नागपूर पदवीधर निवडणूक : 19 उमेदवारांमध्ये रंगणार सामना, 7 जणांनी अर्ज घेतले मागे

नागपूरसाठी एकूण 31 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते त्यापैकी 5 अर्ज अपात्र ठरले तर सात जणांनी अर्ज मागे घेतले.

नागपूर पदवीधर निवडणूक : 19 उमेदवारांमध्ये रंगणार सामना, 7 जणांनी अर्ज घेतले मागे
Follow us
| Updated on: Nov 18, 2020 | 9:40 AM

नागपूर : नागपूर पदवीधर मतदार संघात (Nagpur Graduate Constituency Election) आता 19 उमेदवारांमध्ये लढत होणार आहे. कारण अखेरच्या दिवशी सात जणांचे अर्ज मागे घेण्यात आले आहे. नागपूरसाठी एकूण 31 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते त्यापैकी 5 अर्ज अपात्र ठरले तर सात जणांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता 19 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत. (nagpur graduate constituency election now 19 candidates will contesting)

यामध्ये मुख्य लढतीत भाजपचे संदीप जोशी तर महाविकास आघाडीचे अभिजित वंजारी असतील तर इतर उमेदवारसुद्धा महत्वाची भूमिका निभावणार आहेत. खरंतर, नागपूर पदवीधर मतदार संघाचे क्षेत्र मोठे असल्याने प्रचार करताना उमेदवारांची दमछाक होणार आहे. त्यात आता निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणंदेखील महत्त्वाचं आहे.

या निवडणुकीसाठी 31 उमेदवारांपैकी ज्या उमेदवारांचे अर्ज अपात्र ठरण्यात आले त्यामध्ये अविनाश तुपकर, प्रशांत डवले, रमेश फुले, धर्मेंद्र मंडलिक आणि अभिजित रविंद वंजारी (अपक्ष उमेदवार) यांचा समावेश आहे. यंदाच्या निवडणुकीत दोन अभिजीत वंजारी नावाच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केला होता. त्यापैकी अपक्ष उमेदवार अभिजित रविंद वंजारी यांचा अर्ज अपात्र ठरवण्यात आला आहे. (nagpur graduate constituency election now 19 candidates will contesting)

नागपूर पदवीधर मतदारसंघातून निवडणुकीत एकूण 31 उमेदवार रिंगणात उतरले होते. भाजपचा पारंपरिक मतदारसंघ असलेल्या नागपूर पदवीधर मतदारसंघात यंदा भाजपने उमेदवार बदलत महापौर संदीप जोशी यांना संधी दिली. तर काँग्रेसकडून अभिजीत वंजारी यांना मैदानात उतरवण्यात आलं.

दरम्यान, निवडणुकीच्या रिंगणात संदीप दिवाकर जोशी आणि संदीप रमेश जोशी अशा नावाचे 2, तर अभिजीत गो. वंजारी आणि अभिजीत रविंद्र वंजारी अशा नावाचे 2 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी अभिजीत रविंद्र वंजारी यांचा अर्ज अपात्र ठरला होता.

निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक जाहीर : 5 नोव्हेंबर उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस : 12 नोव्हेंबर अर्ज छाननी : 13 नोव्हेंबर उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिवस : 17 नोव्हेंबर मतदानाचा दिनांक : 1 डिसेंबर मतदान (सकाळी 8 ते सांयकाळी 5) मतमोजणी : 3 डिसेंबर निवडणूक प्रक्रिया संपण्याचा दिवस : 7 डिसेंबर

(nagpur graduate constituency election now 19 candidates will contesting)

इतर बातम्या – 

“ठाकरे सरकारकडून विदर्भावर अन्याय, नागपूर पदवीधरमध्ये भाजपच जिंकणार”: चंद्रशेखर बावनकुळे

झालं… राष्ट्रवादीची समजूत काढली तर आता शिवसेना नाराज; नागपूर पदवीधर मतदारसंघात मानापमान नाट्य

(nagpur graduate constituency election now 19 candidates will contesting)

Non Stop LIVE Update
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?.
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?.
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा.
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय.
नवनीत राणांचा प्रचार करणार? बच्चू कडू म्हणाले, 'त्यांच्या बापाची...'
नवनीत राणांचा प्रचार करणार? बच्चू कडू म्हणाले, 'त्यांच्या बापाची...'.
'मोदी आणि माझ्यात वाद नाही'; केंद्रीय मंत्री गडकरींची EXCLUSIVE मुलाखत
'मोदी आणि माझ्यात वाद नाही'; केंद्रीय मंत्री गडकरींची EXCLUSIVE मुलाखत.
शाहांसोबत राज ठाकरेंची काय चर्चा?यशवंत किल्लेदारांनी काय फेसबुक पोस्ट?
शाहांसोबत राज ठाकरेंची काय चर्चा?यशवंत किल्लेदारांनी काय फेसबुक पोस्ट?.