नागपुरात निवडणुकांचा धुरळा, शिवसेना उमेदवाराच्या जावयाची हत्या

मयत संजय खडसे हा नागपूर नगर परिषद निवडणुकीतील शिवसेनेच्या उमेदवाराचा जावई होता.

नागपुरात निवडणुकांचा धुरळा, शिवसेना उमेदवाराच्या जावयाची हत्या

नागपूर : नागपुरात जिल्हा परिषद निवडणुकांचा धुरळा उडालेला असतानाच शिवसेना उमेदवाराच्या जावयाच्या हत्येमुळे खळबळ उडाली आहे. नागपूर जिल्ह्यातील कन्हानमध्ये काल (सोमवारी) रात्री तरुणाची हत्या (Nagpur Kanhan Murder) करण्यात आली.

संजय खडसे या तरुणाची एका बारबाहेर हत्या करण्यात आली. संजय हा नागपूर नगर परिषद निवडणुकीतील शिवसेनेच्या उमेदवाराचा जावई होता. त्यामुळे कन्हान परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.

संजय खडसे काल रात्री बारमध्ये बसला होता. त्याच्या बाजूला आरोपी बसले असताना ग्लास पडल्यावरुन दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर संजय खडसे बारमधून बाहेर पडला. तेव्हा आरोपींनी त्याच्यावर धारदार शस्त्राने वार केले. हल्ल्यामध्ये संजयला प्राण गमवावे लागले.

पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला असून पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत. बारमधील वादातून हे हत्याकांड घडलं, की याला राजकीय रंगही आहे, याचा तपास नागपूर पोलिस करत आहेत.

नागपुरात निवडणुकांची रणधुमाळी

विधानसभा निवडणुका आणि त्यानंतर सत्तानाट्याचा धुरळा खाली बसतो, तोच नागपूरसह काही जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. पालघर, नागपूर, धुळे, नंदुरबार, अकोला आणि वाशिम या सहा जिल्हा परिषदेच्या निवडणुकांसाठी आज (मंगळवार 7 जानेवारी) मतदान होत आहे, तर उद्या निवडणुकांचे निकाल येतील.

नागपूर जिल्हा परिषदेच्या 58 गटांसाठी 270 उमेदवार रिंगणात आहेत. तर 13 पंचायत समित्यांच्या 116 गणांसाठी मतदान होणार आहे. नागपूर जिल्ह्यातील 1828 मतदान केंद्रांवर आज मतदान होत आहे. नागपूर जिल्हा परिषद जितकी भाजपला आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी महत्त्वाची आहे, तेवढीच काँग्रेस-राष्ट्रवादीलाही ती जिंकायची आहे.

Nagpur Kanhan Murder

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *