‘फ्री काश्‍मीर’ पोस्‍टरचा नेमका अर्थ काय? पोस्टर दाखवणारी तरुणी म्हणते…

जवाहरलाल नेहरु विद्यापीठात विद्यार्थी आणि शिक्षकांवर झालेल्या हल्लाविरोधात मुंबईच्या गेट वे ऑफ इंडिया येथे विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. मात्र, एका पोस्टरकडे बोट दाखवतं भाजपने विद्यार्थ्यांच्या आंदोलनालाच लक्ष्य केलं. या पोस्टरवर 'फ्री काश्मीर' (Meaning of poster Free Kashmir) असं लिहिलेलं होतं.

‘फ्री काश्‍मीर’ पोस्‍टरचा नेमका अर्थ काय? पोस्टर दाखवणारी तरुणी म्हणते...
Follow us
| Updated on: Jan 07, 2020 | 3:44 PM

मुंबई : जवाहरलाल नेहरु विद्यापीठात विद्यार्थी आणि शिक्षकांवर झालेल्या हल्लाविरोधात मुंबईच्या गेट वे ऑफ इंडिया येथे विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. मात्र, एका पोस्टरकडे बोट दाखवतं भाजपने विद्यार्थ्यांच्या आंदोलनालाच लक्ष्य केलं. या पोस्टरवर ‘फ्री काश्मीर’ (Meaning of poster Free Kashmir) असं लिहिलेलं होतं. याचा नेमका काय अर्थ आहे आणि हे पोस्टर दाखवताना त्या तरुणीने कोणत्या भावनेने हे पोस्टर दाखवले याचं तिनेच उत्तर दिलं आहे. याबद्दल या तरुणींने युट्युबवर याबाबत एक व्हिडीओ पोस्ट करत आपली बाजू स्पष्ट केली (Meaning of poster Free Kashmir).

पोस्टर दाखवणारी आणि आंदोलनात सहभागी झालेली मेहक प्रभू ही तरुणी म्हणाली, “मी भारताची नागरिक या नात्याने जेएनयूतील विद्यार्थ्यांच्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी या आंदोलनात सहभागी झाले होते. तेथे अनेक तरुण वेगवेळे पोस्टर तयार करत होते. त्यात देशातील विविध प्रश्नांवर पोस्टर तयार केले जात होते. तेथेच काश्मीरचं हे पोस्टर होतं. ते पाहून माझ्या मनात काश्मीरवर लादलेले निर्बंध आठवले. कारण आम्ही येथे नागरिकांच्या संवैधानिक अधिकारांसाठी जमलो होते. मागील 5 महिन्याहून अधिक काळापासून काश्मिरमध्ये अनेक गोष्टींवर बंदी आहे. म्हणूनच मी काश्मिरच्या नागरिकांनाही संविधानाने दिलेलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य मिळावा ही मागणी करण्यासाठी मी ‘फ्री काश्मीर’ हे पोस्टर दाखवलं.”

मी काश्मीरी किंवा कोणत्याही गँगची मुलगी नसून महाराष्ट्रात जन्मलेली मराठी मुलगी असल्याचंही यावेळी या तरुणीने स्पष्ट केलं.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.