नागपुरातील अंबाझरी तलावाच्या भिंतीला भेगा, महापौरांकडून मेट्रो प्रशासनाला नोटीस बजावण्याचे आदेश

अंबाझरी तलावाच्या भिंतीला भेगा पडल्याच्या प्रकरणावरुन ही नोटीस बजावण्यात आली आहे. (Nagpur Mayor Sandip Joshi orders notice to Metro administration)

नागपुरातील अंबाझरी तलावाच्या भिंतीला भेगा, महापौरांकडून मेट्रो प्रशासनाला नोटीस बजावण्याचे आदेश

नागपूर : मुंबई मेट्रोच्या कारशेड वादानंतर आता नागपूर मेट्रोतही वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. नागपूरचे महापौर संदीप जोशी यांनी नागपूर मेट्रो प्रशासनाला नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत. अंबाझरी तलावाच्या भिंतीला भेगा पडल्याच्या प्रकरणावरुन ही नोटीस बजावण्यात आली आहे. (Nagpur Mayor Sandip Joshi  orders notice to Metro administration)

नागपुरातील अंबाझरी तलावाच्या भिंतीला भेगा पडल्या आहेत. त्यामुळे या ठिकाणी मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तसेच तलावाच्या भिंतीवर नागपूर मेट्रोचा शेकडो ट्रक राडारोडा पडला आहे.

त्यामुळे महापौर संदीप जोशी यांनी मेट्रो प्रशासनाला नोटीस बजावण्याचे आदेश दिल आहेत. तसेच येत्या 23 ऑक्टोबरला सिंचन विभाग, नागपूर मेट्रो आणि मनपा प्रशासनाची एक महत्त्वपूर्ण बैठकही आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत पुढील निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्धाटन 

नागपूरकरांचं आकर्षण असलेल्या नागपूर मेट्रोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 7 मार्च 2019 रोजी व्हिडीओ लिंकच्या माध्यमातून हिरवा झेंडा दाखवत सुरुवात केली. मेट्रो आता नागपूरकरांच्या सेवेत रुजू झाली असून खापरी ते बर्डी असा 13 किमीचा प्रवास सुरु झाला होता.

नागपूर मेट्रो ही देशातील ग्रीन मेट्रो आहे. या मेट्रोसाठी सौर ऊर्जेचा मोठ्या प्रमाणात वापर होणार आहे. स्टेशन सुद्धा ग्रीन आणि ऐतिहासिक आहेत. कमी खर्च आणि कमी वेळात बनलेली ही मेट्रो आहे. नागपुरात वर मेट्रो आणि खाली उड्डाण पूल, त्या खाली रोड अशी व्यवस्था असलेली देशातील कदाचित पहिलीच सेवा असावी, असं मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी व्यक्त केलं होतं. (Nagpur Mayor Sandip Joshi  orders notice to Metro administration)

संबंधित बातम्या : 

नागपूर मेट्रो प्रवाशांच्या सेवेत, डबल डेकर पूल असणारा देशातला पहिला प्रकल्प

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *