BMC eletion 2022 Ward 21 – मुंबई महापालिका निवडणुकीत वॉर्ड क्रमांक 21 मध्ये कोण मारणार बाजी? भाजपाला शिवसेना रोखणार का?

2017 च्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेला टक्कर दिलेल्या आशिष शेलार यांच्याकडे पुन्हा एकदा निवडणुकीची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे ही निवडणूक तशीच चुरशीची होण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत वॉर्ड क्रमांक 21 (ward no 21) डहाणूकर नगर या प्रभागात काय परिस्थिती असेल त्यावर एक नजर टाकूयात.

BMC eletion 2022 Ward 21 - मुंबई महापालिका निवडणुकीत वॉर्ड क्रमांक 21 मध्ये कोण मारणार बाजी? भाजपाला शिवसेना रोखणार का?
कोणाची होणार सरशी?
Follow us
| Updated on: Aug 20, 2022 | 2:30 PM

मुंबई- राज्यात एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)यांच्या बंडानंतर होणाऱ्या महापालिका निवडणुका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चुरशीच्या होणार आहेत. मुंबई महापालिका निवडणूक (BMC Election 2022)जिंकण्यासाठी भाजपा आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष त्यांची प्रतिष्ठा पणाला लावत आहेत. शिवसेनेत झालेल्या बंडाळीनंतर ही महापालिका निवडणूक शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवा सेना नेते आदित्य ठाकरे यांच्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाते आहे. या महापालिका निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशी महाआघाडी होणार का, तसेच भाजपा आणि मनसे एकत्र लढणार की स्वतंत्र लढणार, यावरही अनेक गणिते अवलंबून असणार आहेत. भाजपाकडून गेल्या काही महिन्यांपासून या निवडणुकांसाठी तयारी करण्यात येते आहे. 2017 च्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेला टक्कर दिलेल्या आशिष शेलार यांच्याकडे पुन्हा एकदा निवडणुकीची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे ही निवडणूक तशीच चुरशीची होण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत वॉर्ड क्रमांक 21 (ward no 21) डहाणूकर नगर या प्रभागात काय परिस्थिती असेल त्यावर एक नजर टाकूयात.

वाॉर्ड कुठून कुठपर्यंत?

या प्रभागात महावीर नगर, डहाणूकर वाडी आणि श्रावणनगर या प्रमुख वस्त्या आहेत. पंचोलिया रोडपसून सुरु होणारा हा प्रभाग, दामूअण्णा दाते रोडपर्यंत आहे. एकूण 56851 लोकसंख्या या प्रभागात असून यातील एससी 1432 आणि एसटी 759 लोकसंख्या आहे.

गेल्या निवडणुकीत काय झाले होते?

२०१७च्या महापालिका निवडणुकीत या प्रभातातून चार उमेदवार रिंगणात होते. त्यात भारतीय जनता पार्टीच्या शैलजा गिरकर, शिवसेनेच्या जयश्री मिस्त्री, मनसेकडून सीमा कुलकर्णी आणि काँग्रेसच्या मीनाक्षी भंडारी या रिंगणात होत्या.

हे सुद्धा वाचा

निकालात काय झाले?

भाजपाच्या शैलजा गिरकर यांनी शिवसेनेच्या उमेदवार जयश्री मिस्त्री यांचा पराभव केला होता. मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपा आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष स्वतंत्र लढले होते.

नगरसेवक 2017

2017 -2022 – शैलजा गिरकर- भाजपा

काय असेल गणित?

2017 च्या महापालिका निवडणुकीत एकूण 23918 मतांपैकी 15344 मते ही भाजपाच्या शैलजा गिरकर यांना मिळाली होती. शिवसेनेच्या जयश्री मिस्त्री यांना 5 हजार मते मिळाली होती. काँग्रेसच्या मीनाक्षी भंडारी यांना 2364 तर मनसेच्या सीमा कुलकर्णी यांना 768 मते मिळाली होती. एकूणच गेल्या निवडणुकीत भाजपाची मते ही खूपच जास्त होती. त्यामुळे हा प्रभाग घेण्यासाठी शिवसेनेला यावेळी खूपच प्रयत्न करावे लागण्याची गरज असणार आहे.

पक्षउमेदवाराचे नावविजयी उमेदवार
भाजपा
शिवसेना
मनसे
काँग्रेस
राष्ट्रवादी
Non Stop LIVE Update
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.