कोरोना रुग्णांकडून जादा बिल उकळणे भोवलं, नागपुरात 16 खाजगी रुग्णालयांना पालिकेची नोटीस

नागपुरातील 16 खाजगी रुग्णालयांना मनपाने नोटीस बजावली आहे (Audit of Private Hospital in Nagpur).

कोरोना रुग्णांकडून जादा बिल उकळणे भोवलं, नागपुरात 16 खाजगी रुग्णालयांना पालिकेची नोटीस
Follow us
| Updated on: Oct 16, 2020 | 8:14 AM

नागपूर : नागपुरातील 16 खाजगी रुग्णालयांना मनपाने नोटीस बजावली आहे (Audit of Private Hospital in Nagpur). कोरोना रुग्णांकडून जादा बिल उकळत असल्याचे रुग्णालयांना भोवले आहे. ऑडिटरच्या तपासणीनंतर हा प्रकार उघडकीस आला आहे (Audit of Private Hospital in Nagpur).

मेडीकेअर, सेनगुप्ता, गंगा केअर, सिम्स हॉस्पीटल बजाजनगर रुग्णालयांना नोटीस देण्यात आली आहे. रुग्णांकडून आकारलेले जादा पैसे परत करण्याचे निर्देशही या रुग्णालयांना देण्यात आले आहेत. पैसे परत न केल्यास रुग्णालयांवर कारवाई होणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.

कोरोना काळात राज्यातील खाजगी रुग्णालयात रुग्णांची लूट सुरु असल्याचे दिसून आले. त्यामुळे सरकारने याची दखल घेत रुग्णालयांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

नुकतेच कोल्हापूरमधील एका खासगी रुग्णालयात कोरोना रुग्णाची लूट झाल्याचे समोर आले. विशेष म्हणजे महानगरपालिकेच्या लेखापरीक्षकांनी हा प्रकार उघडकीस आणत रुग्णालयाला खासगी दराप्रमाणे बिल आकारणी करायला भाग पाडलं आहे. या कारवाईनंतर रुग्णाचं बिल एक-दोन हजाराने नाही, तर तब्बल दीड लाखांनी कमी झालं आहे.

पुण्यातही अनेक खासगी रुग्णलयांवर कारवाई करण्यात आली. अतिरिक्त बिल आकारणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई केल्याने आतापर्यंत रुग्णांचे लाखो रुपये परत करण्यात आले आहेत.

संबंधित बातम्या :

Kolhapur Corona | कोल्हापुरात खासगी रुग्णालयाला सरकारी ऑडिटरचा दणका, रुग्णाच्या बिलात दीड लाखांची कपात

पुण्यात खासगी रुग्णालयांच्या बिलांचे ऑडिट, पाच दिवसात 29 लाखांची अतिरिक्त बिले कमी

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.