Sunil Kedar : कामठी तालुक्यात विविध विकासकामांचे भूमिपूजन, लोकार्पण, नागरिकांना कसा होणार फायदा?

ग्रामीण भागात मजबूत रस्त्यांचे जाळे निर्मितीसह अनेक मुलभूत सुविधांची कामे पूर्णत्वास जात आहे. अनेक नव्या कामांना चालना मिळाली आहे. ही सर्व कामे विहित मुदतीत पूर्ण करावीत. ती गुणवत्तापूर्ण असावीत. चांगले रस्ते निर्मितीमुळे विकासाची प्रक्रिया अधिक गतिमान होणार आहे.

Sunil Kedar : कामठी तालुक्यात विविध विकासकामांचे भूमिपूजन, लोकार्पण, नागरिकांना कसा होणार फायदा?
कामठी तालुक्यात विविध विकासकामांचे भूमिपूजन
गोविंद हटवार, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Jun 28, 2022 | 9:24 AM

नागपूर : राज्य शासनाच्या विविध योजनांमधून ग्रामीण भागात मुलभूत सुविधांची उभारणी करण्यात येत आहे. ग्रामीण भागात लोकप्रतिनिधींनी सुचविलेली गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत नागरी सुविधांकरिता विशेष अनुदान योजना, जिल्हा खनिज प्रतिष्ठान योजना व शामाप्रसाद मुखर्जी योजनांमधून निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. ही कामे प्राधान्याने पूर्ण करावीत, असे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी सोमवारी सांगितले. कामठी तालुक्यातील विविध गावांतील सुमारे 5 कोटी 50 लाख निधीतून होणाऱ्या विकासकामांचे मंत्री केदार यांच्या हस्ते भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रश्मी बर्वे (Rashmi Barve), उपाध्यक्षा सुमित्रा कुंभारे (Sumitra Kumbhare), समाज कल्याण सभापती नेमावली माटे, जि.प. सदस्य अंवतिका लेकुरवाळे (Avantika Lekurwale), सरपंच वनिता इंगोले, उपविभागीय अधिकारी श्याम मदनुरकर यांच्यासह अधिकारी व नागरिक यावेळी उपस्थित होते.

केम येथे जलशुद्धीकरण केंद्र

विशेष अनुदान योजनेंतर्गत बिडगाव जीजामातानगर, आराधनानगर 30 लाख रुपये निधीतून रस्त्याचे बांधकाम, तरोडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या वर्गखोली बांधकाम, जिल्हा खनिज प्रतिष्ठान योजनेंतर्गत 16 लाख 17 हजार निधीतून जलशुध्दीकरण संयत्र व शाळेच्या खोलीचे लोकार्पण करण्यात आले. तसेच 36 लाख रुपये निधीतून टेमसाना येथील जलशुध्दीकरण केंद्र, भक्त निवास, अंगणवाडी बांधकाम, केम येथील जलशुध्दीकरण केंद्र, जिल्हा परिषद शाळा वर्गखोली, शामाप्रसाद मुखर्जी योजने अंतर्गत 60 लाख रुपये निधीतून शिवणी व चिखली येथील शॉपिंग कॉम्पलेक्स आदींचे भूमिपूजन व लोकार्पण यावेळी झाले.

सामूहिक प्रशिक्षण केंद्र

30 लाख रुपये निधीतून भूगाव येथील शॉपिंग कॉम्पलेक्स, 10 लाख रुपये निधीतून नान्हा मांगली येथील क वर्ग तिर्थक्षेत्र विकास कार्यक्रम अंतर्गत यात्री निवास, 10 लाख निधीतून जाखेगाव येथील यात्री निवास, 16 लाख 17 हजार निधीतून आसलवाडा गावातील जलशुध्दीकरण केंद्र व वर्गखोली, दोन कोटी 25 लाख निधीतून अंबाडी येथील स्पोर्ट कॉम्पलेक्स, वेअर हॉऊस, सामूहिक प्रशिक्षण केंद्र तसेच 37 लाख निधीतून वडोदा येथील कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र, माताबाल संगोपन उपकेंद्र व वर्गखोली आदींचे भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले.

विकासाची प्रक्रिया गतीमान होणार

ग्रामीण भागात मजबूत रस्त्यांचे जाळे निर्मितीसह अनेक मुलभूत सुविधांची कामे पूर्णत्वास जात आहे. अनेक नव्या कामांना चालना मिळाली आहे. ही सर्व कामे विहित मुदतीत पूर्ण करावीत. ती गुणवत्तापूर्ण असावीत. चांगले रस्ते निर्मितीमुळे विकासाची प्रक्रिया अधिक गतिमान होणार आहे. इतरही आवश्यक रस्ते सुधारणेच्या कामांबाबत तत्काळ प्रस्ताव द्यावेत. विकासकामांसाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाहीही श्री. केदार यांनी दिली. पावसाळ्यात साथरोगांचा फैलाव होत असल्याने रोगांना आळा घालण्यासाठी त्यादृष्टीने पिण्याच्या पाण्याच्या टाकींची स्वच्छता, आरोग्यकेंद्रात पुरेसा औषधींचा साठा व अंगणवाडीत बालकांसाठी पोषण आहार आदी महत्वपूर्ण बाबी करण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिले.

हे सुद्धा वाचा


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें