Uddhav Thackeray: आमदार गेले पण नगरसेवक कुणासोबत? मुंबई, ठाणे, पुणे, नाशकात कोण कुणासोबत?

शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेतच दोन गट बनले आहेत. त्यामुळे महापालिकेत कोणाची ताकद वाढणार की शिवसेना होती तशी राहणार याचा पेच निर्माण झाला आहे.

Uddhav Thackeray: आमदार गेले पण नगरसेवक कुणासोबत? मुंबई, ठाणे, पुणे, नाशकात कोण कुणासोबत?
एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे
Image Credit source: tv9
अस्लम अब्दुल शानेदिवाण

|

Jun 25, 2022 | 3:44 PM

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गट तयार झाल्या झाल्यापासून महाविकास आघाडी सरकार आणि शिवसेनेची डोकेदुखी वाढली आहे. तर शिवसेनेत फूट पडू नये म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे प्रयत्न करत आहेत. त्यातच शिंदे गटात दररोज शिवसेनेतील (Shiv Sena) आणखी काही नाराज सामिल होत आहेत. त्यानंतर आता नेतेच शिंदे गटात जात असताना महापालिकांचे काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कारण आता काहीच दिवसांवर राज्यातील मुंबई महापालिकेसह 13 महापालिकांच्या निवडणूका (Municipal Corporation elections) तोंडावर आल्या आहेत. त्याच दरम्यान राज्याच्या राजकारणात शिंदे गट सक्रीय झाला आहे. तर या महापालिकेत शिवसेनेचे असणारे नगरसेवक कोणाकडे जाणार असा सवाल ही आता समोर येत आहे.

शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेतच दोन गट बनले आहेत. त्यामुळे महापालिकेत कोणाची ताकद वाढणार की शिवसेना होती तशी राहणार याचा पेच निर्माण झाला आहे. राज्यात 27 महापालिका असून यात शिवसेनेचे 532 नगरसेवक आहेत. तर सांगली, पनवेल आणि लातूर येथील महापालिकांमध्ये सेनेची पाटी कोरी आहे. दरम्यान होणाऱ्या महापालिकांच्या निवडणुकीत हे नगरसेवक कोणाला पाठींबा देणार हे ही पहावं लागणार आहे.

मुंबई महापालिका : 97

मुंबई महापालिकेचा विचार केल्यास येथे माजी महापौर किशोरी पेडणेकर आहेत. ज्या उद्धव ठाकरे यांच्या जवळच्या मानल्या जातात. तर येथे सेनेचे 97 नगरसेवक आहेत. जे ठाकरे यांच्याबरोबरच असतील असे पेटणेकर यांच्याकडून सांगण्यात येत आहे.

नवी मुंबई : 47

येथे मात्र चित्र पालटल्याचे पहायला मिळत आहे. येथे 47 नगरसेवक असून त्यातील 28 ते 30 नगर सेवक शिंदे गटाच्या गळाला लागल्याची चर्चा आहे.

ठाणे 67

ठाणे हा शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जातो. तर ठाणे महापालिकेत शिंदे यांचा दबदबा आहे. यामुळे येथे असणारे 67 नगरसेवकांचा पाठिंबा हा शिंदे यांनाच मिळेल.

उल्हासनगर 25

येथे शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे यांचा सेनेला पाठिंबा आहे. तर माजी महापौर लीलाबाई अशान व बहेनवाल यांनी आपण शिंदे गटात जात असल्याचे सांगितलं आहे. त्यामुळे येथे अजून चित्र स्पष्ट झालेले नाही. 25 नगरसेवक असणाऱ्या महापालिकेत सध्या 23 नगरसेवक आहेत. तर दोघांचे निधन झाले आहे.

कल्याण-डोंबिवली 51

कल्याण-डोंबिवली महापालिकेत याच्या आधीच सेनेचे 6 नगरसेवक हे फुटून भाजपमध्ये गेले आहेत. तर दोघांचे निधन झाले आहे. सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे येथेही शिंदे यांना मानणारा मोठा गट आहे. ज्यामुळे येथील ही नगरसेवक हे शिंदेबरोबर जातील अशी शंका आहे.

मीरा-भाईंदर 22

येथे 2 भाजपचे तर 19 नगरसेवक सेनेसोबत आहेत. त्यामुळे येथे शिवसेनेला कोणताही धोका नाही.

भिवंडी 12

भिवंडी महापालिकेत 12 नगरसेवक हे शिवसेनेचे आहेत. तर तर येथील भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे यांनी बंडखोरी केली आहे. तेही शिंदे यांच्या गटात सामिल झाले आहेत. मात्र येथील नगरसेवकांनी अजून काय करायचं हे जाहीर केलेलं नाही.

पश्चिम महाराष्ट्र 43

पश्चिम महाराष्ट्रातील महापालिकांचा विचार केल्यास केल्यास तेथे सेनेचे 43 नगरसेवक आहेत. ज्यात पिंपरी-चिंचवड, सोलापूर, पुणे आणि कोल्हापूर महापालिकेचा समावेश होतो.

पिंपरी-चिंचवड 9

येथील महापालिका ही भाजपच्या ताब्यात आहे. तर शिवसेनेचे 9 नगरसेवक आहेत. ते उद्धव ठाकरे यांच्याबरोबर आहेत. याबाबत शिवसेनेचे शहरप्रमुख सचिन भोसले यांनी आपली भूमिका आधीच स्पष्ट केली आहे.

पुणे 10

पुणे महापालिकेत शिवसेनेचे 10 नगरसेवक आहेत. ज्यांचा संपुर्ण पाठिंबा हा शिवसेनेलाच असल्याचे शहराध्यक्ष संजय मोरे यांनी स्पष्ट केलं होतं.

सोलापूर 21

येथे शिवसेनेचे 21 नगरसेवक असून एकाचे निधन झाल्याने सध्या 20 नगरसेवक आहेत. ज्यात दोघांचा पाठिंबा हा ठाकरे यांना आहे. तर 15 नगरसेवक हे राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याचे बोललं जात आहे.

कोल्हापूर 4

शिवसेनेचे येथे 4 नगरसेवक होते. त्यातील एकाने आधीच सेनेला राम राम केला होता. तर आता जे तीन राहिले आहेत. त्यांनी आपला पाठिंबा हा ठाकरे यांना दिला आहे.

नाशिक 33

येथे सेनेचे 33 नगरसेवक आहेत. ज्यापैकी कोणीही आपली बाजू मांडलेली नाही. या 33 नगरसेवकांनी कोणालाही आपला पाठिंबा सांगितलेला नाही.

मालेगाव 12

मालेगाव महापालिकेत सत्ता काँग्रेस-शिवसेना युतीची होती. त्यामुळे येथे शिंदे गटाच्या समर्थनार्थ कोणीतीही भूमिका आलेली नाही.

धुळे ०2

येथे सेनेचे दोनचं नगरसेवक आहेत. जे उद्धव ठाकरे यांच्याबरोबर असल्याचे सांगतात.

जळगाव अधिकृत 15 व भाजप बंडखोर 23

येथेही भूमिका स्पष्ट झालेली नाही. मात्र महापौर जयश्री महाजन, ज्योती तायडे, विष्णू भंगाळे आपण शिवसेनेतच राहणार असल्याचे म्हटलं आहे.

अहमदनगर 25

25 नगरसेकांच्या नगर महापालिकेत 23 नगर सेवकांचा पाठिंबा हा ठाकरे यांना आहे.

औरंगाबाद 33

औरंगाबाद महापालिकेतील सेनेचे बलाबल हे 28 + 05 समर्थक अपक्ष असे आहे. ज्यापैकी 90% नगरसेवकांनी आपला बिनशर्त पाठिंबा हा उद्धव ठाकरे यांना दिला आहे.

नांदेड वाघाळा 01

येथे 01 सेनेचा नगरसेवक असून त्याचा पाठिंबा हा शिंदे गटाला आहे.

परभणी 05

परभणीत पाच नगरसेवक असून त्यांनी आपला पाठिंबा शिवसेनाला दिला आहे.

अमरावती 07

येथील नगरसेवकांमध्ये सध्या शिंदेबद्दल आक्रोश आहे. तर त्यांचे तेथे समर्थक ही नाहीत. त्यामुळे येथे सर्व नगरसेवक हे उद्धव ठाकरे यांच्या बाजूने आहेत.

अकोला 08

महापालिकेतील सर्व आठ नगरसेवक हे ठाकरे यांच्याच मागे ठाम आहेत. कारण आता जिल्हाप्रमुख आ. नितीन देशमुख हे शिंदे यांच्या गटातून निघून महाराष्ट्रात आले आहेत. तर येथील नगरसेवक हे देशमुख यांच्यासोबत आहेत.

चंद्रपूर 01

येथे सेनेचे आधी दोन नगरसेवक होते. मात्र यातील आधीच एक विशाल निंबाळकर यांनी भाजप प्रवेश केला आहे. तर सुरेश पचारे यांनी आपण शिवसेनेसोबत असल्याचे सांगितलं आहे.

हे सुद्धा वाचा

नागपूर 02

नागपूर महापालिका ही भाजपच्या ताब्यात आहे. तर येथे फक्त सेनेचे दोनच नगरसेवक आहेत. जे ठाकरे यांच्या पाठीशी आहेत.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें