उत्तर पश्चिम मुंबईत मनसेची मतं कुणाला? निरुपम आणि कीर्तीकरांमध्ये रस्सीखेच

मुंबई : उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार गजानन कीर्तीकर आणि काँग्रेसचे उमेदवार संजय निरुपम यांनी प्रचार सुरु केलाय. यंदा मनसे निवडणूक लढवत नसल्याने इथे त्या पक्षाची मते कुणाला मिळणार याबाबत उत्सुकता आहे. कीर्तीकर आणि निरुपम यांनी आपापल्या पद्धतीने मनसेच्या व्होटबँकेवर स्वतःचा दावा सांगितलाय. पण अनधिकृत फेरीवाल्यांना हटवण्यावरुन ज्या निरुपमांविरोधात गेल्या काही महिन्यांपूर्वी मनसेने […]

उत्तर पश्चिम मुंबईत मनसेची मतं कुणाला? निरुपम आणि कीर्तीकरांमध्ये रस्सीखेच
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:02 PM

मुंबई : उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार गजानन कीर्तीकर आणि काँग्रेसचे उमेदवार संजय निरुपम यांनी प्रचार सुरु केलाय. यंदा मनसे निवडणूक लढवत नसल्याने इथे त्या पक्षाची मते कुणाला मिळणार याबाबत उत्सुकता आहे. कीर्तीकर आणि निरुपम यांनी आपापल्या पद्धतीने मनसेच्या व्होटबँकेवर स्वतःचा दावा सांगितलाय. पण अनधिकृत फेरीवाल्यांना हटवण्यावरुन ज्या निरुपमांविरोधात गेल्या काही महिन्यांपूर्वी मनसेने दंड थोपटले होते, त्यांना मनसे मदत करणार का हा प्रश्न आहे.

कीर्तीकर आणि निरुपमांच्या प्रचाराला सुरुवात

उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे गजानन कीर्तीकर विरुद्ध काँग्रेसचे संजय निरुपम अशी थेट लढत आहे. दोन्ही उमेदवारांनी आपापल्या व्यूहरचनेनुसार प्रचाराची सुरुवात केली. मंगळवारी त्यांनी अंधेरी पूर्वेतील मरोळ भागात प्रचार केला. गेल्यावेळी मोदी लाटेवर जिंकून आलेले कीर्तिकर पुन्हा आपलं राजकीय नशीब आजमावत आहेत. तर पक्षांतर्गत संघर्ष करीत निरुपम यांनी या मतदारसंघात उमेदवारी मिळवली आहे. कधीकाळी शिवसेनेत एकमेकांचे सहकारी राहिलेल्या कीर्तीकर-निरुपम यांना या निवडणुकीत एकमेकांचंच आव्हान आहे.

या आव्हानाबाबत कीर्तीकर यांना विचारलं असता, “मी कधी कुणाला कमी लेखत नाही. प्रतिस्पर्ध्याचा पराभव करणं हे माझं लक्ष्य आहे”, असं ते म्हणाले. निरुपमांनीही कीर्तीकरांनी आता निवृत्ती घ्यावी, असं आवाहन केलंय. कीर्तीकर साहेब माझे मोठे बंधू असून माजी सहकारी आहेत. गेली पाच वर्षे ते कुठे दिसलेच नाहीत. ते ज्येष्ठ आहेत त्यांनी आता निवृत्ती घेतली पाहिजे, असं निरुपम म्हणाले.

मनसेची मतं कुणाला?

मोदी-शाह यांना विरोध करण्याच्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भूमिकेमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या राज्यात विजयाच्या आशा पल्लवित झाल्यात. मनसे यंदा निवडणूक लढवत नसल्याने त्या मतपेढीसाठी महाआघाडीचे उमेदवार प्रयत्नशील आहेत. कुठल्या ना कुठल्या मार्गाने कांग्रेस -राष्ट्रवादीचे उमेदवार मनसेची मते मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. अशात शिवसेना आणि मनसे, तसंच निरुपम आणि मनसे हे राजकीय वैर लक्षात घेतलं तर इथे विजयासाठी कुणाला मदत करावी हा प्रश्न एव्हाना राज ठाकरेंपुढेही असेल. गेल्या निवडणुकीत मनसेचे उमेदवार महेश मांजरेकर यांना 66 हजार मते मिळाली होती. या मतपेढीवर सध्या कीर्तीकर आणि निरुपम या दोघांचाही डोळा आहे.

“मनसेचे मतदार काँग्रेसकडे जाणार नाहीत”

आम्ही मनसेच्या भूमिकेबाबत कीर्तीकरांनाही विचारलं. ते म्हणाले, “मनसेचे मतदार काँग्रेसला मतदान करणार नाहीत. त्यांच्या नेत्यांची काय मानसिकता आहे ठाऊक नाही. राज ठाकरेंकडे ज्या उद्देशाने मतदार आकर्षित झाले होते ती मते आता तुटली आहेत. मनसेला मिळालेली मते आता आम्हाला मिळतील.”

संजय निरुपमही मनसेच्या मतांसाठी प्रयत्नशील आहेत. “राज ठाकरे माझ्याबाबतीत वेगळी भूमिका ठेवू शकतात. मी त्यांच्याकडे काही मागितलेलं नाही. कारण माझी स्वतःची एक विचारधारा आहे. लोकांमध्ये जाती-भाषेच्या नावावर भेदभाव झाला नाही पाहिजे. त्याचा मी विरोध करणार. मी माझी विधारधारा घेऊन उभा आहे. ज्यांना मला सहकार्य करायचे आहे त्यांनी करा, नाहीतर जा. माझा प्रयत्न असेल मोदी-शाहांना, शिवसेना-भाजपला जे विरोध करीत आहेत त्यांना एकत्र ठेवणे. मुंबईत मोदी-शाहांना विरोधाचे अभियान मीच चालवू शकतो,” असंही निरुपमांनी म्हटलंय.

मतदारांमध्ये मराठी भाषिक आणि उत्तर भारतीयांचं प्रमाण सारखंच

गरीब-श्रीमंत आणि उच्चभ्रू अशी मिश्र लोकवस्ती असलेल्या या मतदारसंघात मराठी भाषिक आणि उत्तर भारतीयांचे प्रमाण जवळपास सारखंच आहे. त्यामुळे आपल्या भूमिकांनी या दोन्ही मतपेढ्या दुखावल्या जाणार नाहीत याची काळजी कीर्तीकर आणि निरुपम घेत आहेत. कारण, कुठल्याही एका मतपेढीची नाराजी निवडणुकीत उमेदवाराच्या विजयाची समीकरणे बिघडवू शकते याची कल्पना उमेदवारांना आहे.

निवडणूक कोणतही असो, उमेदवाराला आपल्या विजयासाठी प्रत्येक मत महत्त्वाचे असते. कीर्तीकर असो वा निरुपम दोघांना मनसेशी सलगी नकोय, पण त्यांची मते मात्र हवी आहेत. पण मनसेच्या मतांचे कोडे कसे सुटणार याचा प्रयत्न दोन्ही उमेदवार करत आहेत.

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.