सत्यवादी मुख्यमंत्र्यांनी राठोडांचा राजीनामा घेऊ नये; तर उद्रेक झाल्यास भाजप जबाबदार: सुनील महाराज

वनमंत्री संजय राठोड हे सपत्नीक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी गेले आहेत. (don't take Sanjay Rathod resignation says sunil maharaj)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 14:46 PM, 28 Feb 2021
सत्यवादी मुख्यमंत्र्यांनी राठोडांचा राजीनामा घेऊ नये; तर उद्रेक झाल्यास भाजप जबाबदार: सुनील महाराज
संजय राठोड, वनमंत्री

वाशिम: जोपर्यंत पूजा चव्हाण प्रकरणाची चौकशी होत नाही तोपर्यंत सत्यवादी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेऊ नये, अशी मागणी करतानाच राठोड यांचा राजीनामा घेतला आणि उद्या बंजारा समाजाचा उद्रेक झाल्यास त्याला भाजपच जबाबदार असेल असा इशारा महंत सुनील महाराज यांनी दिला आहे. (don’t take Sanjay Rathod resignation says sunil maharaj)

वनमंत्री संजय राठोड हे सपत्नीक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी गेले आहेत. त्यामुळे राठोड यांच्या राजीनाम्याच्या चर्चेने जोर धरलेला असतानाच सुनील महाराज यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना थेट आवाहन करत राठोड यांचा राजीनामा न घेण्याचं आवाहन केलं आहे.

राजीनाम्याची घाई नको

कोणत्याही चौकशीशिवाय राठोड यांचा राजीनामा घेऊ नये अशी 12 कोटी बंजारा समाजाची मागणी आहे. आम्हाला फोन करून, मेसेज आणि मेल करूनही राठोड यांचा राजीनामा घेऊ नये म्हणून बंजारा समाजाकडून विनंती केली जात आहे. त्यामुळे कर्तव्यदक्ष आणि सत्यवादी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राठोड यांच्या राजीनाम्याची घाई करू नये. या प्रकरणाची सखोल चौकशी होऊ द्यावी, अहवाल आल्यानंतर त्यात जे निष्पन्न होईल, त्यानुसार कारवाई करावी. चौकशी अहवाला आम्हाला मान्य राहील. मात्र, त्यापूर्वीच त्यांचा राजीनामा घेण्यात येऊ नये, असं आवाहन सुनील महाराज यांनी केलं आहे.

तर भाजपच जबाबदार

राजकीय दबावा टाकून राठोड यांच्याकडून राजीनामा घेतला गेल्यास बंजारा समाजात असंतोष निर्माण होईल. उद्या या असंतोषाचं उद्रेकात रुपांतर झालं तर त्याला भाजपच जबाबदार राहील, असा इशाराही त्यांनी दिला आहे. चौकशी न होताच राजीनामा घेण्याचा चुकीचा पायंडा पडू नये, अशी आमची मागणी आहे. मुख्यमंत्र्यांसह राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही या प्रकरणात लक्ष घालावं, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

ड्राफ्ट तयार, मुख्यमंत्र्यांना पाठवणार

यावेळी सुनील महाराज यांनी आम्ही एक ड्राफ्ट तयार केला आहे. या ड्राफ्टमध्ये राठोड यांचा राजीनामा न घेण्याची विनंती केली आहे. हा ड्राफ्ट ई-मेलद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवण्यात येणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. (don’t take Sanjay Rathod resignation says sunil maharaj)

 

संबंधित बातम्या:

संजय राठोड पत्नी आणि मेव्हण्यासह मुख्यमंत्र्यांना भेटणार; कॅबिनेटपूर्वीच मोठा निर्णय होणार?

… तर राठोड यांनी मंत्रिपदासह आमदारकीचाही राजीनामा द्यावा; पोहरादेवीतून मुख्यमंत्र्यांना ई-मेल जाणार

…तोपर्यंत मागे हटणार नाही, तक्रारीमध्ये संजय राठोड यांचेही नाव; पूजा चव्हाणची आजी आक्रमक

(don’t take Sanjay Rathod resignation says sunil maharaj)