नगरमधील डॉन बॉस्को शाळेच्या सहलीच्या बसला भीषण अपघात

अहमदनगर/पुणे : शाळेची सहल घेऊन गेलेल्या बसला भीषण अपघात होऊन तीन जणांचा मृत्यू झालाय. नगर-कल्याण महामार्गावर जुन्नर तालुक्यातील गायमुखवाडी फाट्याजवळ ट्रॅव्हल बस आणि मालवाहतूक पीकअप यांचा अपघात झाला. ओतूर आळेफाटा यांच्या दरम्यान हा भीषण अपघात झाला असून या अपघाताची तीव्रता एवढी भीषण होती, की अपघातानंतर दोन्ही वाहनांनी जागेवरच पेट घेतला. मालवाहू पीकअप आळेफाट्याकडून ओतूरच्या दिशेने …

नगरमधील डॉन बॉस्को शाळेच्या सहलीच्या बसला भीषण अपघात

अहमदनगर/पुणे : शाळेची सहल घेऊन गेलेल्या बसला भीषण अपघात होऊन तीन जणांचा मृत्यू झालाय. नगर-कल्याण महामार्गावर जुन्नर तालुक्यातील गायमुखवाडी फाट्याजवळ ट्रॅव्हल बस आणि मालवाहतूक पीकअप यांचा अपघात झाला. ओतूर आळेफाटा यांच्या दरम्यान हा भीषण अपघात झाला असून या अपघाताची तीव्रता एवढी भीषण होती, की अपघातानंतर दोन्ही वाहनांनी जागेवरच पेट घेतला.

मालवाहू पीकअप आळेफाट्याकडून ओतूरच्या दिशेने चालला होता, तर ट्रॅव्हल बस मुंबईकडून कल्याणच्या दिशेने जात असताना गायमुखवाडी फाट्याजवळ समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाला. खाजगी ट्रॅव्हलस बसमध्ये डॉन बॉस्को विद्यालय, सावेडी अहमदनगर येथील नववी ते बारावीच्या वर्गातील विद्यार्थी होते. हे विद्यार्थी सहलीसाठी मुंबईला गेलेले होते. मुंबईहून नगरकडे परतत असताना हा अपघात झाला.

या अपघातात आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये ट्रॅव्हल बसचा क्लीनर शैलेश निमसे (वय 19), तर पीकअप वाहनातील चालक महादेव खोसे यांचा मृत्यू झाला.

अपघातात 40 ते 45 विद्यार्थी हे किरकोळ जखमी झाले आहेत. सर्व जखमींवर आळेफाटा येथील विविध खाजगी रुग्णालयात उपचार करून त्यांना सोडून देण्यात आलं. या अपघातानंतर तातडीने ओतूर पोलीस आणि आळेफाटा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अपघातानंतर महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दोन्ही अपघातग्रस्त वाहने ही जेसीबीच्या सहाय्याने बाजूला करून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *