Amit Thackeray: ‘मनविसे’च्या विद्यार्थी संघटनेत तरुणी आणि विद्यार्थिनींना प्रथम स्थान; अमित ठाकरेंच्या उपस्थित 21 विभागांतील पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका

राज्यातील राजकीय घडामोडींनी वेग आलेला असतानाच अमित ठाकरे यांचे मनविसे पुनर्बांधणी संपर्क अभियान गेल्या दोन आठवड्यापासून मुंबईत सुरू होते. वडील रुग्णालयात असतानाही त्यांनी आपला राजकीय दौरा न थांबवता मुंबईतील 36 विभागांना भेटी देऊन सुमारे 7000 विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधण्यात आला होता.

Amit Thackeray: 'मनविसे'च्या विद्यार्थी संघटनेत तरुणी आणि विद्यार्थिनींना प्रथम स्थान; अमित ठाकरेंच्या उपस्थित 21 विभागांतील पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका
Follow us
| Updated on: Jun 27, 2022 | 8:04 PM

मुंबईः  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आता आणखी उभारी घेत अमित ठाकरे यांनी आता पक्षवाढीसाठी पुढाकार घेतला आहे. मुंबईतील 36 विधानसभा मतदारसंघात जाऊन मनसेच्या पक्ष कार्यालयात युवक-युवतींशी संवाद साधल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित राज ठाकरे (MNS Raj Thackeray) यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संघटनात्मक पुनर्बांधणीचे काम आता बहुतांशी पूर्ण करण्यात आले आहे. मागील आठवड्यात त्यांनी मुंबईतील 10 विभागांतील मनविसे पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत, आज त्यांनी तब्बल 21 विभागांतील पदाधिकाऱ्यांच्या नेमणुकाही जाहीर करण्यात आल्या आहेत. तर संबंधितांना नेमणूक पत्रे दिली.

नेमणुका करताना अमित ठाकरे (MNS Amit Thackeray) यांनी त्यांच्या विद्यार्थी संघटनेत तरुणींना तसंच विद्यार्थिनींना (College Student) मोठ्या प्रमाणात संधी दिल्याचे दिसत आहे.

राजकीय घडामोडींनी वेग

राज्यातील राजकीय घडामोडींनी वेग आलेला असतानाच अमित ठाकरे यांचे मनविसे पुनर्बांधणी संपर्क अभियान गेल्या दोन आठवड्यापासून मुंबईत सुरू होते. वडील रुग्णालयात असतानाही त्यांनी आपला राजकीय दौरा न थांबवता मुंबईतील 36 विभागांना भेटी देऊन सुमारे 7000 विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधण्यात आला होता.

 मनविसे युनिट स्थापन करण्याचा निर्धार

मुंबईतल्या प्रत्येक महाविद्यालयात मनविसे युनिट स्थापन करण्याचा निर्धारही अमित यांनी सांगितले. या दौऱ्यावेळी अनेक सुशिक्षित, उच्चशिक्षित तरुण तरुणींनी मनविसेत काम करण्याची इच्छा त्यांच्यापुढे बोलून दाखवली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात युवावर्ग उपस्थित होते.

मनविसेचे पदाधिकारी…

अमित ठाकरे यांनी केलेल्या नेमणुकामध्ये डॉ. जान्हवी तूर्डे यांची मनविसेच्या सचिवपदी, तर श्रुती नाईक (वांद्रे पूर्व), प्रियल मालणकर (विलेपार्ले), ॲड. स्नेहल आडारकर (कलिना), प्रियांका निंबाळकर (चांदिवली), प्रियांका थोरात (दहिसर), शाहीन कुपवडेकर (मागाठाणे), दीपाली करंबळे (कांदिवली पूर्व), नीलांबरी सावंत (चारकोप), प्रियांका श्रीगडी (मुंबादेवी), सायली जाधव (जोगेश्वरी), वेरोमिका डिसुझा (वर्सोवा), जान्हवी पारकर (दिंडोशी), प्रियंका कासले (सायन) यांची मनविसे विद्यार्थिनी विभाग अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली आहे.

 विद्यार्थिनींचे प्रश्न सोडवायचे असतील तर

यावेळी अमित ठाकरे यांनी सांगितले की, विद्यार्थिनींचे प्रश्न सोडवायचे असतील तर त्यांच्यातल्या तरुणींनाच पुढे यावं लागणार आहे. तरुणींना अधिकाधिक प्रतिनिधित्व देऊन त्यांचे संघटनेतील स्थान अधिक बळकट करावे लागेल असं मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद

त्यांच्या या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत अनेक तरुणींनी त्यांच्यासोबत मनविसेत जबाबदारी स्वीकारून काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. अमित ठाकरे यांच्या या कार्यक्रमाला युवावर्गातून मोठा प्रतिसाद मिळाला असून युवतींचाही या कार्यक्रमात मोठा सहभाग होता.

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.