…तर प्रियंका गांधींना राष्ट्रीय अध्यक्ष करा, आशिष देशमुखांची मागणी, काँग्रेसमध्ये खळबळ

महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेश महासचिव आणि माजी आमदार आशिष देशमुख पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. प्रियंका गांधी यांना काँग्रेसनं राष्ट्रीय अध्यक्ष करावं, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेश महासचिव आशिष देशमुख यांनी केलीय.

...तर प्रियंका गांधींना राष्ट्रीय अध्यक्ष करा, आशिष देशमुखांची मागणी, काँग्रेसमध्ये खळबळ
प्रियंका गांधी आशिष देशमुख राहुल गांधी


नागपूर: महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेश महासचिव आणि माजी आमदार आशिष देशमुख पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. प्रियंका गांधी यांना काँग्रेसनं राष्ट्रीय अध्यक्ष करावं, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेश महासचिव आशिष देशमुख यांनी केलीय. राहुल गांधी तयार नसतील तर प्रियंका गांधी यांना अध्यक्ष करावं, अशी मागणी आशिष देशमुख यांनी केली आहे.

तर प्रियंका गांधींना अध्यक्ष करा

राहुल गांधी जर अध्यक्षपद सांभाळण्यात तयार नसतील, तर प्रियंका गांधी यांनी अध्यक्षपद स्वीकारावं. तशी मागणी आपण राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत करणार असल्याचंही देशमुख यांनी सांगितलं. आशिष देशमुख यांनी ही मागणी करुन पुन्हा एकदा खळबळ उडवून दिलीय.

प्रियंका गांधी यांच्यात इंदिरा गांधींची छबी दिसते

प्रियंका गांधी यांना काँग्रेसनं राष्ट्रीय अध्यक्ष करावं, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेश महासचिव आणि माजी आमदार आशिष देशमुख यांनी केलीय. प्रियंका गांधी यांच्यात इंदिरा गांधी यांची छबी दिसते, असं देशमुख म्हणाले आहेत.

आशिष देशमुखांच्या मागणीनं खळबळ

राहुल गांधी जर अध्यक्षपद सांभाळण्यात तयार नसतील, तर प्रियंका गांधी यांनी अध्यक्षपद स्वीकारावं, तशी मागणी आपण राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत करणार असल्याचंही देशमुख यांनी सांगितलं. अशी मागणी करून आशिष देशमुख यांनी पुन्हा एकदा खळबळ उडवून दिलीय.

16 ऑक्टोबरला काँग्रेस कार्यकारिणीची बैठक

नवी दिल्लीत काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक 16 ऑक्टोबरला आयोजित करण्यात आली आहे. सध्याची राजकीय परिस्थिती, आगामी विधानसभा निवडणुकीबाबत बैठकीत मंथन होणार आहे. बैठकीला सोनिया गांधी, राहुल गांधी उपस्थित राहणार आहेत. काँग्रेस पक्षातील वरीष्ठ नेत्यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक होणार आहे.

कोण आहेत आशिष देशमुख?

आशिष देशमुख हे 2014 मध्ये नागपुरातील काटोल विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर आमदार होते. राष्ट्रवादीचे उमेदवार आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना पराभूत करत त्यांनी विजय मिळवला होता. अनिल देशमुख हे आशिष देशमुखांचे काका असून काका-पुतण्यातील राजकीय वाद सर्वश्रुत आहे. आशिष देशमुख हे महाराष्ट्र काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि माजी कॅबिनेट मंत्री रणजीत देशमुख यांचे पुत्र आहेत.

इतर बातम्या:

आमच्या पक्षातील ‘या’ नेत्याला मंत्रिमंडळातून काढा, काँग्रेस नेत्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र

पश्चिम बंगालचा गड सर करण्यासाठी काँग्रेसचा मराठमोळा शिलेदार, डॉ. अमोल देशमुख प्रभारीपदी

 

Congress leader Ashish Deshmukh demanded Priyanka Gandhi should be President of Party

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI