महाराष्ट्रात ओबीसींची जातीनिहाय जनगणना करा; आशिष देशमुख यांची मागणी

ओबीसींसाठी असलेल्या 27 टक्के आरक्षणानुसारच जिल्हा परिषदेच्या निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. (congress leader ashish deshmukh demand obc census)

  • गजानन उमाटे, टीव्ही 9 मराठी, नागपूर
  • Published On - 12:51 PM, 5 Mar 2021
महाराष्ट्रात ओबीसींची जातीनिहाय जनगणना करा; आशिष देशमुख यांची मागणी
आशिष देशमुख, काँग्रेस नेते

नागपूर: ओबीसींसाठी असलेल्या 27 टक्के आरक्षणानुसारच जिल्हा परिषदेच्या निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे आमदार आशिष देशमुख यांनी मोठं विधान केलं आहे. महाराष्ट्रात राज्य सरकारने ओबीसींची जातीनिहाय जनगणना करावी, अशी मागणीच आशिष देशमुख यांनी केली आहे. (congress leader ashish deshmukh demand obc census)

टीव्ही 9 मराठीशी बोलताना आशिष देशमुख यांनी ही मागणी केली आहे. कोर्टाच्या निर्णयामुळे सव्वा वर्षातील ग्रामपंचायतीच्या सर्व जागा रद्द होण्याची शक्यता आहे. पाचही जिल्ह्यात ओबीसींना मोठा फटका बसणार आहे. दोन आठवड्यात सर्व निवडणुका घ्यावा लागणार असून या निवडणुकीत सर्व जागा खुल्या वर्गासाठीच राहणार आहे. त्यामुळे ओबीसी समाजाचे मोठे नुकसान होणार आहे. हा ओबीसींवर अन्याय असल्याने आता राज्य सरकारने राज्यातील ओबीसींची जनगणना करून त्यांना लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण देण्यासाठी हालचाली सुरू कराव्यात अशी मागणी देशमुख यांनी केली आहे.

स्वबळावर लढा

दरम्यान, या पाचही जिल्हा परिषदेची निवडणूक काँग्रेसने स्वबळावर लढवाव्यात, अशी मागणीही त्यांनी केली. काँग्रेस स्वबळावर लढल्यास या पाचही जिल्हा परिषदेत काँग्रेसला मोठं यश मिळेल, असा दावाही त्यांनी केला.

पंकजा मुंडे यांच्याकडूनही मागणी

पंकजा मुंडे यांनी काही दिवासांपूर्वी एक ट्विट करून भाजपला जुन्या आश्वासनांची आठवण करून दिली होती. आम्हीही या देशाचे नागरिक आहोत. आमचीही गणना करा. ओबीसींची जनगणना आवश्यक आहे आणि गरजही आहे. कुछ यादे और कुछ वादे, असं ट्विट पंकजा मुंडे यांनी केलं आहे. विशेष म्हणजे त्यांनी हिंदीत हे ट्विट केलं होतं. दिल्लीतील भाजपच्या नेत्यांना आपण काय लिहिलं हे समजण्यासाठीच त्यांनी हिंदीत हे ट्विट लिहिलं असावं, असं राजकीय जाणकार सांगतात.

पंकजा यांनी पोस्टसोबत एक व्हिडीओही अपलोड केला आहे. हा व्हिडीओ म्हणजे लोकसभेतील गोपीनाथ मुंडे यांचं 18 मिनिटाचं भाषण आहे. त्यात त्यांनी लोकसभेतील उपनेते म्हणून ओबीसी जनगणनेची मागणी केली होती. त्यानंतर भाजपची सत्ता आली पण अजूनही ओबीसींची जनगणना झाली नाही. आज खुद्द पंकजा मुंडेंनी हिंदीत ट्विट करत थेट दिल्लीला ओबीसींच्या जनगननेची आठवून करून दिलीय. (congress leader ashish deshmukh demand obc census)

 

संबंधित बातम्या:

Special Story: ओबीसींची जनगणना भारतीय राजकारणाची कूस बदलणार?; वाचा स्पेशल रिपोर्ट!

तर ओबीसी आरक्षणाचा प्रश्न पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे नेऊ: अजित पवार

ओबीसींच्या आरक्षणावरील सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर सरकार दुजाभाव करू शकते; विनायक मेटेंची भीती

पाच जिल्हा परिषदेतील ‘ओबीसी’च्या जागा कमी होणार, विद्यमान सदस्याचेही सदस्यत्व रद्द होणार?

(congress leader ashish deshmukh demand obc census)