पळून जाऊन लग्न, ट्रेनच्या टपावर चढून तरुणाची आत्महत्या, नवविवाहित पत्नी वाचली

बिरबल आणि ज्ञानदेवी या दोघांनी प्रेमविवाह केला होता, मात्र जवळचे पैसे संपल्याने दोघांनी आत्महत्येचा निर्णय घेतला

पळून जाऊन लग्न, ट्रेनच्या टपावर चढून तरुणाची आत्महत्या, नवविवाहित पत्नी वाचली
Follow us
| Updated on: Dec 10, 2019 | 12:20 PM

नागपूर : नागपूर रेल्वे स्टेशनवर उभ्या असलेल्या एक्स्प्रेसच्या स्लीपर क्लास डब्यावर चढून तरुणाने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. तरुणाने आत्महत्या करण्यापूर्वी त्याची पत्नीसुद्धा टोकाचं पाऊल उचलण्यासाठी डब्यावर चढली होती, मात्र सुरक्षारक्षकांनी कसेबसे तिला वाचवले. परंतु ओव्हरहेड वायरला स्पर्श करुन तरुणाने जीव (Nagpur Man Suicide on Train Top) दिला.

नागपूर रेल्वे स्टेशनवर काही प्रवासी ट्रेनची वाट बघत होते, इतक्यात ‘अरे धावा, धावा… वाचवा, वाचवा.. ते दोघे आत्महत्या करत आहेत, अशा हाका-आरोळ्यांनी नागपूर रेल्वे स्टेशन थरारुन गेलं. त्यामुळे स्टेशनवर उपस्थित सर्वांच्या नजरा ट्रेनच्या छताकडे रोखल्या गेल्या होत्या.

स्टेशनवर उभ्या असलेल्या एका विशेष गाडीच्या छतावर एक जोडपं आत्महत्या करण्यासाठी चढलं होतं. या घटनेत बिरबल कुथ्थू पहारिया या तरुणाने ओव्हरहेड वायरला स्पर्श करुन आत्महत्या केली, तर त्याची पत्नी ज्ञानदेवी थोडक्यात बचावली.

बिरबल आणि ज्ञानदेवी या दोघांनी प्रेमविवाह केला होता. त्यांनी पळून जाऊन संसार थाटण्याचा निर्णय घेतला. ठरल्याप्रमाणे दहा दिवसांपूर्वीच त्यांनी घर सोडलं. डोंगरगढला उतरल्यानंतर ते थांबले. नंतर नागपूरला आले. सोबत आणलेले पैसे संपले. पोट भरणंही कठीण झालं. नागपूर ते डोंगरगढ आणि डोंगरगढ ते नागपूर असा ते प्रवास करत होते. ‘आता जगायचं कसं?’ हा प्रश्न त्यांना अस्वस्थ करत होता. यातून दोघांनीही आत्महत्येचा निर्णय घेतला असल्याचा अंदाज आहे.

बिरबल आणि ज्ञानदेवी हे दोघंही नागपूर स्थानकावर आले. रात्री 10.30 वाजताच्या सुमारास अचानक इटारसी एन्डकडे फलाट क्रमाक 1 वरील जिन्याजवळील छतावर ते चढले. त्याच वेळी फलाट क्रमांक एकवर विशेष गाडी थांबली होती. त्या गाडीतील प्रवासी हे रेल्वे कर्मचारी होते. त्या दोघांकडे प्रवाशांचे लक्ष गेले.

प्रवाशांनी आरडाओरड केली. एकच गलका झाल्याने लोहमार्ग पोलिस, आरपीएफचे जवानांनी घटनास्थळाच्या दिशेने धाव घेतली. दोघांनाही खाली उतरण्याची विनवणी सगळे जण करत होते. त्याच वेळी पोलिसांनी ब्रिजच्या जिन्याला असलेली लोखंडी ग्रील तोडली. ऑटोचालकांचे नेते अलताफ अन्सारी हे तोडलेल्या ग्रीलमधून छतावर चढले, परंतु बिरबल तिला सोडत नव्हता.

अलताफने बिरबलजवळून तिला वेगळे करत खाली उतरवले. मात्र, त्याच वेळी बिरबलने फलाट क्रमांक एकवर थांबलेल्या विशेष रेल्वे गाडीच्या छतावर उडी घेतली. घटनेचं गांभीर्य लक्षात घेत उपस्टेशन व्यवस्थापकाला माहिती देऊन इंजिनला वीजपुरवठा करणाऱ्या उच्चदाब वाहिनीचा (ओएचई) वीज पुरवठा तातडीने खंडित करण्यात आला.

बिरबल एका डब्यावरुन दुसऱ्या डब्यावर उड्या मारत होता. सुमारे एक तास हा प्रकार सुरु होता. एका क्षणी त्याने दोन्ही हातांनी वीजवाहिनीला पकडलं. वीजपुरवठा खंडित असला तरी तारांमध्ये राहिलेल्या वीजेचा भार सोसण्यापलिकडे होता. बिरबल तारेला हात लावताच तो तिथेच चिकटला.

अन्सारी यांनीच लाकडी दांड्याने त्याला सोडवलं. पण, त्याने छतावरुन खाली उडी घेतल्यामुळे डोक्‍याला गंभीर दुखापत होऊन त्याचा मृत्यू झाला. लग्नाच्या काही दिवसातच वैधव्य आलेल्या ज्ञानदेवीला शासकीय वसतीगृहात (Nagpur Man Suicide on Train Top) पाठवण्यात आले.

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.