घर खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी; सरकारकडून मुद्रांक शुल्कात सवलत

टक्के मुद्रांक शुल्क सवलत 31 डिसेंबर 2020 पर्यंत मर्यादित आहे. Big News For Home Buyers; Concession In stamp Duty From The Government

  • गजानन उमाटे, टीव्ही 9 मराठी, नागपूर
  • Published On - 7:41 AM, 23 Dec 2020
घर खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी; सरकारकडून मुद्रांक शुल्कात सवलत

नागपूरः मालमत्ता खरेदीवरील मुद्रांक शुल्कात (Stamp Duty) 31 मार्च 2021 पर्यंत सवलत देण्यात आलीय. 1 जानेवारी ते 31 मार्च 2021 पर्यंत मुद्रांक शुल्कात 1.5 टक्के सवलत मिळणार आहे. त्यामुळे त्याचा हजारो मालमत्ता खरेदीदारांना फायदा होणार आहे. बांधकाम व्यवसायाला चालना देण्यासाठी मुद्रांक शुल्क सवलत दिलीय.  तत्पूर्वी 3 टक्के मुद्रांक शुल्क सवलत 31 डिसेंबर 2020 पर्यंत मर्यादित आहे. (Big News For Home Buyers; Concession In stamp Duty From The Government)

कोरोनाच्या संकटात बांधकाम व्यवसायाला चालना देण्यासाठी राज्य शासनाने 1 सप्टेंबरपासून 6 टक्के असलेल्या मुद्रांक शुल्कात 3 टक्क्यांपर्यंत कपात केली होती. मुद्रांक शुल्क कमी होताच नागपूर जिल्ह्यात शहर आणि ग्रामीण भागात दस्त नोंदणी (रजिस्ट्री) वाढल्या होत्या, पण गेल्या वर्षीच्या याच महिन्यांच्या तुलनेत शासनाला महसूल कमी मिळाला. 3 टक्क्यांची सवलत 31 डिसेंबर 2020 पर्यंत राहणार आहे. मुद्रांक शुल्क सवलतीमुळे बांधकाम क्षेत्राला चालना मिळालीय.

ग्राहकाला एकूण 3 टक्के सवलत

सप्टेंबर महिन्यापूर्वी नोंदणी एकूण 6 टक्के मुद्रांक शुल्क लागत होते. त्यामध्ये 5 टक्के मुद्रांक शुल्क आणि 1 टक्के अधिभार असायचा. पण बांधकाम क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने अधिभार रद्द केला आणि मुद्रांक शुल्कात 2 टक्के सवलत दिली. अर्थात ग्राहकाला एकूण 3 टक्के सवलत मिळाली. समजा 30 लाखांच्या घर खरेदीवर ग्राहकांना 90 हजारांचा फायदा होणार आहे.

कोरोना काळात 6 मार्च रोजी मुद्रांक शुल्कात एक टक्का सूट जाहीर करत अर्थमंत्री अजित पवार यांनी गृह खरेदीदारांना मोठा दिलासा देण्याचा प्रयत्न केला होता. ठाकरे सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पात अजित पवार यांनी सर्वच क्षेत्रांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला होता. (Stamp Duty One Percent Discount) आतापर्यंत घर खरेदी करताना 6 टक्के स्टॅम्प ड्युटी आकारली जात होती, मात्र पुढील दोन वर्षांसाठी ती पाच टक्के असेल.

दोन वर्षांसाठी मुद्रांक शुल्कात एक टक्का सवलत

महाविकास आघाडी सरकारने पुढील दोन वर्षांसाठी मुद्रांक शुल्कात एक टक्का सवलत जाहीर केली होती. ही सवलत मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरण (MMRDA), पुणे, पिंपरी चिंचवड आणि नागपूर या विभागातील ग्राहकांसाठी आहे. दस्त नोंदणीच्यावेळी भराव्या लागणाऱ्या एकंदरीत मुद्रांक शुल्क आणि इतर निगडीत भारामध्ये ही सवलत देण्यात आली होती.

संबंधित बातम्या

Stamp Duty Decreased | मुद्रांक शुल्कात 1 टक्का सवलत, गृह खरेदीदारांना दिलासा

Big News For Home Buyers; Concession In stamp Duty From The Government