदे (शिवसेना)बाबाजी पाटील (राष्ट्रवादी)श्रीकांत शिंदे (शिवसेना)
ठाणेराजन विचारे (शिवसेना)आनंद परांजपे (राष्ट्रवादी)मल्लिकार्जुन पुजारी (VBA)राजन विचारे (शिवसेना)
मुंबई-उत्तर गोपाळ शेट्टी (भाजप) उर्मिला मातोंडकर (काँग्रेस)गोपाळ शेट्टी (भाजप)
मुंबई - उत्तर पश्चिमगजानन कीर्तिकर (शिवसेना)संजय निरुपम (काँग्रेस)गजानन कीर्तिकर (शिवसेना)
मुंबई ईशान्य (उत्तर पूर्व)मनोज कोटक (भाजप)संजय दीना पाटील (राष्ट्रवादी)संभाजी शिवाजी काशीद (VBA)मनोज कोटक (भाजप)
मुंबई उत्तर मध्य पूनम महाजन (भाजप) प्रिया दत्त (काँग्रेस) पूनम महाजन (भाजप)
मुंबई दक्षिण मध्यराहुल शेवाळे (शिवसेना)एकनाथ गायकवाड (काँग्रेस)डॉ. संजय भोसले (VBA)राहुल शेवाळे (शिवसेना)
दक्षिण मुंबईअरविंद सावंत (शिवसेना)मिलिंद देवरा (काँग्रेस)डॉ. अनिल कुमार (VBA)अरविंद सावंत (शिवसेना)
रायगडअनंत गीते (शिवसेना)सुनिल तटकरे (राष्ट्रवादी)सुमन कोळी (VBA) सुनिल तटकरे (राष्ट्रवादी)
मावळश्रीरंग बारणे (शिवसेना)पार्थ पवार (राष्ट्रवादी)राजाराम पाटील (VBA)श्रीरंग बारणे (शिवसेना)
पुणेगिरीश बापट (भाजप)मोहन जोशी (काँग्रेस)अनिल जाधव (VBA)गिरीश बापट (भाजप)
बारामतीकांचन कुल (भाजप)सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी)नवनाथ पडळकर (VBA)सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी)
शिरुर शिवाजीराव आढळराव-पाटील (शिवसेना)अमोल कोल्हे (राष्ट्रवादी)अमोल कोल्हे (राष्ट्रवादी)
अहमदनगरसुजय विखे (भाजप)संग्राम जगताप (राष्ट्रवादी)सुधाकर आव्हाड (VBA)सुजय विखे (भाजप)
शिर्डीसदाशिव लोखंडे (शिवसेना)भाऊसाहेब कांबळे (काँग्रेस)डॉ. अरुण साबळे (VBA)सदाशिव लोखंडे (शिवसेना) आघाडीवर
बीडडॉ. प्रीतम मुंडे (भाजप) बजरंग सोनवणे (राष्ट्रवादी) प्रा. विष्णू जाधव (VBA)डॉ. प्रीतम मुंडे (भाजप)
उस्मानाबादओमराजे निंबाळकर (शिवसेना)राणा जगजितसिंह पाटील (राष्ट्रवादी)अर्जुन सलगर (VBA)ओमराजे निंबाळकर (शिवसेना)
लातूरसुधाकरराव श्रंगारे (भाजप) मच्छिलिंद्र कामत (काँग्रेस)राम गारकर (VBA)सुधाकरराव श्रंगारे (भाजप)
सोलापूरजयसिद्धेश्वर स्वामी (भाजप)सुशिलकुमार शिंदे (काँग्रेस)प्रकाश आंबेडकर (VBA)जयसिद्धेश्वर स्वामी (भाजप)
माढारणजितसिंह नाईक निंबाळकर (भाजप)संजय शिंदे (राष्ट्रवादी)अ‍ॅड. विजय मोरे (VBA)रणजितसिंह नाईक निंबाळकर (भाजप)
सांगलीसंजयकाका पाटील (भाजप) विशाल पाटील (स्वाभिमानी)गोपीचंद पडळकर (VBA)संजयकाका पाटील (भाजप)
सातारानरेंद्र पाटील (शिवसेना)उदयनराजे भोसले (राष्ट्रवादी)सहदेव एवळे (VBA)उदयनराजे भोसले (राष्ट्रवादी)
रत्नागिरी-सिंधुदुर्गविनायक राऊत (शिवसेना)नवीनचंद्र बांदिवडेकर (काँग्रेस)मारुती रामचंद्र जोशी (VBA)विनायक राऊत (शिवसेना)
कोल्हापूर संजय मंडलिक (शिवसेना)धनंजय महाडिक (राष्ट्रवादी) डॉ. अरुणा माळी (VBA)संजय मंडलिक (शिवसेना)
हातकणंगलेधैर्यशील माने (शिवसेना)राजू शेट्टी (स्वाभिमानी)अस्लम बादशाहजी सय्यद (VBA)धैर्यशील माने (शिवसेना)
Non Stop LIVE Update
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा...
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा....
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.
भाजपचे शेकडो कार्यकर्ते अन् पदाधिकारी देणार भाजपचा देणार राजीनामा
भाजपचे शेकडो कार्यकर्ते अन् पदाधिकारी देणार भाजपचा देणार राजीनामा.
शिवसेना पक्ष-चिन्हाच्या याचिकेवर 6 मेला सुनावणी, कोर्ट काय देणार निकाल
शिवसेना पक्ष-चिन्हाच्या याचिकेवर 6 मेला सुनावणी, कोर्ट काय देणार निकाल.
अखेर उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर, साताऱ्यातून लढणार लोकसभा
अखेर उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर, साताऱ्यातून लढणार लोकसभा.
मनोज जरांगे पाटलांच्या समर्थकावर प्राणघातक हल्ला, 4 अज्ञात इसम आले अन
मनोज जरांगे पाटलांच्या समर्थकावर प्राणघातक हल्ला, 4 अज्ञात इसम आले अन.
'मोदीची गॅरंटी संकल्प' पत्र जाहीर, भाजपच्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय?
'मोदीची गॅरंटी संकल्प' पत्र जाहीर, भाजपच्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय?.
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी महिनाभर पनवेलमध्ये?
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी महिनाभर पनवेलमध्ये?.