घरोघरी लागलेले कूलर डेंग्यूचे हॉटस्पॉट, नागपूर महापालिकेचं सर्वेक्षण, नागरिकांनो स्वच्छता ठेवा…!

घरोघरी लागलेले कूलर डेंग्यूचे हॉटस्पॉट ठरत असल्याचे महापालिकेतर्फे करण्यात आलेल्या सर्वेक्षणात समोर आले आहे.

घरोघरी लागलेले कूलर डेंग्यूचे हॉटस्पॉट, नागपूर महापालिकेचं सर्वेक्षण, नागरिकांनो स्वच्छता ठेवा...!
नागपूर महापालिका

नागपूर : घरोघरी लागलेले कूलर डेंग्यूचे हॉटस्पॉट ठरत असल्याचे नागपूर महापालिकेतर्फे करण्यात आलेल्या सर्वेक्षणात समोर आले आहे. पथकाद्वारे 1 हजार 959 घरांमधील कूलर्सची तपासणी करण्यात आली. त्यात 203 कूलर्समध्ये डेंग्यूची अळी आढळून आली. डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून नागरिकांनी घरातील कूलर कोरडे करावे, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.

घरोघरी लागलेले कूलर डेंग्यूचे हॉटस्पॉट

डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाययोजनांतर्गत शहरात मनपाद्वारे झोननिहाय सर्वेक्षण कार्य सुरू आहे. या अंतर्गत घरांघरांमध्ये जाउन मनपा पथकाद्वारे तपासणी केली जाते व डेंग्यू संदर्भात आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत.

नागपूर महापालिकेचं सर्वेक्षण

शनिवारी प्राप्त झोननिहाय अहवालानुसार शहरात 6497 घरांचे सर्वेक्षण करण्यात आले त्यात 282 घरे ही दुषित आढळली. म्हणजे, या घरांमध्ये डेंग्यू अळी आढळून आली. सर्वेक्षणामध्ये 90 ताप असलेले रुग्ण आढळून आले. तर 123 जणांच्या रक्ताचे नमूने तर 20 जणांचे रक्तजल नमूने घेण्यात आले आहेत.

सर्वेक्षणादरम्यान 1959 घरांमधील कुलर्सची तपासणी करण्यात आली. त्यात 203 कुलर्समध्ये डासअळी आढळून आली. मनपाच्या चमूद्वारे 163 कुलर्स रिकामी करण्यात आले. 734 कुलर्समध्ये १ टक्का टेमिफॉस सोल्यूशन तर 915 कुलर्समध्ये 2 टक्के डिफ्लूबेंझ्युरोम गोळ्या टाकण्यात आले. तसेच 189 कुलर्समध्ये गप्पी मासे टाकण्यात आले.

नागपूर मनपातर्फे नागरिकांना आवाहन

शहरात डेंग्यू रुग्णांची संख्या वाढू नये यासाठी मनपा प्रशासनाद्वारे आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत आहे. नागरिकांनी स्वत: याबाबत जागरूक राहणे आवश्यक आहे. पावसामुळे डासांची पैदास वाढली आहे. त्यामुळे नागरिकांनी डासांपासून संरक्षण करता येईल याची काळजी घ्यावी. सोबतच डासोत्पत्ती होणार नाही याचीही प्रत्येकाने विशेष काळजी घेण्याची गरज आहे.

घरातील कुंड्या, कुलरची टाकी, भांडी व जिथे पाणी साचू शकते अशा ठिकाणी पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. याशिवाय ताप, उलट्या, सांधेदुखी, त्वचेवर पुरळ ही व अशी अन्य डेंग्यू सदृश्य लक्षणे दिसून आल्यास तातडीने डॉक्टरांकडे जाउन उपचार घ्यावे, असे आवाहन मनपाच्या आरोग्य विभागाद्वारे करण्यात आले आहे.

(Cooler dengue hotspots, survey of Nagpur Municipal Corporation)

हे ही वाचा :

सहकार्याचा मार्ग नॅरोगेज न राहता ब्रॉडगेज असावा; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची नितीन गडकरींना साद

दहशतवाद्यांप्रमाणे नक्षलवाद्यांकडून ड्रोनचा वापर सुरु, खाकी वर्दीचं टेन्शन वाढलं

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI