शिवसेनेच्या माजी पदाधिकाऱ्याला दिलासा, चिंटू महाराजवरील एफआयआर रद्द

तक्रारदार राजेश वैरागडे आणि चिंटू महाराज यांच्यात समेट झाल्याने एफआयआर रद्द करण्यासाठी न्यायालयात अर्ज करण्यात आला होता

Nagpur Shivsainik FIR cancelled, शिवसेनेच्या माजी पदाधिकाऱ्याला दिलासा, चिंटू महाराजवरील एफआयआर रद्द

नागपूर : नागपुरातील शिवसेनेचे माजी पदाधिकारी चिंटू महाराज यांच्याविरोधात दाखल केलेला एफआयआर उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रद्द केला (Nagpur Shivsainik FIR cancelled) आहे. रेती वाहतूकदारांना धमकावल्याप्रकरणी चिंटू महाराजांवर नागपूर जिल्ह्यातील मौदा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती.

तक्रारदार राजेश वैरागडे आणि चिंटू महाराज यांच्यात समेट झाला. त्यानंतर वैरागडेंनी एफआयआर रद्द करण्यासाठी न्यायालयात अर्ज केला होता, त्यानंतर नागपूर खंडपीठाने चिंटू महाराजांवरील एफआयआर रद्द करण्याचे आदेश दिले.

भंडारा जिल्ह्यातून नागपूरसह परिसरात मोठ्या प्रमाणात वाळूची तस्करी होत असल्याचं सांगत, ऑगस्ट 2019 मध्ये भंडारा रोडवर चिंटू महाराजांनी रेतीची गाडी अडवली होती. तक्रारदार राजेश वैरागडे यांनी चिंटू महाराज विरोधात मौदा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार केली होती. त्यानंतर एफआयआर दाखल करण्यात आला.

आता दोघांमध्येही समेट झाल्यानंतर उच्च न्यायालयाने ही एफआयआर रद्द केली आहे. उच्च न्यायालयाच्या ग्रंथालय विकासासाठी चिंटू महाराजांना 15 हजार तर, राजेश वैरागडे यांना 20 हजार रुपये भरण्याचे आदेश दिले. (Nagpur Shivsainik FIR cancelled)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *