स्वागताला हार-तुरे नको सांगणाऱ्या महापौरांच्या केबिनशेजारीच फुलांची सजावट

सत्कारासाठी हार, बुके आणू नका, तेच पैसे महापौर सहाय्यता निधीत जमा करा, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत होईल, असं आवाहन नागपूरचे महापौर संदीप जोशी यांनी जनतेला केलं होतं

स्वागताला हार-तुरे नको सांगणाऱ्या महापौरांच्या केबिनशेजारीच फुलांची सजावट
Follow us
| Updated on: Dec 27, 2019 | 1:23 PM

नागपूर : स्वागताला हार-तुरे आणि बुके आणू नका, या नागपूरचे महापौर संदीप जोशी यांनी केलेल्या आवाहनाला भाजप नगरसेवकानेच केराची टोपली दाखवल्याचं समोर आलं आहे. महापौरांच्या केबिनशेजारीच फुलांची सजावट (Nagpur Mayor Flower Decoration) करण्यात आल्याने हा विरोधाभास अधोरेखित झाला.

सत्कारासाठी हार, बुके आणू नका, तेच पैसे महापौर सहाय्यता निधीत जमा करा, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत होईल, असं आवाहन नागपूरचे महापौर संदीप जोशी यांनी जनतेला केलं. लोकांनीही त्याला चांगला प्रतिसाद दिला. एकीकडे हा स्तुत्य उपक्रम, तर दुसरीकडे महापौरांच्या केबिन शेजारीच हार, तुऱ्यांची सजावट करण्यात आली होती. ज्या पक्षाचे महापौर आहेत, त्याच भाजपचे नगरसेवक बाल्या बोरकर यांनी परिवहन सभापती म्हणून पदभार स्वीकारला, तेव्हा केबिनबाहेर फुलांची आरास करण्यात आली होती.

हौशी कार्यकर्त्यांनी फुलांच्या हारांनी सजावट केली आहे, त्यांच्या भावना आहेत. पण या कार्यकर्त्यांना नक्कीच समज दिली जाईल, असं नागपूरचे महापौर संदीप जोशी म्हणाले. त्यामुळे हार-तुऱ्यांवरुन कोणता ‘कलगीतुरा’ रंगणार, हे पाहणं उत्सुकतेचं आहे.

संदीप जोशी यांच्या गाडीवर काही दिवसांपूर्वी बाईकस्वार हल्लेखोरांनी तीन गोळ्या झाडल्या होत्या. सुदैवाने जोशी आणि त्यांचं कुटुंब या हल्ल्यातून सुखरुप बचावलं होतं. वर्धा रोडवर एम्प्रेस पॅलेस हॉलजवळ ही घटना घडली होती. अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशन करुन परतताना हा हल्ला झाला होता.

कोण आहेत संदीप जोशी?

संदीप जोशी हे भाजपचे महापालिकेतील ज्येष्ठ नगरसेवक असून लघु उद्योग विकास महामंडळाचे अध्यक्ष आहेत. शिवाय माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणूनही ते ओळखले जातात. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात प्रचाराची जबाबदारी संदीप जोशी यांच्यावरच होती.

नोव्हेंबर महिन्यात संदीप जोशी यांच्याकडे नागपूरच्या महापौरपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. संदीप जोशी हे भाजपच्या तिकीटावर नगरसेवकपदी निवडून आले आहेत. महापौरपदाच्या निवडणुकीत संदीप जोशी यांनी काँग्रेसच्या हर्षदा साबळे यांचा दणदणीत पराभव केला होता. संदीप जोशी यांना सव्वा वर्षांसाठी महापौरपद देण्यात आलं आहे.

पदभार स्वीकारल्यानंतर संदीप जोशी यांनी अतिक्रमणविरोधी मोहीम हाती घेतली होती. या मोहिमेमुळेच त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

Nagpur Mayor Flower Decoration

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.