नागपुरातील प्रस्तावित कोव्हिड रुग्णालयाला मान्यता, कोर्टाच्या कानउघाडणीनंतर सरकारचा निर्णय

नागपुरात कोरोनाचा प्रचंड उद्रेक झाला आहे. कोरोना बधितांचा आकडा 60 हजारांच्या पार गेला आहे.

नागपुरातील प्रस्तावित कोव्हिड रुग्णालयाला मान्यता, कोर्टाच्या कानउघाडणीनंतर सरकारचा निर्णय

नागपूर : नागपुरात कोरोनाचा वाढत उद्रेक लक्षात घेता (Nagpur COVID-19 Hospital) अखेर 1 हजार खाटांच्या कोव्हिड-19 केअर सेंटरला मान्यता मिळाली आहे. सरकारने या जम्बो कोव्हिड सेंटरसाठी आदेश काढले आहेत. या सेंटरमध्ये 400 खाटा व्हेंटिलेटर तर 300 खाटा ऑक्सिजनच्या राहणार आहेत (Nagpur COVID-19 Hospital).

नागपुरात कोरोनाचा प्रचंड उद्रेक झाला आहे. कोरोना बधितांचा आकडा 60 हजारांच्या पार गेला आहे. दररोज 50 ते 60 जणांचे कोरोनामुळे मृत्यू होत आहेत. सरकारी आणि खाजगी रुग्णालयात बेड्स उपलब्ध नाहीत. ही परिस्थिती असताना सरकार रुग्णांसाठी कोव्हिड केअर सेंटर उभारत नसल्यानं उच्च न्यायालयानं राज्य सरकारची चांगलीच कानउघाडणी केली होती.

त्यामुळे सरकारने तात्काळ आदेश काढत शहरातील विभागीय क्रीडा संकुलमध्ये जम्बो कोव्हिड केअर सेंटर उभारण्याचे आदेश काढले आहेत. या सेंटरचा कोरोना रुग्णांवर उपचारासाठी फायदा होणार आहे.

कोरोना रुग्णालयांवर नियंत्रण ठेवण्यासाठी समन्वय समिती स्थापन

नागपुरात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. रुग्णांना खाजगी रुग्णालयात बेड मिळत नाही. बेड मिळाला तर अव्वाच्या सव्वा पैसे आकारले जातात. आता यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि रुग्णालय सोबत रुग्णांच्या समस्या सोडवण्यासाठी उच्च न्यायालयाच्या आदेशानं समन्वय समिती स्थापन झाली आहे. नागपूरचे महापौर संदीप जोशी या समन्वय समितीचे अध्यक्ष आहेत. या समन्वय समितीमध्ये विभागीय आयुक्त, मनपा आयुक्त आणि आयएमएच्या अध्यक्षांचा समावेश आहे. या समन्वय समितीद्वारे खाजगी रुग्णालयांच्या अडचणी सोडवणे, सर्वसहमतीने निर्णय झाल्यास कारवाई करण्याची मुभा राहील, असं उच्च न्यायालयाने सांगीतलंय. खाजगी रुग्णालयांच्या समस्या आणि खाजगी रुग्णालयापासून रुग्णांना भेडसवणाऱ्या समस्या, सोडवण्यासाठी ही समिती गठीत करण्यात आल्याचं महापौरांनी सांगितलं (Nagpur COVID-19 Hospital).

नागपुरात दोन दिवसांचा जनता कर्फ्यू

नागपुरात आज आणि उद्या दोन दिवसांचा जनता कर्फ्यू घेण्यात येत आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जनता कर्फ्यू घेण्यात येत आहे. नागपुरकरांनी आज 19 सप्टेंबर आणि उद्या 20 सप्टेंबरला घरातच राहण्याच आवाहन करण्यात आलं आहे. नागपूरचे महापौर संदीप जोशी यांच्याकडून जनतेला आवाहन करण्यात आले आहे.

नागपुरात कोरोनाची स्थिती भयावह आहे. गेल्या दोन दिवसांत 109 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दोन दिवसांत 3,420 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.

Nagpur COVID-19 Hospital

संबंधित बातम्या :

आधी नागपुरातील प्रस्तावित कोव्हिड रुग्णालय उभारा, उच्च न्यायालयाने सरकारला फटकारलं

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *