Nagpur Corona : नागपुरात विद्यार्थ्यांना कोरोनाचा विळखा, एकाच शाळेतील 38 विद्यार्थी पॅाझिटीव्ह, पालकांची चिंता वाढली

1 हजार 193 जणांना कुठलेही लक्षणे नाहीत. सौम्य, मध्यम व तीव्र अशी लक्षणे असलेले 28 जण मेयो, मेडिकलसह इतर शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार घेत आहेत.

Nagpur Corona : नागपुरात विद्यार्थ्यांना कोरोनाचा विळखा, एकाच शाळेतील 38 विद्यार्थी पॅाझिटीव्ह, पालकांची चिंता वाढली
‘कोरोना’ आणि ‘फ्लू’ ची लक्षणे कशी ओळखायची याबाबत संभ्रम आहे का.. जाणून घ्या, या दोन्ही संसर्गातील नेमका फरक! Image Credit source: File photo
Follow us
| Updated on: Jul 18, 2022 | 4:31 PM

नागपूर : नागपुरातील हिंगणा रोड परिसरातील राय इंग्लिश शाळेतील (Rai English School) तब्बल 38 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झालीय. त्यामुळे पालकांची चिंता वाढली आहे. आज ही शाळा बंद ठेवण्यात आलीय. नागपूर महापालिकेची (Municipal) टीम आज या शाळेची पाहणी करीत आहे. यासह नागपूर जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 262 नवे कोरोना रुग्ण आढळलेत. त्यामुळे जिल्ह्यातील पॅाझिटीव्हीटी दर 13 टक्क्यांवर पोहोचला आहे. सक्रिय रुग्णसंख्या 1221 वर गेलीय. वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे (Active Patient Population) चिंता वाढलीय. राय इंग्लिश शाळेतील तब्बल 38 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झालीय.

विद्यार्थ्यांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करणार

नागपूरच्या एका शाळेत 38 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आल्याने प्रशासनाची मोठी चिंता वाढली. त्या शाळेमध्ये चाचण्या करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसुद्धा केलं जात आहे. सगळी मुलं लक्षण नसलेले आहेत. त्यांची आणखी टेस्ट केली जाणार आहे. सोबतच इतर शाळांनासुद्धा सावधतेचा इशारा देत कोरोना नियमांचं पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचं जिल्हा आरोग्य अधिकारी दीपक सेलोकर यांनी सांगितलं. शहरामध्ये कोरोनाचे प्रमाण वाढत असल्याने लक्षणे वाटल्यास प्रत्येकाने टेस्ट करावी आणि लस घ्यावी ज्यांचे दोन डोस झाले त्यांनी बूस्टर डोस घ्यावा अशा सूचना सुद्धा आरोग्य अधिकाऱ्यांनी केल्या.

262 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह

कोरोना पॉझिटीव्ह येणाऱ्यांची संख्या 13 टक्क्यांपलीकडे गेली. रविवारी शहरात 1 हजार 447 आणि ग्रामीणमध्ये 517 अशा जिल्ह्यात केवळ 1 हजार 964 चाचण्या करण्यात आल्यात. त्यानंतर तब्बल 13.35 टक्के म्हणजेच 262 जणांचे अहवाल सकारात्मक आढळलेत. यामध्ये शहरातून 162 आणि ग्रामीणमधून 100 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. जिल्ह्यात यापूर्वी 13 फेब्रुवारी 2022 रोजी 385 इतक्या बाधितांची नोंद होती. त्यानंतर दैनंदिन बाधितांची संख्या ही दोनशेपेक्षा कमीच राहिली. परंतु रविवारी जवळपास 155 दिवसानंतर या रुग्णसंख्येने अडीचशेपलीकडचा टप्पा ओलांडला आहे.

हे सुद्धा वाचा

1 हजार 221 सक्रिय रुग्ण

रविवारी दिवसभरात शहरातून 86 आणि ग्रामीणमधून 32 असे केवळ 118 जण ठणठणीत होऊन घरीही परतले आहेत. एकाही कोरोनाबळीची नोंद झाली नाही. बाधितांची संख्या वाढून कोरोनामुक्त घटल्याने पुन्हा सक्रिय रुग्णांची संख्या बाराशेपलीकडे पोहोचली आहे. सध्या शहरात 818 आणि ग्रामीणमध्ये 403 असे जिल्ह्यात 1 हजार 221 सक्रिय रुग्ण आहेत. यापैकी 1 हजार 193 जणांना कुठलेही लक्षणे नाहीत. सौम्य, मध्यम व तीव्र अशी लक्षणे असलेले 28 जण मेयो, मेडिकलसह इतर शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार घेत आहेत.

शहरात बुस्टर डोसला सुरुवात

नागपूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये शुक्रवारी 15 जुलै रोजी 18 वर्षावरील सर्वांच्या कोव्हिड प्रतिबंधात्मक बुस्टर डोसच्या लसीकरणाला सुरुवात झाली आहे. पुढील 75 दिवस चालणा-या या लसीकरण मोहिमेच्या पहिल्याच दिवशी नागपूरकरांनी उत्तम प्रतिसाद दर्शविला. पहिल्याच दिवशी शहरातील विविध केंद्रांवर 2117 नागरिकांनी बुस्टर डोज घेतले. शनिवारी सर्व केन्द्रांवर 12 ते 14 वर्षावरील मुलांना कॉर्बेव्हॅक्स लस दिली जाईल. तसेच 18 वर्षावरील सर्व नागरिकांना कोव्हिशील्डचे पहिला, दुसरा आणि बुस्टर डोज दिले जाईल. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय, अनुसंधान केंद्र मध्ये फक्त कोव्हॅक्सीन लस उपलब्ध राहील. कोव्हिशिल्ड किंवा कोव्हॅक्सिन यापैकी कोणत्याही लसीचे दोन्ही डोस घेउन 6 महिन्याचा कालावधी पूर्ण झालेल्या 18 वर्षावरील वयोगटातील नागरिकांना बुस्टर डोस घेता येणार आहे.

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.