ऑफिसला जाण्या-येण्याची घाई जीवावर, नागपुरात अपघाताचं प्रमाण वाढलं

ऑफिसला जाण्याची घाई नागपूरकरांच्या जीवावर बेतू लागली आहे. कारण ऑफिसला जाण्याच्या आणि घरी परतण्याच्या वेळेत नागपूर शहरात सर्वाधिक आपघात होत आहेत.

ऑफिसला जाण्या-येण्याची घाई जीवावर, नागपुरात अपघाताचं प्रमाण वाढलं

नागपूर : ऑफिसला जाण्याची घाई नागपूरकरांच्या जीवावर बेतू लागली आहे (Nagpur Accident Rate). कारण ऑफिसला जाण्याच्या आणि घरी परतण्याच्या वेळेत नागपूर शहरात सर्वाधिक आपघात होत आहेत. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीत हे सत्य समोर आलं आहे. त्यामुळे नागपूर आता अपघातपूर होत आहे का? असा प्रश्नही या निमित्तानं उपस्थित केला जात आहे (Nagpur Accident Rate).

नागपूर होतंय अपघातपूर?

देशातील इतर मोठ्या शहरांप्रमाणेच नागपुरातदेखील कार्यालये सुरू होण्याच्या आणि सुटण्याच्या वेळेत रस्त्यांवर मोठी गर्दी दिसून येते. कार्यालयात पोहचण्यासाठी किंवा घरी लवकर जाण्यासाठी अनेकदा वाहनांची गती वाढते आणि हाच वेग मृत्युला आमंत्रण देणारा ठरतो. नागपुरात कार्यालये सुरू होणे आणि सुटण्याच्या कालावधीतच सर्वात जास्त अपघात होत असल्याची आकडेवारी नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या आहवालात समोर आली आहे. घाई आणि त्यामुळं वाहतूक नियम मोडण्याच्या प्रवृत्तीमुळे शहरात अपघातांचे प्रमाण वाढत चाललं आहे.

अपघात होऊ नये म्हणून नागपुरात काही संस्था काम करतात. मात्र, तरी नागपूरकर वाहतुकिचे नियम मोडण्यात पुढे आहेत. त्यात आता कार्यालयांमध्ये बायोमेट्रीक पद्धत आल्याने जरा जरी वेळ झाला तर त्याचा परिणाम पगारावर आणि वर्तवणुकीवर होतो. म्हणून कसलीही पर्वा न करता सुसाट वेगाने वाहन चालविणाऱ्यांचे प्रमाण वाढत चाललं आहे. असा निष्कर्षही अपघाताच्या वाढत्या प्रमाणामागे काढला जात आहे.

आजच्या फास्ट जगात सर्वांनाच घाई आहे. मात्र, ही घाई आता जीवावर बेतू लागलीय. त्यामुळं वेळेचं योग्य नियोजन करून अपघात टाळून आपला जीव वाचविण्याची नितांत गरज आहे.

VIDEO :

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *