राज्यातील सर्व पालिका अ‍ॅक्शन मोडमध्ये, मास्क न घालता फिरणाऱ्यांवर कडक कारवाई

मुंबई महापालिकेने 10 सप्टेंबरपासून हा दंड 200 रुपये करण्यात आला आहे. (Municipal Corporation Taken against Action those who Not wearing a mask)

राज्यातील सर्व पालिका अ‍ॅक्शन मोडमध्ये, मास्क न घालता फिरणाऱ्यांवर कडक कारवाई

मुंबई : कोरोनाला रोखण्यासाठी राज्यात एप्रिलपासून सार्वजनिक ठिकाणी फिरताना मास्क वापरणे अनिवार्य केले आहे. गेल्या 20 एप्रिल ते 26 सप्टेंबर या काळात मास्क न घालणाऱ्या 14 हजार 234 मुंबईकरांवर कारवाई करण्यात आली आहे. यात तब्बल 52 लाख 81 हजार 600 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. (Municipal Corporation Taken against Action those who who Not wearing a mask)

यापूर्वी मुंबईत मास्क न घालता फिरल्यास एक हजारांचा दंड केला जात होता. मात्र आता मुंबई महापालिकेने 10 सप्टेंबरपासून हा दंड कमी करुन 200 रुपयांवर आणला आहे.

यानुसार मास्क न घालता फिरणाऱ्यांवर पालिकेच्या वॉर्डमधील अधिकारी कारवाई करीत आहेत. शिवाय घनकचरा विभागातील शेकडो कर्मचारीदेखील मास्क न घालता फिरणाऱ्यांवर कारवाई करीत आहेत. ही कारवाई वेगाने आणि परिणामकारकरीत्या करण्यासाठी घनकचरा विभागातील या कर्मचाऱ्यांना 200 रुपये दंडातील 10 टक्के रक्कम देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.

मुंबईत 9 हजार जणांवर कारवाई

मुंबईत 20 एप्रिल ते 12 सप्टेंबर या कालावधीत 4989 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. यात प्रत्येकी एक हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. यामध्ये पालिकेने 33 लाख 68 हजार 500 रुपयांची वसुली केली आहे. (Municipal Corporation Taken against Action those who who Not wearing a mask)

तर दंडाची रक्कम 200 रुपये केल्यानंतर 13 सप्टेंबर ते 26 सप्टेंबर या कालावधीत तब्बल 9 हजार 245 जणांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून 19 लाख 13 हजार 100 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

अंधेरी, विलेपार्ले, जोगेश्वरीत सर्वाधिक कारवाई

पालिकेच्या के/पश्चिम म्हणजेच अंधेरी, विलेपार्ले आणि जोगेश्वरी पश्चिम भागात सर्वाधिक कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये आतापर्यंत 918 जणांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून 6 लाख 21 हजार 200 रुपये वसूल करण्यात आले आहेत.

औरंगाबादसह नागपुरातही मास्क न घालता फिरणाऱ्यांवर कारवाई

मुंबईप्रमाणे राज्यात इतर ठिकाणीही मास्क न घालणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. त्यानुसार नागपूर महापालिकेने 4 सप्टेंबर ते 26 सप्टेंबर या काळात मास्क न घालता फिरणाऱ्यांवर कारवाई केली आहे. या दरम्यान 8 हजार 309 जणांवर कारवाई केली असून त्यांच्याकडून 25 लाख 13 हजार 500 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

तर औरंगाबाद महापालिकेने मास्क न वापरणाऱ्यांकडून आतापर्यंत 23 लाख 92 हजारांचा दंड वसूल केला आहे. गेल्या पाच महिन्यात हजारो नागरिकांकडून दंड वसूल केला आहे. मास्क न वापरणाऱ्यांविरोधात महापालिका 500 रुपयांचा दंड आकारताना दिसत आहे. महापालिकेची अनेक पथके शहरात फिरत असून ते दंडाची कारवाई करत आहेत.(Municipal Corporation Taken against Action those who Not wearing a mask)

संबंधित बातम्या : 

गळ्यात चेन, डोळ्याला गॉगल, मग तोंडाला मास्क का नाही? मास्क न घालणारे किलर : महापौर

मराठवाड्यात पर्यटन व्यवसाय ठप्प, 500 कोटींचा फटका

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *